झॅगलची पर्फियोस सॉफ्टवेयर सॉल्यूशंस सोबत भागीदारी

99

११ जानेवरी २०२३ : 2011 मध्ये स्थापन झालेली फिनटेक सास (सॉफ्टवेअर ऍज अ सर्विस )  झॅगल हि अग्रगण्य खर्च व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे. झॅगल ने  पर्फियोस सॉफ्टवेयर सॉल्यूशंस सोबत भागीदारी केली आहे.

पर्फियोस  हे त्यांच्या कॉर्पोरेट, एसएमइ आणि वैयक्तिक ग्राहकांच्या डिजिटायझेशनच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रिअल-टाइम विश्लेषणे आणि उपायांचे प्रदाता आहे. पर्फियोस क्रेडिट गेटवेच्या प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या व्यवसायात विस्तार करण्याचा झॅगल चा हेतू आहे.

ही धोरणात्मक भागीदारी झॅगल च्या ग्राहकांसाठी सुरक्षित संमती-आधारित फ्रेमवर्क सुनिश्चित करेल. पर्फियोस क्रेडिट गेटवे  झॅगलच्या ग्राहकांसाठी ऑनबोर्डिंग आणि लाइफसायकल व्यवस्थापन सुलभ करेल.

या प्लॅटफॉर्ममध्ये ग्राहकाची डिजिटली पडताळणी, अंडररायटिंग आणि केवायसी करण्यापासून संपूर्ण जीवनचक्र समाविष्ट आहे. झॅगलसाठी, पर्फियोस क्रेडिट गेटवे  देशातील सर्व प्रमुख नेटवर्कवर कार्ड जारी करण्यास  आणि चॅनेलवरील कर्ज उत्पादनांना देखील मदत होईल.