चंद्रकांत पाटील, श्रेयस तळपदे यांच्या हस्ते आज (दि. २२) ‘विनर’च्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

62
Chandrakant Patil, Shreyas Talpade felicitated the students of 'WINNER' today (22nd)
पुणे : देशातील नामवंत बँकिंग इन्स्टिट्यूट असलेल्या विनर इन्स्टिट्यूटच्या वतीने विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ आयोजिला आहे. उद्या शनिवारी (दि. २२) ४ ते ९ या वेळेत नवी पेठ येथील इंदुलाल कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे, असे विनर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय सात्यकी यांनी सांगितले.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते या समारंभाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे असणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, लोकसेवा पब्लिकेशनचे आप्पा हातनुरे, जयश्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक जयराज हाडके, विनर इन्स्टिट्यूटच्या चेअरपर्सन मृदुल मेश्राम आदी उपस्थित राहणार आहेत.

विनर इन्स्टिट्यूट बँकिंगसह इतर अनेक सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम शिकवणारी अग्रणी संस्था आहे. गेल्या १२ वर्षात संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एसबीआय, पीओ, आरबीआय, एसएससी, कॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली आहे.