‘जागतिक नृत्य दिना’च्या निमित्ताने नांदेड सिटी येथे नृत्य कला आविष्कार अकादमी आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

49
‘भारतीय स्त्रियांचा शौर्यशाली इतिहास, महिलांची असुरक्षितता आणि त्यावरील उपाय’ याविषयी विद्यार्थी आणि पालकांना केले मार्गदर्शन ! 
पुणे – येथील ‘नांदेड सिटी’ येथे 29 एप्रिल या दिवशी जागतिक नृत्य दिनाच्या निमित्ताने नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘नृत्य कला आविष्कार अकादमी’ च्या संचालिका सौ. अनुया जोशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नृत्यसाधना कार्यक्रमाद्वारे भरतनाट्यम नृत्यशैलीतील विविध नृत्य प्रस्तुतीकरण करण्यात आले. यामध्ये हिंदू जनजागृती समितीनेही सहभाग घेतला होता. हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थित विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांना ‘भारतीय स्त्रियांचा शौर्यशाली इतिहास, महिलांची सध्याची असुरक्षितता आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी 41 जणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
      या कार्यक्रमात आरंभी नटराज पूजन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नटेश कौतुवंम, आलारीपू, जतिस्वरंम सादरीकरण केले. गुरु सौ. अनुया जोशी यांनी सरस्वती वंदना सादर केली. नृत्यगुरु सौ. अपर्णा धुपकर यांनी नृत्याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिव किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.