एम्प्लॉयबिलिटी.लाईफच्या अनोख्या पुढाकाराने जगभरातील शिक्षणतज्ज्ञांकडून आधुनिक शिक्षण व रोजगार निर्मितीसंबंधी पुण्यात मंथन

143
Employability.life sets global talent agenda at high-level session in Pune
पुणे,  २५ जानेवारी  २०२३ : नाविन्यपूर्ण शिक्षण देणाऱ्या एम्प्लॉयबिलिटी.लाईफ या संस्थेने आज फेडरेशन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया येथील प्रमुख व्यक्तींना उद्योग व शिक्षणक्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधींशी उच्चस्तरीय चर्चेकरिता पुण्यात आमंत्रित केले. विश्वकर्मा इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) येथे ही चर्चा झाली. यावेळी नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी प्रतिभांची निर्मिती आणि पदवीधर व व्यावसायिकांसाठी कमाल रोजगारक्षमता कायम ठेवणे याबाबत चर्चा झाली.
सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्यांसाठी नोकरी देणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करून शिकाऊ विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी या प्रतिष्ठित संस्थेत टॅलेंट इनक्यूबेटर स्थापन करण्याची एम्प्लॉयबिलिटी.लाईफचे अधअयक्ष डॉ. मनीष मल्होत्रा यांनी केलेल्या घोषणेने या सत्राची सुरूवात झाली. बंसीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे (व्हीआयआयटीची मालक व व्यवस्थापन करणारी संस्था) व्यवस्थापक विश्वस्त श्री. भारत राजकुमार अगरवाल यांनी या घोषणेचे स्वागत केले. कौशल्य विकास आणि प्रकल्प आधारित शिक्षणाच्या संधींच्या दृष्टीने उद्योग व शिक्षणक्षेत्रातील संबंधामुळे घडणाऱ्या परिवर्तनावर त्यांनी प्रकाश टाकला.
यानंतर विशेष पाहुणे व फेडरेशन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चँसेलर व अध्यक्ष डंकन बेटली यांनी संवाद साधला. डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांना कशी द्यावीत, हे भारतापुढे आज आव्हान असल्यावर त्यांनी भर दिला. अर्थव्यवस्था संकटात असताना विद्यार्थी संस्थेला – इंटर्नशिप, प्रकल्प आणि शिकण्याच्या प्रक्रियेतून – मूल्य कसे देऊ शकतील जेणेकरून त्यांच्या करियरला बळ मिळेल यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे घडवावे, याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
यानंतर एम्प्लॉयबिलिटी.लाईफचे सीईओ सुप्रियो चौधरी यांनी नोकऱ्यांच्या स्वरूपात झालेल्या मुलभूत बदल आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंगी बाळगण्याच्या व्यावसायिक आत्मविश्वासाची गरज यांबाबत भाष्य केले. विद्यार्थ्यांनी आपल्या करियरचा विकास करत असताना आत्मविश्वास वाढवून स्वतःला नवे रूप देण्यासाठी मदत करण्यासाठी नवीन मौलिक साक्षरतेवर त्यांनी भर दिला. यामध्ये वाढीची मानसिकता बाळगणे, करियर, संस्कृती व डिजिटल या बुद्धिमत्तेच्या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकास करणे आणि प्रभाव वाढवणे (सहकार्य, नेटवर्किंग) यांचा समावेश आहे.
यानंतर, फेडरेशन युनिव्हर्सिटीच्या डेप्युटी व्हाईस-चँसेलर (ग्लोबल अँड एंगेजमेंट) मिस कॅरोलिन चोंग, झेन्सार टेक्नॉलॉजीजच्या बीएफएस  चे ग्लोबल हेड ऑफ कन्सल्टिंग श्री. आशुतोष शर्मा, फ्लेक्ससी वर्क्सचे संस्थापक आणि सीईओ श्री. गिरीश कुकरेजा आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या वरिष्ठ उपाध्यक्ष मिस मिनो मंत्री अशा दिग्गजांनी डिजिटल क्रांतीचा त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये कोणत्या पद्धतीने बदल घडत आहे यावर भाष्य केले.
डिजिटल हे आता प्रत्येक क्षेत्राशी जोडलेले असल्यामुळे शिकणार्‍यांनी अनुभवात्मक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे जेणेकरून ते लवचीक बनून  क्रांतिकारक बदल घडलेल्या उद्योगाशी जुळवून घेण्यास सक्षम बनतील. याशिवाय, कामाच्या बदलत्या जगात सुसंगत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ क्षमतेमध्ये कौशल्यांची भर घालत राहावी, हा एक साधा उपाय आहे, असा सर्वसाधारण सूर यावेळी उमटला.
फेडरेशन युनिव्हर्सिटीचे व्हाईस चँसेलर व अध्यक्ष डंकन बेटली म्हणाले, “जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे सहकारी शिक्षणाचे मॉडेल २०२५ पासून फेडरेशनच्या सर्व कार्यक्रमांमध्ये अंतर्भूत केले जाणार असून ऑस्ट्रेलियात हे प्रथमच घडत आहे. त्यामुळे एम्प्लॉयबिलिटी.लाईफसोबत या धोरणात्मक भागीदारीत प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेली डिजिटल-साक्षर प्रतिभा तयार करण्यात मदत करण्यासाठी शिक्षक, नोकरी देणारे आणि शिकणारे यांना एकत्र आणणारी जागतिक सहकारी इकोसिस्टम तयार करण्याच्या त्यांच्या मिशनला आम्ही मदत करू. आमचे भारताशी दीर्घकालीन संबंध आहेत. जगाची कौशल्य राजधानी बनण्याची त्याचे स्वप्न साकार करण्यात स्वतःची भूमिका बजावण्यास आम्ही उत्सुक आहोत.” “याशिवाय, या सहकार्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना आयबीएम उदयोन्मुख तंत्रज्ञान केंद्रातील प्रकल्पांना तसेच बॅलारात,  व्हिक्टोरिया येथील फेडरेशनच्या कॅम्पसमध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या विद्यापीठ टेक्नॉलॉजी पार्कला भेट देण्याची आणि काम करण्याची संधी मिळेल.”
एम्प्लॉयबिलिटी.लाईफचे अध्यक्ष डॉ. मनीष मल्होत्रा म्हणाले, “भारतातील तरुणांनी उत्पादक आणि अर्थपूर्णपणे काम करण्यावरच भारताचे ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न  अवलंबून आहे. एम्प्लॉयबिलिटी.लाईफ ही  देशातील सर्वात प्रगतिशील विचार करणाऱ्या करणाऱ्या शिक्षण संस्था आणि उद्योजक, शिक्षक आणि नोकरी देणाऱ्यांच्या जागतिक नेटवर्कसह भागीदारीत काम करत असून आपल्या देशाला त्या ध्येयाकडे नेण्यासाठी त्यांच्या सक्षम बनवावे, अशी तिची इच्छा आहे.
एम्प्लॉयबिलिटी.लाईफचे सीईओ श्री. सुप्रियो चौधरी म्हणाले, “एम्प्लॉयबिलिटी.लाईफ ही शिक्षणात अनुभव आणते. प्रकल्प-आधारित शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण सहभाग आणि त्यांच्या विकासासाठी संपूर्ण व्यक्तीकडे पाहण्याच्या दृष्टीतून उच्च शिक्षणसंस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणते. आम्ही शिक्षणात लवचिकता आणत आहोत आणि कामाचे भविष्य व उच्च शिक्षणाचे भवितव्य यांचा मिलाफ घडवून आणत आहोत.”