पुणे , २१ डिसेंबर २०२२ : नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही अनियंत्रित टाईप-2 मधुमेह असलेल्या, विशेषतः अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी, प्योग्लिटाझोन आणि मेटफॉर्मिन यांच्यासह टेनेलिग्लिप्टिन यांचे ट्रिपल फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन सादर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. टेनेलिग्लिप्टिन हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डीपीपी४आय (डिपेप्टिडायल पेप्टिडेज ४) इनहिबिटर आहे. हे एफडीसी झिटा -पियोमेट या ब्रँड नावाने सादर करण्यात आले असून त्यात टेनेलिग्लिप्टिन( २० मिग्रॅ) +प्योग्लिटाझोन(१५ मिग्रॅ) + मेटफॉर्मिन(५०० मिग्रॅ / १००० मिग्रॅ) हे सस्टेन्ड रिलीज फॉर्म्युलेशननुसार समाविष्ट आहेत. यामुळे टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांना ग्लायसेमिक नियंत्रणासाठी आणि 2४ आठवड्यांच्या अंतर्गत लक्षित एचबीए१सी गाठण्यासाठी दररोज एकदा सेवन करण्याची सुविधा प्रदान करते.
- टेनेलिग्लिप्टिन(२० मिग्रॅ) + प्योग्लिटाझोन(१५ मिग्रॅ) + मेटफॉर्मिन(५०० मिग्रॅ/ १००० मिग्रॅ) यांचे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (एफडीसी) झिटा ®-पियोमेट या ब्रँड नावाने येणार
- नवीनट्रिपल एफडीसी ज्यांचा मधुमेह केवळ मेटफॉर्मिनने नियंत्रित करता येत नाही आणि ज्यांना वेगळे औषध म्हणून अतिरिक्त टेनेलिग्लिप्टिन आणि प्योग्लिटाझोन यांची गरज असते अशा अधिक एचबीए१सी [i] आणि अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांमध्ये, ग्लायसेमिक नियंत्रणास मदत करेल, त्यामुळे एकाच गोळीची गरज भासते.
- दर दिवशी १४. ९० रुपये या तिच्या किमतीमुळे उपचारांचा खर्च ४० टक्के नी कमी होतो, त्यामुळे सर्वसामान्यांना ती अधिक परवडणारी ठरते.
या प्रसंगी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले, भारतातील टाईप २ मधुमेही रुग्णांना इन्शुलिन विरोधासोबतच बीटा सेल निकामी होण्याची समस्या भेडसावते. खरे तर भारतात जागतिक १५ टक्के (ii) च्या तुलनेत इन्शुलिन विरोध अधिक असण्याचे प्रमाण ३८ टक्के आहे. भारतातील मधुमेहाच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी या नात्याने अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी फिक्स्ड डोज ट्रिपल एफडीसी असलेले झिटा -पियोमेट सादर करताना आम्हाला आनंद होतो. हे नाविन्यपूर्ण, परिणामकारक आणि परवडणारे औषध एचबीए१सी अधिक असलेल्या प्रौढ रुग्णांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास मदत करेल.
मधुमेह क्षेत्रामध्ये ग्लेनमार्कची आघाडी
मधुमेही रुग्णांसाठी विशेषतः टाईप २ मधुमेह असलेल्यांसाठी नवीन, परिणामकारक आणि परवडणारे उपचार पर्याय उपलब्ध करून देण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे. ग्लेनमार्क ही २०१५ मध्ये टेनेलिग्लिप्टिन (झीटा प्लस आणि झिटेन हे डीपीपी४ इनहिबिटर आणि त्यानंतर टेनेलिग्लिप्टिन + मेटफॉर्मिन हे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (झिटा-मेट प्लस आणि झिटेन-एम) सादर करणारी पहिली कंपनी होती. ग्लेनमार्कने नंतर रेमोग्लिफ्लोझिन (रेमो आणि रेमोझेन) हे अनोखे एसजीएलटी – २ इनहिबिटर २०१९ मध्ये सादर केले होते. त्यानंतर मेटफॉर्मिन आणि विल्डाग्लिप्टिन ((रेमो-व्ही, रेमोझेन -व्ही, रेमो-एमव्ही आणि रेमोझेन एमव्ही) यांच्यासोबतची मिश्रणे सादर केली होती. याआधी २०२२ मध्ये ग्लेनमार्कने सिटाग्लिप्टिन (सिटाझिट) आणि त्याचे फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन व त्यानंतर लोबेग्लिटाझोन (एलओबीजी) आणि टेनेलिग्लिप्टिनचे एफडीसी सादर केले होते. यात त्याचे प्योग्लिटाझोन (झिटा-प्यो) आणि डॅपाग्लिफ्लोझिन (झिटा-डी) यांच्याशी मिश्रणाचाही समावेश आहे.
भारतातील मधुमेह
आयक्यूव्हीआयए यांच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये संपलेल्या १२ महिन्यांच्या विक्रीच्या माहितीनुसार, भारतातील तोंडाने घ्यायच्या मधुमेहविरोधी औषधाची बाजारपेठ अंदाजे ११८७७ कोटी रुपयांची असून त्यात मागील वर्षीच्या नोव्हेंबर २०२१) त्याच अवधीच्या तुलनेत वार्षिक ६.३ टक्के वाढ झाली. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) माहितीनुसार, भारतात २०४५ पर्यंत १२ कोटी ५० लाख लोकांना मधुमेह होऊ शकतो. त्यांपैकी ७७ टक्के रुग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह असेल.