टाटा एआयएला बहुतांश उच्च गुणवत्तापूर्ण एमडीआरटी अड्वायजर्ससाठी* जगभरात पाचवे आणि भारतात पहिले रँकिंग

22
Tata_AIA_Life_Insurance

मुंबईसप्टेंबर२०२३:  भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयएबहुतांश एमडीआरटी क्वालिफाईड अड्वायजर्ससाठी जगभरातील अव्वल ५ विमा कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. १ जुलै २०२३ नुसार, प्रतिष्ठित एमडीआरटी (मिलियन डॉलर राऊंड टेबल) लीगसाठी पात्र होणाऱ्या १,९७८ अड्वायजर्सची नोंद या कंपनीने केली आहे. एमडीआरटी क्वालिफाईड अड्वायजर्सना जीवन विमा क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि नैपुण्ये यांच्या बळावर उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळे ग्राहकांना योग्य सल्ला देण्यासाठी व ग्राहकांना त्यांची जीवन उद्दिष्ट्ये पूर्ण करता यावीत यासाठी मदत करण्यासाठी ते सर्वात जास्त सक्षम असतात.

  • सर्वाधिक (,९७८एमडीआरटीक्वालिफाईड लाईफ इन्श्युरन्स अड्वायजर्सची नोंद
  • एमडीआरटी क्वालिफाईड अड्वायजर्सच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत ३२ची वाढ
  • बहुतांश महिला एमडीआरटी क्वालिफायर्समध्ये भारतात पहिले तर जगभरात नववे रँकिंग**

आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत टाटा एआयएने सर्वाधिक (९३६) क्वालिफाईड महिला एमडीआयटी अड्वायजर्ससाठी जगभरात नववे आणि भारतात पहिले रँकिंग मिळवले आहे. या बाबतीत टाटा एआयएने पहिल्यांदाच जगभरातील अव्वल दहामध्ये स्थान मिळवले आहे.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर श्रीअमित दवे यांनी सांगितले, “टाटा एआयएच्या अनेक अड्वायजर्सना जागतिक स्तरावर सन्मानित केले जात आहे ही माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहेआमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सल्ला आणि संपूर्ण मूल्य शृंखलेमध्ये खास करून अड्वायजर्सकडून सर्वोत्तम अनुभव मिळावा यासाठी टाटा एआयएमध्ये आम्ही प्रयत्नशील असतोयासाठी आम्ही आमच्या अड्वायजर्सना उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम प्रशिक्षणविकासासाठी आवश्यक साहाय्य आणि करिअरमधील वृद्धीच्या संधी मिळाव्यात यावर भर देतोआमच्या अड्वायजर नेटवर्कच्या सहयोगाने आम्ही प्रत्येक भारतीयाला जीवन विम्याच्या संरक्षक छत्राखाली आणण्यासाठी आणि त्यांना त्यांची जीवन उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”


Tata-AIA-Insurance

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे प्रेसिडेंट  चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर श्रीवेंकटचलम एच यांनी सांगितले, सर्वात जास्त एमडीआरटी क्वालिफाईड अड्वायजर्ससाठी जगातील अव्वल पाच विमा कंपन्यांमध्ये आणि भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून स्थान मिळवणे हे आमच्यासाठी खूप मोठे यश आहेसंपूर्ण एजन्सी नेटवर्कमधील अड्वायजर्सची कार्यनिष्ठा  बांधिलकी आणि आमचे प्रोप्रायटरी चॅनेल यामुळे हे शक्य झाले आहेइतकी मजबूत टीम आमच्यासोबत असल्यामुळे आमच्या ग्राहकांना विम्याविषयी सर्वोत्तम सल्ला आणि नाविन्यपूर्ण योजनासुविधा मिळण्याची निश्चिती मिळतेज्यांच्या साहाय्याने ते स्वतःच्या  प्रियजनांप्रतीच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतात.”

एमडीआरटी हे ७० देश व प्रदेशांमधील ५०० पेक्षा जास्त कंपन्यांमधील आघाडीच्या जीवन विमा व आर्थिक सेवा प्रोफेशनल्सची जागतिक स्वतंत्र असोसिएशन आहे. त्यांच्या कामातून प्रोफेशनल ज्ञान, काटेकोर नैतिक वर्तन आणि लक्षणीय ग्राहक सेवा दिसून येते.

एमडीआरटी क्वालिफायर्स जगातील अव्वल फायनान्शियल प्रोफेशनल्सचे प्रतिनिधित्व करतात तर एमडीआरटी सदस्यत्वामध्ये देखील कोर्ट ऑफ टेबल (सीओटी) आणि टॉप ऑफ द टेबल (टीओटी) या दोन अतिरिक्त श्रेणी आहेत. सीओटी अड्वायजरने एमडीआरटीपेक्षा तीन पट जास्त व्यवसाय साध्य केला पाहिजे तर टीओटी अड्वायजरने सीओटी अड्वायजरपेक्षा दोन पट जास्त व्यवसाय आणला पाहिजे. टाटा एआयएने वर्षभरात १०३ सीओटी व ३० टीओटीची नोंद केली.