जोयआलुक्कासकडून दैवी प्रेमाच्या प्रेरणेतून निर्माण झालेले एक अनोखे ब्रायडल कलेक्शन ‘सीता कल्याणम्’चे अनावरण

34

पुणे, २४ जून 2023: जगाचा आवडता ज्वेलर, जोयआलुक्कास त्यांच्या प्रत्येक प्रसंगांना अनुरूप आणि सर्व दागिनेप्रेमींना आवडतील अशा कालातीत अलंकार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हा ब्रँड त्यांच्या उत्कृष्ट दर्जा आणि अतुलनीय अशा देखण्या स्टाईल्ससाठी प्रसिद्ध आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील नाजूक समतोल सातत्याने साधण्याचे त्यांचे कौशल्य अजोड आहे.

जोयआलुक्कासची ही नवीनतम निर्मिती, पारंपरिक टेम्पल ज्वेलरीचे चिरंतन आकर्षण खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्टपणे साकार करते. सीता कल्याणम् ब्रायडल कलेक्शन हे रामायण या महाकाव्यात अमर झालेल्या प्रेम आणि भक्तीच्या चिरंतन बंधाला वाहिलेली एक गौरवशाली आदरांजली आहे. प्रभू श्रीराम आणि त्यांची अर्धांगिनी सीता यांच्या दैवी मिलनाचा हा दिव्य सोहळा आहे.

सीता कल्याणम् या ब्रायडल कलेक्शनमधले हे अत्यंत काळजीपूर्वक निर्माण केलेले खास अलंकार पारंपरिक टेम्पल ज्वेलरीमधल्या नाजूक छटा बारकाईने टिपतात. यातील प्रत्येक देखणा दागिना हा वधूच्या शृंगाराचा अविभाज्य भाग असावा या हेतूने निर्माण करण्यात आलेला आहे. खास निष्णात कारागीरांकडून घडवून घेण्यात आलेले सीता कल्याणम् ब्रायडल कलेक्शन, सूक्ष्म कारागिरी आणि नक्षीकामात कुठेही तडजोड न करता निर्माण केलेल्या निर्दोष अलकांरांचे दृश्य स्वरूप आहे.

या प्रदर्शनाच्या प्रसंगी बोलत असताना, जोय आलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जोय आलुक्कास म्हणाले, “आपल्या समृद्ध परंपरेचे आम्ही जतन करत असून जगातील एका विलक्षण प्रेमबंधाच्या पौराणिक दैवत्वाला सीता कल्याणम् या ब्रायडल कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही आदरांजली अर्पण करत आहोत. हे अद्वितीय कलेक्शन पारंपरिक भारतीय मूल्ये जपणाऱ्या आजच्या आधुनिक वधूसाठी डिझाईन करण्यात आले आहे. जोयआलुक्कासमध्ये आम्ही नेहमीच एक नवीन स्टाईल प्रस्थापित करणारे आणि उच्च मूल्यांचे समर्थन करणारे दागिने घडवण्यासाठी झटत असतो. सीता कल्याणम् ब्रायडल कलेक्शनदेखील याच विचारधारेने प्रेरित आहे, ज्या विचारधारेमुळे आज आम्ही जगातील लोकप्रिय ज्वेलर्स बनू शकलो आहोत.

सीता कल्याणम् ब्रायडल कलेक्शन भारतभरातील सर्व जोयआलुक्कास शोरूम्समध्ये उपलब्ध असेल. निवड करण्यासाठी वधूला या श्रेणीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.