पुणे, १० जानेवारी २०२३ : VIAS3D या उत्तर अमेरिकेत मुख्यालय असलेल्या डिजिटिल इंजिनीअरिंगच्या स्पेशलाइझ्ड पुरवठादार कंपनीने व तिच्या भारतातील उपकंपनीने भारतस्थित कॅडमार्क सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. VIAS3Dने भारतात केलेले हे पहिलेच अधिग्रहण आहे. टेक्सासमधील ह्युस्टन येथे मुख्यालय असलेल्या कंपनीने यापूर्वी आपल्या वाढीच्या धोरणाचा भाग म्हणून अमेरिका व मेक्सिको या देशांमध्ये यशस्वीरित्या अधिग्रहणे केली आहेत. यामुळे कंपनीची पारंपरिक व उदयोन्मुख अशा दोन्ही बाजारपेठांतील व्याप्ती लक्षणीयरित्या वाढणार आहे.
त्रिवेंद्रमस्थित कॅडमार्क सॉफ्टवेअर ही स्पेशालिस्ट इंजिनीअरिंग कंपनी असून, उद्योगांना कस्टमाइझ्ड डिझाइन आधारित सोल्युशन्स पुरवण्याचे काम करते. या उत्पादनांमुळे उद्योगांना त्यांची उत्पादने व सेवा भारतातील विविध उद्योगक्षेत्रांपर्यंत तसेच प्रदेशांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता प्राप्त होते.
- उच्च दर्जाची इंजिनीअरिंग सेवा पुरवून तसेच महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख अशा दोन्ही उद्योगांपर्यंत त्यांची व्याप्ती पोहोचवून, भारतीय व जागतिक क्लाएंट्ससाठी मूल्यनिर्मिती करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले अधिग्रहण
- 2025 सालापर्यंत, 30 ते 50% सीएजीआरवर, आपले उत्पन्न दुप्पट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल्स, हाय टेक, उत्पादन, एअरोस्पेस संरक्षण व अवकाश आदी क्षेत्रांना उत्पादन विकासात सहाय्य करण्याचे कंपनीचे नियोजन आहे
- दोन्ही कंपन्यांच्या समन्वयांमधून सरकारी क्षेत्रांनाही उत्पादने पुरवण्याचा VIAS3Dचा विचार आहे
उच्च दर्जाची इंजिनीअरिंग सेवा पुरवून तसेच महत्त्वपूर्ण व उदयोन्मुख अशा दोन्ही उद्योगांपर्यंत त्यांची व्याप्ती पोहोचवून, भारतीय व जागतिक क्लाएंट्ससाठी मूल्यनिर्मिती करण्याच्या दृष्टीने हे अधिग्रहण करण्यात आले आहे. भारतातील जलद आर्थिक वाढीमुळे, उपखंडात कार्यक्षेत्र विस्तारण्याचे आणि पुढील 3 वर्षांत संयुक्त स्थापना तळ (इन्स्टॉल बेस) दुप्पट करण्याचे VIAS3Dचे नियोजन आहे. यातून मुरब्बी तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने जागतिक उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींच्या माध्यमातून, समुदाय, समभागधारक व कर्मचाऱ्यांसाठी, प्रचंड मूल्यनिर्मिती होणार आहे. 2025 सालापर्यंत, 30 ते 50% सीएजीआरवर, आपले उत्पन्न दुप्पट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, यासाठी इलेक्ट्रिक व्हेइकल्स, हाय टेक, उत्पादन, एअरोस्पेस संरक्षण व अवकाश आदी क्षेत्रांना उत्पादन विकासात सहाय्य करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
VIAS3Dचे ग्लोबल सीईओ सुमंथ कुमार नमूद करतात, “या नवीन अधिग्रहणाद्वारे आमची सोल्युशन्स व सेवांचा भारतात विस्तार करणे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे. भारतातील उच्च दर्जाचे तांत्रिक तज्ज्ञ नियुक्त करून VIAS3Dने उद्योगक्षेत्रात ठसा उमटवला आहे. विविध औद्योगिक प्रक्रियांचे सखोल ज्ञान असलेल्या, अमेरिका व मेक्सिकोतील मुरब्बी जागतिक इंजिनीअरिंग टीम्सचे पाठबळ त्यांना आहे. इंजिनीअरिंग समुदायाला जागतिक मूल्य पुरवण्यासाठी आम्ही कॅडमार्कच्या टीमचे खुल्या दिलाने स्वागत करत आहोत”. या अधिग्रहणामुळे नवोन्मेषकारी कंपन्यांना सर्वोत्तम उत्पादन विकास सोल्युशन्सचा स्वीकार करण्यात मदत होणार आहे. संयुक्त ग्राहकवर्गामुळे VIAS3Dची व्याप्ती खासगी कंपन्यांपासून सरकारी क्षेत्रांनाही सेवा व उत्पादने पुरवण्यापर्यंत वाढेल,” असे ते पुढे म्हणाले.
कॅडमार्कचे संस्थापक मनमधन एमके म्हणाले, “कॅडमार्क सॉफ्टवेअर आणि VIAS3D समान तत्त्वांचे अनुसरण करतात. ग्राहकांना प्रथम प्राधान्य देणे आणि त्यांना यशस्वी दोण्यासाठी सखोल तांत्रिक कौशल्य पुरवणे ही ती तत्त्वे आहेत. VIAS3D आमच्या क्लाएंट्सना भक्कम ग्राहकसेवा व अवधान पुरवत राहील असा ठाम विश्वास आम्हाला वाटतो.”
3Dएक्स्पिरिअन्स प्लॅटफॉर्मवरील प्रगत कौशल्यासह डॅसॉल्ट सिस्टम्सचा सिम्युलिया व कॅटिया उत्पादन संचातील समृद्ध अनुभव यांमुळे हे अधिग्रहण भारतातील सध्याच्या ग्राहकांसाठी सशक्त सहयोगी सहाय्य पुरवू शकेल.
आपल्या एकात्मिक इंजिनीअरिंगमधील सोल्युशन्स व सेवांच्या स्वरूपातील उत्पादनांच्या माध्यमातून, आभासी रचना व डेटा विश्लेषणाचा वापर करून, विविध क्षेत्रातील उत्पादन विकास प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करण्याच्या VIAS3Dच्या धोरणाशी हे अधिग्रहण सुसंगत आहे.