चांगल्या श्वसनक्रियेसाठी काही चांगले सल्ले: मान्सूनच्या काळात श्वसनसंस्थेचे आरोग्य जपताना

20

पुणे : मान्सूनचा काळ जवळ आला की, अस्थमासोबत जगणाऱ्या लोकांसाठी श्वसनसंस्थेशी निगडित कितीतरी त्रास सुरू होतात. हवामानात झालेल्या या बदलांमुळे सर्वत्र राहून जाणारी ओल, बुरशी, थंड हवा आणि विषाणूसंसर्गाची वाढलेली शक्यता अशा दमा बळावण्यासाठी निमित्त ठरणाऱ्या गोष्टींचे प्रमाण वाढते व त्यातून धाप लागणे, छातीतून घरघर आवाज येणे अशा प्रकारची लक्षणे तीव्र होतात व त्यातून अस्थमाचा अटॅक येऊ शकतो.खरेतर, वादळी पावसानंतर तीव्र ब्रॉन्कोस्पॅझमसह (यात फुफ्फुसांच्या वायूमार्गाचे स्नायू ताठर होतात) अस्थमाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे व त्यातूनच या स्थितीला ‘थंडरस्टॉर्म अस्थमा’असे नावही मिळाले आहे.

पुणे येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. नाना गोकुळ कुंजीर म्हणाले, “अस्थमाही एक दीर्घकाळ चालू राहणारी दाहकारक स्थिती आहे. या स्थितीसह जगणारी व्यक्ती जेव्हा अॅलर्जीस कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींच्या अतीसंपर्कात येते तेव्हा त्यांच्या वायूमार्गाच्या आधीच सुजलेल्या स्नायूंना आकडी येते व श्वास घेणे अधिकाधिक कठीण होत जाते. अस्थमा असलेल्या लोकांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णाच्या दैनंदिन आयुष्यात अस्थम्याच्या बळावणाऱ्या लक्षणांना त्वरितप्रतिसाद देण्यासाठी आणि आजाराचा प्रभाव परिणामकाररित्या किमान पातळीवर आणण्यासाठी धोक्याची चिन्हे लवकरात लवकर ओळखण्यास आवश्यक ते ज्ञान मिळविले पाहिजे.”

योग्य उपचारपद्धतीचे नियमितपणे पालन करणे व डॉक्टरांच्या शिफारशीनुसार इन्हेलरचा वापर करणे हे अस्थमाच्या रुग्णांसाठी आपली स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी व ऋतूबदलानुसार होणारे बदल सहजतेने स्वीकारण्यासाठी अत्यावश्यक आहे. इन्हेलेशनची उपकरणे औषधांना थेट वायूमार्गात फुफ्फुसांत पोहोचवतात, त्यांचे कमी डोस लागतात आणि औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे गंभीर स्थिती हाताळण्याच्यावेळी अशा औषधांनी लक्षणीय फरक पडू शकतो.

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या उपचारपद्धतीव्यतिरिक्त काही इतर खबरदारीच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे:

  1. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्या आणि आपला भोवताल स्वच्छ ठेवा. आपला भोवताल स्वच्छ आणि हवेशीर ठेवा – यात मान्सूनच्या आधी एसीचे डक्ट स्वच्छ करून घेणे, कपडे बाहेर किंवा ड्रायरच्या मदतीने वाळविणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. वारंवार हात धुण्याची सवय लावून घ्या, बाहेर जाताना चेहऱ्यावर मास्क लावा आणि बाहेर वादळी पावसाच्या दिवसांत घराबाहेर पडू नका म्हणजे अॅलर्जीकारक गोष्टी व विषाणूंसारख्या लक्षणे बळावण्यास निमित्त ठरणाऱ्या गोष्टींशी फारसा संबंध येणार नाही.
  2. पीक फ्लो मीटरच्या मदतीने आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्यावर लक्ष ठेवाहातात धरून वापरायच्या या उपकरणाच्या मदतीने आपल्या फुफ्फुसांची क्षमता आणि वायूमार्ग किती प्रमाणात खुले आहेत, याचे मोजमाप करता येते.
  3. अस्थम्याची उबळ येण्यास निमित्त ठरणाऱ्या गोष्टी व्यक्तिगणिक वेगवेगळ्या असतात व कालपरत्वे त्यांत बदल होऊ शकतो. अशा अस्थम्यास कारणीभूत ठरणाऱ्या निमित्तांवर देखरेख ठेवा,कारण त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना तुमच्या विशिष्ट गरजांनुसार उपचारांचे नियोजन करण्यास मदत होईल. अस्थमाग्रस्त व्यक्तींपाशी औषधोपचार, सूचना, स्थिती गंभीर होण्याचीची पातळी, निमित्ते इत्यादी गोष्टींचे तपशील हवेत. यामुळे त्यांना लक्षणे आटोक्यात ठेवता येतात, उबळ येण्यास निमित्त ठरणाऱ्या गोष्टी ओळखता येतात व त्याचा माग घेता येतो, तसेच ही स्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपायही हाती घेता येतात.
  4. अस्थमाग्रस्त व्यक्तींच्या बाबतीत न्यूमोनियास कारणीभूत ठरू शकतील अशा श्वसनसंस्थेच्या संसर्गांचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस घ्या आणि न्यूमोकोक्कल न्यूमोनिया लस घ्या.

डॉ नाना गोकुळ कुंजीर पुढे म्हणाले, “आजाराविषयीची मर्यादित जागरुकता आणि इन्हेलेशन थेरपीविषयीचे गैरसमज यांमुळे अस्थम्याभोवती भ्रामक समजुती आणि लांच्छनांचे जाळे पसरलेले दिसते. यामुळे आजाराचे योग्य निदान होत नाही, उपचारांस विलंब होतो किंवा अपुरे उपचार घेतले जातात किंवा काही रुग्ण उपचाराविनाच राहतात. रुग्णांनी या आजाराला समजून घ्यावे आणि डॉक्टरांनी सांगितलेले उपचार घ्यावेत यासाठी जाणीवजागृतीचे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

गेल्या अर्ध्या दशकापासून अधिक काळासाठी #BerokZindagiमोहिमेने अस्थमाभोवतीच्या भ्रामक समजुती दूर करण्याच्या, इन्हेलरच्या स्वीकारास प्रोत्साहन देण्याच्या आणि देशभरातील अस्थमाच्या रुग्णांना बदल घडवून आणण्याची प्रेरणा देण्याच्या आपल्या ध्येयाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या कन्टेन्टप्रकारांचा वापर केला आहे. अशाच आणखी एका सर्जनशील माध्यमाचा शोध घेत भारताच्या काही आघाडीच्या शॉर्ट-फॉर्म कन्टेन्ट चॅनल्सपैकी एक असलेल्या फिल्टरकॉपी चॅनलवर शॉर्ट-व्हिडीओंची एक मालिका सुरू करत ही मोहीम आपले ध्येय अधिक विस्तृत प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवणार आहे.