जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस …

216
आजचे राशीभविष्य : राशिभविष्याचा सल्ला उपयुक्त ; जाणून घ्या . .

जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मध्यस्थीच्या कामातून लाभ होईल. आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

वृषभ:-

आवक-जावक यांचा मेळ जुळवावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. कामात काही अनपेक्षित बदल संभवतात. घरगुती प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे.

मिथुन:-

कोणत्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. गप्पा गोष्टी करण्यात वेळ घालवाल. अघळ पघळ बोलणे टाळा. इतरांचा तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.

कर्क:-

मानसिक चंचलतेला आवर घालावी. घरासाठी काही मोठ्या वस्तू खरेदी कराल. मानाच्या व्यक्तींची गाठ पडेल. प्रकृतीबाबत हयगय करू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.

सिंह:-

केलेल्या कामातून समाधान मिळेल. नवीन मित्र जोडाल. खूप दिवसांनी जुने मित्र भेटतील. पत्नीशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या:-

कामाची एकाच धांदल उडेल. योग्य व्यवस्थापनावर भर द्यावा. कमिशनमधून चांगला लाभ मिळेल. इतरांचा विश्वास संपादन करावा. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

तूळ:-

अडथळ्यातून मार्ग काढता येईल. दिरंगाई झाली तरी कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीचा लाभ होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल.

वृश्चिक:-

मनातील निराशा झटकून टाका. सकारात्मक विचारांची कास धरावी. कौटुंबिक गोष्टींमध्ये लक्ष घाला. कामाचा व्याप वाढता राहील. हातातील कामे पूर्ण होतील.

धनू:-

मनातील चुकीचे विचार दूर सारावेत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी सलोखा वाढवावा. खर्चाचे प्रमाण आटोपते ठेवावे. जोडीदाराशी सल्ला मसलत करावी.

मकर:-

कामात आळस आड आणू देऊ नका. जवळचे नातेवाईक भेटतील. इतरांचा विश्वास संपादन करावा. हाताखालील लोकांवर बारीक लक्ष ठेवावे. कुणावरही चटकन विश्वास टाकू नका.

कुंभ:-

तब्येतीच्या तक्रारींकडे वेळीच लक्ष द्या. गरज नसेल तर प्रवास करू नये. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्यात दिवस खेळीमेळीत जाईल.

मीन:-

सामुदायिक वादापासून दूर राहावे. स्त्री वर्गापासून हानी संभवते. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. उत्तम गृह सौख्य लाभेल. मित्रांबाबतचे गैर समज दूर होतील.