जागरूक पालक, सदृढ बालक अभियानाचे लोणी काळभोर येथे उद्घाटन

407

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील आरोग्यवर्धीनी केंद्र येथे जागरूक पालक ,सदृढ बालक या अभियानाचे उद्घाटन लोणी काळभोरच्या सरपंच माधुरीताई काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ९ फेब्रुवारी पासून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ विशेष अभियान राबविण्याचे निश्चित केलेले आहे.राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्याचे गावात निश्चित करण्यात आले आहे.

हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे व प्रत्येक बालकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचवावा असे आव्हान माधुरी काळभोर यांनी केले.

‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियान : गावातील सर्व वाड्या वस्त्यावरील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, डॉ. डी .जे .जाधव ,डॉ भंगाळे  , उपसरपंच सौ.भारतीताई काळभोर , माजी सरपंच राजाराम काळभोर, आरोग्य केंद्रातील कर्मचारी
आदी मान्यवर उपस्थित होते.