जेनझिऑनचे पुण्यात नवे कार्यालय हेल्थकेअर आणि रिटेल टेक्नॉलॉजी सेवा व्यवसायवाढीची योजना

97

पुणे : जेनझिऑन चे पुण्यात नवे कार्यालय हेल्थकेअर आणि रिटेल टेक्नॉलॉजी सेवा व्यवसायवाढीची योजना आरोग्यसेवा आणि रिटेल मार्केटसाठी इंटेलिजेंट ऑटोमेशन, सिक्युरिटी, कंप्लायन्स, क्लाउड व्यवस्थापित सेवा प्रदान करणाऱ्या जेनझिऑन या आघाडीच्या कंपनीने पुण्यात नवे कार्यालय उघडण्याची घोषणा केली. कंपनीचे हे भारतातील दुसरे कार्यालय आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI),मशीन लर्निंग आणि इंटेलिजेंट ऑटोमेशनमधील नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सच्या विकासाला गती देण्यासाठी, जागतिक दर्जाची विद्यापीठे आणि  शाळांचे केंद्र असलेल्या पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभेचा वापर करणे हे या धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट आहे.

कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट थुमुला म्हणाले, “आमच्या झपाट्याने वाढणाऱ्या ग्राहकवर्गाला उत्तम सेवा देण्यासाठी आणि आरोग्यसेवा व रिटेल तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात अग्रणी म्हणून आमचे स्थान मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही जागतिक स्तरावरील उच्च दर्जाच्या प्रतिभेसाठी गुंतवणूक करत आहोत, त्याच उद्देशाने आम्ही पुण्यात विस्तार केला आहे. येथील वैविध्यपूर्ण आणि कुशल प्रतिभा ही आमच्या सततच्या यशाच प्रेरक शक्ती असेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

हे नवे कार्यालय जेनझिऑनच्या व्यवसायविस्तार योजनांमधील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. विशेषत: सध्याच्या आव्हानात्मक जागतिक आर्थिक वातावरणात, अमेरिका आणि जगभरातील ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी मोलाचे योगदान देईल. तंत्रज्ञान कुशलतेसह आरोग्यसेवा आणि रिटेल क्षेत्रातील प्रभावी कामगिरीमुळे कंपनीने मिळवलेले महत्त्वाचे स्थान, कंपनीला जागतिक वितरण मॉडेलद्वारे ग्राहकांना अपवादात्मक मूल्याधारीत सेवा प्रदान करण्यास सक्षम करते.


पुढील सहा ते १२ महिन्यांत, जेनझिऑनने उत्पादन अभियांत्रिकी, उत्पादन व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा अभियांत्रिकी आणि डेटा सायन्स यांसारख्या विभागांवर लक्ष केंद्रित करून येथील कर्मचारी संख्या १०० हून वाढवण्याची अपेक्षा केली आहे.  भविष्यात एडब्ल्युएस आणि अझुरे क्लाउड आर्कीटेक्ट (Azure Cloud Architects)आणि अभियांत्रिकी कर्मचारी नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे कंपनीला तिच्या हेल्थ इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मच्या (HiP)विकासाला गती देता येईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे.

उच्च गुणवत्ता, बुद्धीमान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना स्पर्धात्मक मोबदल्यासह शिकण्याची आणि स्वयंविकासाचीही संधी देते. सक्षमीकरण, मानवी संबंध आणि जबाबदार वर्तनाच्या संस्कृतीला कंपनी प्रोत्साहन देते. पुण्यातील शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी करून इथल्या गुणवान उमेदवारांना संधी देणे आणि उमेदवारांमध्ये कामासाठी सर्वोत्तम ठिकाण अर्थात “डेस्टिनेशन एम्प्लॉयर ऑफ चॉईस” म्हणून स्थान मिळवणे हे कंपनीचे ध्येय आहे.

हे हि वाचा :

रोमांचक गेमिंग अनुभवासाठी BRAVIA X75L टेलिव्हिजन सिरीज घरी आणा