जस्टडायल एमएसएसआयडीसीबरोबर धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लघुउद्योग आणि हस्तकारागीरांचे व्यवसाय डिजिटल करणार

67

मुंबई : जस्टडायल या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या हायपरलोकल सर्च इंजिनने महाराष्ट्र सरकारअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसह (एमएसएसआयडीसी) धोरणात्मक भागिदारी केली आहे. या भागिदारीच्या माध्यमातून एमएसएसआयडीसीअंतर्गत नोंदणी केलेले लघुउद्योग (स्मॉल स्केल इंडस्ट्रीज- एसएसआय) आणि हस्तकारागीरांना त्यांचे डिजिटल अस्तित्व तयार करण्यासाठी मदत केली जाईल. जस्टडायल या व्यवसायांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात ऑनलाइन अस्तित्व उभारण्यासाठी मदत करेल तसेच त्यांच्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत व्यवसाय यंत्रणा उभारेल.

या भागिदारीचा एक भाग म्हणून एमएसएसआयडीसी प्रमाणित व्यवसायांना व्हेरीफाइड टॅग्ज दिले जातील व त्यांचे परवाने जस्टडायलच्या प्लॅटफॉर्मवर दर्शवले जातील. यामुळे या व्यवसायांची विश्वासार्हता आणि दृश्यमानता वाढेल. पर्यायाने त्यांच्या व्यवसायांना जास्तीत जास्त संभाव्य ग्राहक व गुंतवणुकदारांपर्यंत पोहोचणे शक्य होईल तसेच नव्या बाजारपेठेत प्रवेश करता येईल.

या सहकार्याविषयी जस्टडायलचे उपाध्यक्ष श्री. श्वेतांक दीक्षित आपला आनंद व्यक्त करत म्हणाले, ‘जस्टडायलने कायमच भारतातील लघुउद्योग क्षेत्राला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या भागिदारीच्या माध्यमातून आणि एमएसएसआयडीसीसह काम करत आम्ही त्यांचे व्यवसाय यंत्रणेचा विकास व प्रचार करण्याचे ध्येय साकारण्यासाठी मदत करणार आहोत. एमएसएसआयडीसी प्रमाणित उद्योगांना डिजिटल अस्तित्व तयार करण्यासाठी पाठिंबा देणे हे आमचे ध्येय असून त्याद्वारे त्यांना आपले कामकाज विस्तारण्यास व मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे त्यांना शक्य होईल.’

महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे भारतातील आघाडीचे महामंडळ सातत्याने लघुउद्योगांना विस्तार करण्यासाठी व त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. महामंडळातर्फे त्यांच्यासाठी विविध सेवा दिल्या जात असून त्यात लघु उद्योगांना बाजारपेठ मिळवून देणे व हस्तकारागीरांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे यांचा समावेश आहे.

या भागिदारीविषयी महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ‘एमएसएसआयडीसीअंतर्गत नोंदवलेले लघुउद्योग आणि हस्तकारागीरांचे डिजिटल अस्तित्व उंचावण्यासाठी जस्टडायलसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागिदारीमुळे या व्यवसायांना त्यांचे ऑनलाइन अस्तित्व विस्तारणे तसेच विकासाच्या संधी वाढवणे शक्य होईल.’

जस्टडायलच्या बाजारपेठेतील सखोल व्याप्तीमुळे पात्र लघुउद्योगांना जेडी मार्ट हा भारतातील वेगाने विकसित होत असलेला बीटुबी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल.

जस्टडायल आणि एमएसएसआयडीसी यांच्यातील भागिदारीमुळे पुरेशी माहिती उपलब्ध नसण्याच्या आव्हानावर मात करता येईल, पात्र लघुउद्योग व हस्तकारागीरांना पॅन भारतातील बाजारपेठांत प्रवेश करता येईल व त्यांना शाश्वत विकास साधणे शक्य होईल. सार्वजनिक- खासगी क्षेत्राच्या भागिदारीच्या माध्यमातून राज्यात व्यवसाय करण्याची सुलभता वाढवणे, उद्योजकतेला पाठिंबा देणे आणि शाश्वत व्यवसाय यंत्रणा तयार करणे हे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे.