पुणे, १६ डिसेंबर २०२२ : टाटा प्ले क्लासिक टीव्ही भारतातील पहिली हिंदी ड्रामा सिरीयल ‘हम लोग’ पुन्हा सादर करत साजरा करत आहे पहिला वर्धापन दिन ही सेवा सर्व नवीन सबस्क्रायबर्ससाठी निम्म्या सबस्क्रिप्शन शुल्कामध्ये देखील उपलब्ध असेल
टाटा प्ले क्लासिक टीव्ही आज आपला पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे आणि आपल्या सदस्यांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी ही सेवा २० डिसेंबरपर्यंत ५० टक्के सूट देत आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सदस्यांना ०८०६६९८२२५२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि प्रतिदिन फक्त १ रूपये शुल्क द्यावे लागेल.
या साजरीकरणामध्ये अधिक उत्साहाची भर करत टाटा प्ले क्लासिक टीव्ही सदस्यांसाठी भारतातील पहिली ड्रामा सिरीज ‘हम लोग’ पुन्हा घेऊन येत आहे, ज्यामुळे सदस्यांना पुन्हा त्या सिरीजला उजाळा देण्यासोबत मनोरंजनाचा आनंद घेता येईल. सुषमा सेठ, सीमा पहवा, मनोज पाहवा यांसारखे प्रतिभावान कलाकार असलेली ‘हम लोग’ ही भारतीय टेलिव्हिजनवर प्रसारित होणारी पहिली ड्रामा सिरीज होती, जिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि अपॉइण्टमेंट व्युइंगचा ट्रेंड सुरू केला.
८०चे दशक, ९०चे दशक आणि सुरूवातीचे २०००चे दशक या दशकांमधील सर्वोत्तम शोज पाहण्यासाठी चॅनेल क्रमांक १५२ वर टाटा प्ले क्लासिक टीव्ही पहा आणि क्लासिक कन्टेन्टच्या विनाव्यत्यय मनोरंजनाचा आनंद घ्या