पुणे, ०६ जानेवारी, २०२३ : जॉयविले शापूरजी हाउसिंग या शापूरजी पालोनजी, एडीबी, आयएफसी आणि अक्टिसच्या महत्त्वाकांक्षी हाउसिंग प्लॅटफॉर्मने आज आपल्या पुण्यातील हडपसरजवळील नवीन निवासी प्रकल्पाची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ड्युप्लेक्सक्स व पेण्टहाउसेसच्या ‘स्काय-लग्झ एडिशन’चा समावेश आहे. या टॉवर्समध्ये 168 ड्युप्लेक्सक्स व पेण्टहाउसेस असतील आणि त्यांचा कार्पेट एरीया 1,220’ चौरस फूट (~113 चौरस मीटर) तो 1,326 चौरस फूट (~123 चौरस मीटर) या श्रेणीत असेल. या नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पातील घरांच्या विक्रीतून 1000 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळेल असे कंपनीला अपेक्षित आहे.
~9 एकर (~36,594 चौरस मीटर) परिसराच्या विकासाचा एक भाग असलेल्या या दोन टॉवर्समध्ये 3-बीएचके ड्युप्लेक्सेस व पेण्टहाउसेस असतील आणि 2.8 लाख चौर फूट (~26,000 चौरस मीटर) विक्रीयोग्य जागा यात असेल. या घरांना एक्सक्लुजिव टेरेस व पोडियम अॅमेनिटीज असतील. स्काय-लग्झ एडिशन हे लग्झरियस आर्किटेक्चरमधील एक आश्चर्य असून, त्याचे परिश्रमपूर्वक नियोजन करण्यात आले आहे. घरात राहणाऱ्याचे खासगीत्व जपून, त्यांना नजीकचे अफलातून देखावे दिसतील अशी या घरांची रचना आहे. जॉयविले घरे नेहमीच हिरवाई असलेल्या परिसरात बांधली जातात आणि स्काय-लग्झ एडिशनमधील घरेही याला अपवाद नाहीत. ड्युप्लेक्स टॉवर्सशिवाय या विकासात 75% मोकळ्या जागा आहेत, त्यामुळे मुबलक ताजी हवा खेळती राहून घर खरेदी करणाऱ्यांना अत्युच्च सुखाचा अनुभव येणार आहे. ड्युप्लेक्स घरांच्या किमती 1.45 कोटी रुपयांपासून सुरू होत आहेत.
हडपसरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर असलेली स्काय-लग्झ एडिशन कल्याणीनगर व कोरेगाव पार्कसारख्या लगतच्या ठिकाणांना उत्तमरित्या जोडलेली आहे आणि पुणे रेल्वे स्थानक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या वाहतूक केंद्रांशी तसेच एसपी इन्फोसिटी व मगरपट्टा आयटी पार्क यांसारख्या प्रमुख ठिकाणांशीही हा भाग उत्तमरित्या जोडलेला आहे. पुणे-सोलापूर महामार्ग व पुणे-अहमदनगर महामार्ग हे दोन प्रमुख राज्य महामार्ग या भागातून जातात. हडपसर भागाच्या विकासामागील प्रमुख कारणांपैकी हे एक कारण आहे. या प्रकल्पानजीकचा आणखी एक संरचना विकास प्रकल्प म्हणजे सासवड रोड व रिंग रोड यांना जोडणारा 30 एम आरपी रोड होय. हा रस्ता पुढे नगर रोड व सोलापूर महामार्गालाही जोडतो.
जॉयविले शापूरजी हाउसिंगचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीराम महादेवन या प्रकल्पाबद्दल म्हणाले, “पुण्यातील हडपसरजवळील ड्युप्लेक्स व पेण्टहाउसेस यांनी युक्त अशा आमच्या नवीन निवासी प्रकल्पाच्या शुभारंभाची घोषणा करणे आमच्यासाठी रोमांचक आहे. या भागात ड्युप्लेक्स घरांना मागणी वाढत आहे, असे आम्हाला संशोधनामध्ये आढळले. उच्च उत्पन्नगटाकडे स्थित्यंतर साधणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जॉयविले नेहमीच प्रयत्नशील असते, मग ती गरज गेटेड कम्युनिटीजमध्ये जाण्याची असो किंवा महत्त्वाकांक्षी ड्युप्लेक्स व पेण्टहाउसेस खरेदी करण्याची असो. स्काय-लग्झ एडिशन गेटेड कम्युनिटीमधील सर्वोत्तम सुविधा, सुरक्षितता व संरक्षित वातावरणासह, टॉवर्समधील ड्युप्लेक्स व
पेण्टहाउसेस, देऊ करत आहे. आमचा हा नवीन प्रकल्प परिपूर्ण घराच्या आकांक्षांची पूर्तता करणारे सर्वांगीण राहणीमानाचे वातावरण देईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या वाढत्या पोर्टफोलिओमध्ये या प्रकल्पाची भर घालताना तसेच पुणे बाजारपेठेतील आमचे अस्तित्व मजबूत करताना आम्हाला आनंद होत आहे. जलद गतीने झालेल्या संरचना विकासामुळे हडपसरमध्ये घरांची मागणी वाढत आहे. या ठिकाणाचे हळूहळू झालेले रूपांतर बघता, हडपसर लोकांचे राहणीमान बदलून टाकणाऱ्या भवितव्याचा पुरस्कार करेल अशी आशा आम्हाला वाटते.”
स्काय-लग्झ एडिशनमधील घरे शाश्वत राहणीमानाच्या दृष्टीने घडवण्यात आली आहेत. ऊर्जा-कार्यक्षम, भिंती, कमी पाणी प्रवाहित करणारे नळ (लो-फ्लो वॉटर फिक्स्चर्स) आणि वर्षाजल नियोजन यांसारख्या सुविधांमुळे येथे राहणाऱ्यांचा विजेचा वापर मर्यादित राहणार आहे.
या दोन ड्युप्लेक्स टॉवर्समध्ये एक्सक्लुजिव टेरेसची सुविधा आहे. त्याशिवाय वॉकिंग/जॉगिंग पाथ, सीनियर सिटिझन्स प्लाझा, योग व ध्यानधारणेची जागा, बार्बेक्यू झोन, निरीक्षण स्थळ आणि परगोला सीटिंग यांसारख्या सुविधा आहेत. प्लंज पूल, स्पा, स्टीम रूम, जिम, कॅफे, किड्स प्ले एरिया, इनडोअर गेमिंग झोन, वर्क फ्रॉम होम एरिया, स्क्रीनिंग रूम, गेस्ट रूम्स यांसारख्या अन्य सुविधांमुळे घर खरेदी करणाऱ्यांना आरामदायी जीवनशैलीचा अनुभव येईल आणि या सगळ्या सुविधा निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवता येणार आहेत.