पुणे १६ नोव्हेंबर २०२२ : जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने ब्रिटानिया न्युट्रीचॉईस तर्फे अनोखी अशी सेवा सुरु केली असून या सेवे अंतर्गत मधुमेही लोकांसाठी न्युट्रीशन सुविधा आता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा उपक्रम तज्ञ आणि हेल्थ कोच रायन फर्नांडो यांच्या मदतीने ग्राहकांना त्यांचे वय आणि आहारातील आवडीनुसार प्लॅन्स उपलब्ध करुन देणार आहे. ही मोहिम भारतातील १५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचणार असून यामुळे लोकांमध्ये आहाराची योजना आखून कशा प्रकारे मधुमेहाचे व्यवस्थापन करावे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
चीन नंतर भारतात सर्वाधिक म्हणजे ७७ दशलक्ष लोक मधुमेहाने त्रस्त आहेत (स्त्रोत आयडीएफ). शतकातील हे सर्वांत मोठे आरोग्यासाठी असलेले आव्हान आहे, कारण जगभरांतील पहिल्या १० पैकी मृत्यूचे हे प्रमुख कारण आहे. २ पैकी १ वयस्क व्यक्तीला मधुमेह असतो आणि त्याचे निदान झालेले नसते. भारतात, आघाडीचे हे असे कारण असून सातत्याने या आजाराचे प्रमाण वाढत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे अनारोग्यपूर्ण जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी. अनेकांना त्रास देणारी प्रमुख समस्या असल्यामुळे एकच उपाय हा सर्वांसाठी नसतो.
जागतिक मधुमेह दिनी ब्रिटानिया न्यूट्रीचॉईस कडून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमा मध्ये प्रत्येक व्यक्ती साठी त्यांच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास योग्य प्लॅन हा त्यांचे वय आणि खाण्यापिण्याच्या सवयींनुसार देण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भौगोलिक स्थळानुसार योग्य प्लान देण्यात येत असून हा प्लॅन त्यांना अतिशय सोप्या अशा व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
सर्वांना हे माहित आहे की चांगल्या आरोग्याचा प्रवास हा सातत्य आणि वाहून घेतल्याने सुरु होत असतो, त्याकरता या उपक्रमाअंतर्गत एआय चा वापर करुन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामध्ये वैयक्तिक व्हिडिओज (प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केलेले) चा वापर करुन एका आठवड्याचा डाएट प्लान दिला जातो जेणेकरुन त्यांना प्रोत्साहन मिळून ते सातत्याने काम करु शकतील.
रायन फर्नांडो हे भारतातील आघाडीचे न्युट्रिशनिस्ट असून त्यांच्या कडे दोन दशकां हून अधिक काळाचा अनुभव आहे. या कस्टमाईज्ड डाएट साठी ब्रिटानिया न्युट्रीचॉईस ने त्यांच्या बरोबर सहकार्य करार केला आहे. डाएट तयार करतांना वापरकर्त्यांची गरज, चव आणि नियंत्रण कशा प्रकारे असावे याच बरोबर परिणामकारकता पाहून रोजच्या पोषक घटकांवर लक्ष केंद्रित करावे लागते.
डेन्मार्कचे संचालक आणि जसलोक हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या एन्डोक्रोनोलॉजी, डायबेटिस आणि मेटॅबोलिझम चे संचाकल प्रा. (डॉ.) हेमराज बी चंदालिया यांनी सांगितले “ जागतिक मधुमेह दिनाच्या औचित्याने आपल्याला आता मधुमेह थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून याकरता आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगिकार करणे आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण भोजन आणि व्यायाम यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळून पुढील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.”
या सुरुवाती विषयी बोलतांना ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेड चे चीफ मार्केटिंग ऑफिसर अमित दोशी यांनी सांगितले “ भारतात जगभरांतील दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या ही मधुमेहाने त्रस्त आहे. जागतिक मधुमेह दिनी तज्ञांच्या सल्ल्याने युक्त असा राष्ट्रीय पातळीवरील मधुमेहासाठीचा उपक्रम सुरू करतांना आंम्हाला आनंद होत आहे. आमचे उद्दिष्ट्य आहे की लोकांना सहज पणे पोषण मिळून तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन सहजपणे त्यांना वैयक्तिक असा अनुभव प्राप्त करणे होय. पुरस्कारप्राप्त न्युट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांच्या सहकार्याने प्रत्येकासाठी डाएट प्लान निर्माण करुन मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवनावर परिणाम करणारा उपक्रम सुरु करतांना आंम्हाला आनंद होत आहे.”
न्युट्रिशनिस्ट आणि कुआ न्युट्रिशनचे संस्थापक रायन फर्नांडो यांनी सांगितले “ एक न्युट्रिशन प्रशिक्षक म्हणून माझी ही जबाबदारी आहे की लोकांना आरोग्यपूर्ण पर्याय देण्या बरोबरच त्यांचे शरीर दुरुस्त होईल अशा पदार्थांची माहिती देणे. मधुमेह हा असा आजार आहे जो नियंत्रित केला जाऊ शकतो आणि त्याचे व्यवस्थापन हे तुम्ही सेवन करत असलेले अन्न आणि जीवनशैली तील बदलामुळे करणे शक्य आहे. ब्रिटानिया न्यूट्री चॉइससोबतच्या माझ्या सहकार्याबद्दल मी उत्साहित आहे आणि आशा आहे की आम्ही जे काम केले आहे, त्याचा फायदा देशभरातील मधुमेही आणि प्री-डायबेटिसच्या रुग्णांना होतो.”
योग्य समतोल अशी आरोग्यपूर्ण भोजनासह असलेली जीवनशैली या गोष्टी मधुमेहात खूपच महत्त्वाच्या असतात. म्हणूनच तुम्ही काय खाता ते महत्त्वाचे आहे तसेच यांत फायबर युक्त पदार्थ वाढवून, कार्बोहायड्रेट्स, कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि साखर न घालता पदार्थ असणे आवश्यक आहे. न्युट्रिचॉईस डायबेटिक फ्रेन्डली इसेन्शियल ओट्स आणि रागी कुकीज ची निर्मिती ही याच गोष्टी लक्षात घेऊन करण्यात आली आहे.