पुणे, २३ डिसेंबर २०२२ : वृत्तपत्र तसेच प्रसार माध्यमातून करोना चा प्रादुर्भाव वाढल्याची माहिती येत असून सर्व जिम व्यवसायकांनी धीर धरावा असे आवाहन पुणे फिटनेस व मनसे शारीरिक सेना पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून कसल्याही प्रकारची सूचना न आल्यामुळे व्यवसायावर लक्ष देऊन उत्पन्न वाढवावे, शरीर सौष्ठवतेची तयारी चालू ठेवावी असे ही ते म्हणाले.
मागील २ वर्षात १४ महिने ‘बंद’चा वनवास भोगल्यामुळे जिम व्यवसायकांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक खच्चीकरण झाले आहे. करोना काळात कर्जाच्या वाढत्या बोज्यामूळे बऱ्याच जिम बंद पडल्या व बेरोजगारी वाढली. त्यात मागील केंद्र व राज्य सरकार कडून कसलीही मदत व सहकार्य न मिळाल्याची तीव्र नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
या सरकारकडून अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच ऑक्सि मीटर व ताप मोजण्याचे यंत्र जिम मध्ये बाळगावे, मॅट स्वछता, पाणी प्यायची जागा स्वछ ठेवावी व सर्व कोच ने मास्क व सॅनिटायजर वापरावे असे ही त्यांनी सूचित केले आहे. त्यावेळी काळे सरांसोबत महाराष्ट्र श्री २०१९ रुपेश चव्हाण सुद्धा उपस्थित होते .