पुणे : जागतिक पर्यावरण दिनी टाटा टीने जागो रे चे नवे एडिशन सादर केले आहे. वातावरणात होत असलेले बदल या सध्याच्या सर्वात मोठ्या समस्येच्या कारणांबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वातावरणात होत असलेल्या बदलांच्या झळा संपूर्ण जगभरात जाणवत आहेत. या समस्येकडे तातडीने लक्ष दिले जाणे खूप गरजेचे आहे. आपल्या संपूर्ण पृथ्वीवर विपरीत परिणाम करत असलेली ही समस्या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एक खूप मोठा धोका आहे.
प्रत्यक्षात बदल घडवून आणण्यात टाटा टीचे जागो रे अभियान २००७ सालापासून अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि संपूर्ण समाजाच्या हितासाठी प्रभावी उपायोजना घेऊन येत आहे. भ्रष्टाचार, निवडणुका, महिला सक्षमीकरण, कोविड-१९ अशा विविध मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करून जागो रे ने सामाजिक दायित्वाला एक नवा अर्थ प्राप्त करून दिला आहे. वातावरणातील बदलांबाबत सक्रिय होणे किती तातडीचे आणि महत्त्वाचे आहे हे जाऊन टाटा टीने या मुद्द्यावर सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आपल्या मंचाचा वापर केला आहे.
नव्या टीव्हीसीमध्ये टाटा टी जागो रे ने वातावरणातील बदलांविरोधात लढ्याचा संदेश पालकांना खूप जास्त जवळचा वाटावा आणि त्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवावे यासाठी लोकप्रिय नर्सरी गाण्यांचा वापर केला आहे. म्युलेन लिंटास बंगलोरने याची संकल्पना रचली आहे. आपण जर आज सक्रिय झालो नाही तर आपल्या काळातील लोकप्रिय गाणी व कविता भविष्यात किती वेगळ्या वाटू शकतील हे या फिल्ममधून दर्शवण्यात आले आहे. जॅक अँड जिल, मछली जल की रानी, ट्विन्कल ट्विन्कल लिटिल स्टार, रेन रेन गो अवे यांचे वेगळी रूपे यामध्ये प्रस्तुत करण्यात आली आहे. सध्याचे ज्वलंत वास्तव आणि आपले दुर्लक्ष व निष्क्रियता यामुळे आपल्या मुलांचे विश्व किती नुकसान झालेले असेल हे यामधून दाखवले गेले आहे.
“Jack and Jill went up the hill…
To fetch a pail of water…
But all the water had dried up
The world was now much hotter
So Jack and Jill sat on the hill
Their throats were so dry
They couldn’t find a drop to drink…
And one day… neither will I……”
बदल घडवून आणला जावा यासाठी या फिल्ममध्ये वातावरणातील बदलाच्या विरोधातील लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी काही साध्या, सहज करता येण्याजोग्या उपायांचा स्वीकार करण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. ग्राहकांनी त्यांचे समर्थन दर्शवण्यासाठी Jaagore.com या वेबसाईटवर जायचे आहे, त्याठिकाणी त्यांना पर्यावरणानुकूल जीवनशैली अवलंबिण्यासाठी काही टिप्स मिळतील, वातावरणातील बदलविरोधातील लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी आपण काय केले हे शेयर करून ते इतरांना देखील प्रभावित करू शकतील.
या उपक्रमाबाबत टाटा कन्ज्युमर प्रॉडक्ट्सचे पॅकेज्ड बेवरेजेस (भारत व दक्षिण आशिया)चे अध्यक्ष श्री पुनीत दास यांनी सांगितले, “प्रत्येक वेळच्या महत्त्वाच्या सामाजिक समस्यांबाबत संपूर्ण समाजाला जागरूक करण्यासाठी टाटा टी जागो रे ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. संपूर्ण जगाच्या भवितव्यासाठी वातावरणातील बदलांविरोधात लढण्याची गरज सध्या सर्वात जास्त आहे. वातावरणातील बदल आणि त्याचे नकारात्मक प्रभाव याबाबत चर्चा खूप काळापासून केली जात आहे, याचे खूप मोठे धोके आपल्या मुलांना सहन करावे लागणार आहेत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. टाटा टी जागो रेचे सध्याचे एडिशन हे मुलांना सुरक्षा पुरवण्याच्या आणि त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते सर्व करण्याच्या पालकत्वाच्या मूलभूत भावनेशी संबंधित आहे. यावर्षी आम्ही लोकप्रिय नर्सरी गाणी व कवितांचा वापर करून हे दाखवून देत आहोत की जर आपण आता पावले उचलली नाहीत तर आपल्या मुलांचे आयुष्य खूप वेगळे असू शकते.
आम्हाला आशा आहे की, वातावरणातील बदलाची समस्या खूप व्यक्तिगत आणि सहज समजून येण्यासारखी असल्याने प्रत्येक व्यक्तीमार्फत आचरण व सवयी यामध्ये बदल करून संपूर्ण समाजात मोठे परिवर्तन घडवून आणता येऊ शकेल.”
या अभियानाबाबत म्युलेन लिंटासचे सीईओ श्री हरी कृष्णन यांनी सांगितले, “टाटा टी जागो रे हे केवळ एक अभियान नव्हे तर, एक खूप मोठी, विशेष उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालवली जाणारी चळवळ आहे. विचारांचे नेतृत्व करणारी कंपनी म्हणून टाटा टीने नेहमीच समाजाला आरसा दाखवला आहे आणि यावेळी देखील वातावरणातील बदल या मुद्द्याची निवड करून या ब्रँडने एक खूप मोठे कार्य हाती घेतले आहे. यावर्षी आम्ही मुलांवर होणाऱ्या प्रभावाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडत आहोत. आपल्या कृतींचे परिणाम या नव्या पिढीला भोगावे लागणार आहेत. आमच्या अनोख्या सर्जनशीलतेचा वापर करून आम्ही मुलांच्या लोकप्रिय गाण्यांमधून या अभियानाचा संदेश पोहोचवत आहोत, ही गाणी लहान मुलांनीच गायलेली असल्याने त्याचा प्रभाव अजून जास्त वाढला आहे. या जागरूकतेमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येईल.”