जॉय ई बाइक आता दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ ची पॉवर्ड बाय पार्टनर

69

वडोदरा, ३० नोव्हेंबर २०२२  : वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. (BSE Code: 538970) ही भारताची आघाडीची दुचाकी जॉय ई बाइकची उत्पादक आता दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ ची पॉवर्ड बाय पार्टनर झाली आहे. या सहकार्यामुळे डीपीआयएफएफच्या यंदाच्या ‘गो ग्रीन’ या संकल्पनेला बळ मिळणार आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाची संकल्पना मध्यवर्ती ठेवणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवासाठी जॉय ई- बाइकला पॉवर्ड बाय पार्टनर म्हणून करारबद्ध करण्यात आले असून त्याअंतर्गत पर्यावरणस्नेही पद्धती व शाश्वततेविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

डीपीआयएफएफ वार्षिक पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी सज्ज होत असून त्याअंतर्गंत भारताच्या मनोरंजन व सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांना आदरांजली वाहिली जाते. या कार्यक्रमात दादासाहेब फाळकेजी यांचा वारसा जपत भारतीय सिनेमाचा समृद्ध इतिहास साजरा केला जातो.

सातत्याने नाविन्याचा ध्यास धरणाऱ्या कंपनीच्या प्रयत्नांतून जॉय ई बाइकचे मिशन आणि व्हिजन साकार झाले आहे. वाहन उद्योगात नाविन्य हेच प्रगती व विकासाचे प्रमुख सूत्र असते हे सर्वांना माहीत आहे. जॉय ई बाइक निःसंशयपणे एक पाऊल पुढे असून पृथ्वीवर भार न टाकता ग्राहकांना सेवा देणारी वाहतूक सेवा तयार करण्याचे ध्येय तिने अवलंबले आहे. ई- बाइकची संकल्पनाच इंधनाशिवाय चालणारे वाहन तयार करण्याची असल्यामुळे आज जगभरात मोठा अडथळा बनलेले कार्बन उत्सर्जन कमी करणे हेच तिचे ध्येय आहे.

या सहकार्याविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, सिनेमा हे भारतातील प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणूनच सर्वांशी संबंधित गोष्टीविषयी बोलण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. आज जगाला तापमानवाढ आणि हवामान बदलासारख्या समस्येने ग्रासले असताना यावर्षी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्ससारख्या भारतातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याने त्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे आणि या कामासाठी त्यांच्याशी सहकार्य करणे हे आमच्यासाठी सन्माननीय आहे. आम्ही यापूर्वीच या कामात आघाडी घेतली असून या सहकार्याद्वारे शाश्वत राहणीमान आणि पर्यावरणस्नेही पद्धतींबद्दलची जागरूकता वाढवण्यावर आमचा मुख्य भर असेल.

शून्य उत्सर्जन करणारी वाहने तयार करून हवामान बदलाचा सक्रिय सामना करण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीचे स्वास्थ्य जपण्यासाठी योगदान देताना जॉय ई बाइकला अभिमान वाटतो. आमच्या पर्यावरणपूरक दुचाकी हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहेत. पर्यावरण संवर्धनाचे हेच ध्येय डीपीआयएफएफ आणि आमच्यातील समान धागा आहे. भारतात शाश्वत राहाणीमानासाठी पूरक वातावरण तयार करण्याच्या बाबतीत संस्था कित्येक वर्षांपासून आघाडीवर आहे. नीती आयोगाअंतर्गत ‘वी फॉर वर्ल्ड फाउंडेशन’ या नोंदणीकृत संस्थेसह टीम गो ग्रीन उपक्रमाअंतर्गत शाश्वत विकासाच्या दिशेने काम करत आहे. हा उपक्रम यावर्षासाठी नियोजित करण्यात आलेल्या दहा सीएसआर उपक्रमांपैकी असून पर्यावरणपूरक पद्धतींची अमलबजावणी करत बदल घडवून आणण्यासाठी बांधील आहे.

२०२३ साठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्सने रूपेरी पडद्याच्या माध्यमातून नवे क्षितिज पार करण्याचे ठरवले असून सिनेमॅटिक पर्यटनाची संकल्पना त्याअंतर्गत अधोरेखित केली जाणार आहे. या प्रतिष्ठित व्यासपीठाने भारतातील वैविध्याचा मान राखत देशाच्या कानाकोपऱ्यातील संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे आणि आपल्या देशातील असीम गुणवत्तेला सलाम करण्याचे ठरवले आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२३ प्रधानमंत्री संग्रहालयाच्या पाठिंब्याने २० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत आयोजित केला जाणार आहे.

डीपीआयएफएफचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. अभिषेक मिश्रा म्हणाले, ‘डीपीआयएफएफमध्ये आम्हाला जॉय ई बाइक पॉवर्ड बाय पार्टनर म्हणून लाभल्याचा आनंद झाला आहे. सातत्याने नाविन्याचा ध्यास घेण्याचे जॉय ई बाइकचे ध्येय आणि धोरण भारावणारे आहे. जॉय ई बाइक पर्यावरणाला हानी न पोहोचवणारी वाहतूक सेवा देत असल्यामुळे आपल्यालाही पृथ्वीचे स्वास्थ्य जपता येईल, ते ही स्टाइलमध्ये.’