जेईई ऍडव्हान्सच्या निकालात फिटजी पुणेच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व

21

पुणे, प्रतिनिधी – देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई ऍडव्हान्सचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. फिटजी पुणेच्या सुमारे ५२ विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्सच्या निकालात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुण्यातील रोहित सातपुते, मैत्रण्य पाटील यांच्याबरोबरच फिटजीच्या इतर केंद्रातील ऋषी कालरा, प्रभाव खंडेलवाल, मलय केडिया यांनी या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले.

रोहित सातपुते म्हणाला की, “भारतातून ९०२ रँक मिळाल्यामुळे मी आनंदी असून यापुढे अधिक चांगल्या रँकची अपेक्षा वाढलेल्या आहेत. मला जेईई मेन रँक मिळाल्यानंतर, माझा आत्मविश्वास थोडा कमी झाला होता, परंतु माझ्या शिक्षकांनी मला दररोज एक मॉक पेपरचा सराव करण्यास प्रवृत्त केले म्हणून मी माझ्या फिटजीच्या प्राध्यापकांना आणि माझ्या पालकांना मनापासून धन्यवाद देतो.

मैत्रण्य पाटील म्हणाला की, “शिक्षकांचा पाठिंबा आणि आई-वडिलांच्या प्रोत्साहनद्वारे हे यश शक्य झाले. चाचण्यांचे प्रकार, वेळेवर शंकानिवारण, उच्च मार्गदर्शक प्रशिक्षकामुळेच या रँकपर्यंत मी हे साध्य केले. जेईईची तयारी करण्यासाठी योग्य नोट्स तयार करा, तुमच्या शिक्षकांच्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करा, नियमित शंकानिवारणासह कठोर सराव करा.

फिटजी पुणे प्रमुख राजेश कर्ण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनेचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी आता महाविद्यालय तसेच शाखा यांची एकदम विचारपूर्वक निवड करावी. जेओएसएए संकेतस्थळाचा काळजीपूर्वक अभ्यास करून योग्य शाखेची निवड करावी अशी सूचना केली.

राष्ट्रीय स्तरावर केवळ कॉमन मेरिट लिस्टमधील निकालात टॉप 100 मध्ये 37 विद्यार्थ्यांनी AIR 3, AIR 6, AIR 8 ऑल इंडिया रँक मिळवले. फिटजीचा प्रामाणिकपणा, नैतिकता, समर्पण, पारदर्शकता, कठोर परिश्रम हे सातत्याने परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यास मदत करतात.

ऋषी कालरा हा FIITJEE फोर इयर्स क्लासरूम प्रोग्राम (इयत्ता IX-XII) चा विद्यार्थी असून भारतामध्ये 3 रा क्रमांक मिळाला आहे. प्रभाव खंडेलवाल हा एक वर्ष ऑनलाइन क्लासरूम प्रोग्रामचा विद्यार्थी आहे याने भारतातून 6 वा क्रमांक मिळवला आहे. मलय केडिया हा पिनॅकल टू इयर्स इंटिग्रेटेड स्कूल प्रोग्रॅम (इयत्ता XI-XII) तसेच फोर इयर्स क्लासरूम प्रोग्राम (इयत्ता IX-XII) चा विद्यार्थी असून त्याने निकालात भारतात 8 वा रँक मिळवला आहे.