ग्लेनमार्क फार्मा आणि ओमरॉन हेल्थकेयर इंडिया यांची भागीदारी भारतामध्ये युवा प्रौढांकडून हायपरटेन्शनकडे दुर्लक्ष केले जाण्याच्या समस्येविरोधात लढणार

23
Glenmark Pharma and Omron Healthcare India

पुणे, ऑगस्ट, २०२३: आघाडीची, एकात्मिक, संशोधनावर आधारित काम करणारी, जागतिक फार्मास्युटिकल कंपनी ग्लेनमार्क फार्मा आणि ओमरॉन हेल्थकेयर इंडिया फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) ओमरॉन हेल्थकेयर इंडियासोबत हातमिळवणी केली आहे. ओमरॉन हेल्थकेयर इंडिया ही घरच्या घरी रक्तदाब मॉनिटर करण्याच्या सुविधा तसेच कार्डिओवस्क्युलर आजारांवरील उपचार योजना क्षेत्रातील जागतिक पातळीवरील जपानी कंपनीची भारतीय उपकंपनी आहे. १८ वर्षे वयापासून घरच्या घरी रक्तदाब मोजणे सुरु करणे आवश्यक असल्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्र मिळून काम करण्याचे ग्लेनमार्क व ओमरॉन हेल्थकेयर यांनी ठरवले आहे.

रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याचे योग्य वय किती याबाबत विशेष मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्यामुळे रक्तदाब मोजण्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यामुळे अनेक व्यक्ती हायपरटेन्शन व त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींना बळी पडतात. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्लेनमार्कने भारतभरातील ९४ कार्डिओलॉजिस्ट्ससोबत चर्चा करायला सुरुवात केली, त्यामध्ये सर्वांचे असे मत होते की रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याचे योग्य वय १८ वर्षे आहे. २०२० मध्ये असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या (जेएपीआय) जर्नलमध्ये तज्ञांनी एकमताने व्यक्त केलेले हे विधान प्रकाशित करण्यात आले होते[i].

ग्लेनमार्क आणि ओमरॉन हेल्थकेयर इंडियाने एकत्रितपणे हाती घेतलेल्या उपक्रमाचे नाव “ टेक चार्ज @ १८” असे आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन या उपक्रमामार्फत तयार केले जाणार आहे. त्यासाठी भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ओमरॉन ब्लड प्रेशर मॉनिटरसोबत एक इन्ले कार्ड दिले जाईल. योग्य वयापासून म्हणजेच १८ व्या वर्षापासून रक्तदाब तपासणी करण्यास सुरुवात करण्याचे महत्त्व या संदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे इन्ले कार्ड जे वाचतील अशा सर्व रुग्णांनी तसेच त्यांची काळजी घेणाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील १८ तसेच त्यापेक्षा जास्त वयाच्या सदस्यांना रक्तदाब मोजण्यास सुरुवात करण्याबाबत तसेच रक्तदाब मोजणे हा आरोग्यासाठी पाळल्या जाणाऱ्या पथ्याचा एक भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे हा याचा उद्देश आहे. ओमरॉन कनेक्ट ऍपमध्ये देखील हा संदेश समाविष्ट करून सर्व सब्स्क्रायबर्सपर्यंत पोहोचवला जाईल तसेच ओमरॉन सोशल मीडिया व वेबसाईट्सवर देखील त्याला प्रसिद्धी दिली जाईल.

जवळपास ९२,००० हेल्थकेयर प्रोफेशनल्सशी संपर्क साधून आणि त्यांना याबाबत माहिती पुरवून या जागरूकता अभियानाचा प्रभाव अजून जास्त वाढवला जाईल. यामुळे जास्तीत जास्त व्यक्ती लवकरात लवकर वयात रक्तदाब मोजण्यास सुरुवात करतील, परिणामी हायपरटेन्शनविषयी जागरूकता वाढेल. दहा कोटी भारतीयांना जागरूक करण्याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. ‘टेक चार्ज @ १८’ मार्फत हायपरटेन्शनच्या समस्येविरोधात लढण्याची आणि समाज अधिक निरोगी बनवण्याला चालना देण्याची ग्लेनमार्कची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. हार्ट अटॅक्स आणि ब्रेन स्ट्रोक्सच्या घटनांचे प्रमाण शून्यावर जावे यासाठी हायपरटेन्शनचे प्रमाण घटावे, याकरता आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे “गोइंग फॉर झीरो” हे व्हिजन पूर्ण करण्याची ओमरॉनची वचनबद्धता देखील यामधून दिसून येते.

या समन्वयाबाबत ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट व हेड ऑफ इंडिया फॉर्म्युलेशन्स श्री. आलोक मलिक यांनी सांगितले, “हायपरटेन्शन थेरपीमधील आघाडीची कंपनी या नात्याने आम्ही सार्वजनिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव घडवून आणण्यासाठी बांधील आहोत. हायपरटेन्शनविषयी तसेच जास्तीत जास्त लवकर वयामध्ये रक्तदाब तपासणीला सुरुवात करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आमची वचनबद्धता ओमरॉन हेल्थकेयरसोबत आमच्या सहयोगामुळे अधिक मजबूत झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे भारतात युवा प्रौढांमध्ये हायपरटेन्शनचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, जवळपास ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या १० ते ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. प्रत्येक व्यक्तीने तरुण वयापासूनच आपल्या आरोग्याचे रक्षण करावे यासाठी त्यांना सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

ओमरॉन हेल्थकेयर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर तेत्सुया यामादा यांनी सांगितले, “‘टेक चार्ज @ १८’ अभियानासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससोबत करण्यात आलेली भागीदारी आमच्या ‘गोइंग फॉर झीरो’ या व्हिजनला अनुरूप अशीच आहे. स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याच्या हायपरटेन्शनमुळे आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक म्हणून घरच्या घरी नियमितपणे रक्तदाब तपासणीला प्रोत्साहन देणे हा ‘गोइंग फॉर झीरो’चा उद्देश आहे. आमच्या अंतर्गत संशोधनातून असे दिसून आले आहे की, भारतात ब्लड प्रेशर मॉनिटर्सचा उपयोग करणाऱ्या हायपरटेन्सिव्ह रुग्णांचे प्रमाण खूपच कमी म्हणजे फक्त २ टक्के इतकेच आहे. आमची उत्पादने व सेवांसोबत या अभियानाचा संदेश सर्वत्र पसरवून लाखो व्यक्तींना अधिक निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा आम्ही देऊ इच्छितो.”

लवकरात लवकर वयापासून नियमितपणे रक्तदाब तपासणी केल्यास व्यक्तीच्या एकंदरीत आरोग्यावर लक्षणीय दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो. भारतीय युवकांमध्ये हार्ट अटॅक्सचे वाढलेले प्रमाण ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसमावेशक हायपरटेन्शन व्यवस्थापनाविषयी जागरूकता तसेच डेटा मॉनिटरिंग यामुळे भविष्यात कार्डिओव्हस्क्युलर आजारांना प्रतिबंध घालण्यात मदत होईल.

२०२३ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या एका संशोधनानुसार, हायपरटेन्शनच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे. २०१४ मध्ये २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये हायपरटेशनचे प्रमाण २९.८ टक्के होते जे आता ३५.५ टक्के इतके वाढले आहे. शहरी भागांमध्ये हे प्रमाण अजून जास्त म्हणजे ४०.७ टक्के आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास अर्ध्या लोकांना हे माहितीच नाही की त्यांना हायपरटेन्शन आहे. आपल्याला हायपरटेन्शन आहे