पुणे, २२ जानेवारी २०२३ : नाविन्यावर आधारित आणि जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लि. (ग्लेनमार्क) हिने हृदयविकारावरील सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान गोळ्या भारतात सादर केल्या आहेत. सॅक्यू व्ही या ब्रँड नेमसह सादर केलेल्या या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्किप्शननुसार दिवसातून दोनदा घेणे आवश्यक आहे. त्याचे मान्यताप्राप्त इंडिकेशन हे कमी इंजेक्शन फ्रॅक्शनसह क्रॉनिक हार्ट फेल्यर हृदयविकाराशी संबंधित मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका कमी करते.
· सॅक्यू व्ही या ब्रँड नेमसह सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान आल्यामुळे हृदयविकारावरील उपचाराचा खर्च होणार कमी
· हृदयविकाराशी संबंधित मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका कमी होण्यास या औषधाने होते मदत
या सादरीकरणाच्या प्रसंगी ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिया फॉर्मॅल्यूशन्सचे बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले, भारतात हृदयविकार चिंताजनक वेगाने वाढत आहे. सध्या तो १% आहे आणि सुमारे ८० लाख ते १ कोटी लोक त्याने त्रस्त आहेत. सॅक्यू व्ही सादर करून आम्ही रुग्णांना एक प्रगत आणि किफायती असा उपचाराचा पर्याय उपलब्ध करून देत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे हृदयविकाराशी संबंधित मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका कमी होत असल्याचे आणि कमी इजेक्शन फ्रॅक्शनसह हार्ट फेल्यरशी संबंधित लक्षणांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे.”
सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान हे मिश्रण एआरएनआय या वर्गातील आहे. या रेणूंचे हार्ट फेल्यरमध्ये उपचारांचे दोन लक्ष्य असतात १) सॅक्युबिट्रिलसाठी नॅट्रियूट्रीक पेप्टाईड (एनपी) आणि २) वॅल्सार्टानसाठी रेनिन अँजियोटेन्सिन सिस्टिम. कमी इजेक्शन फ्रॅक्शनसह हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये सॅक्युबिट्रिल + वॅल्सार्टान याची भूमिका सिद्ध झालेली आहे. युरोप आणि अमेरिकेत उपचारांच्या सर्वात ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्येही त्याची शिफारीस करण्यात आली आहे.
ग्लेनमार्कच्या सॅक्यू व्हीची किंमत ५० एमजी डोससाठी (सॅक्युबिट्रिल २४ एमजी + वॅल्सार्टान २६ एमजी) प्रति गोळी १९ रुपये, १०० एमजी डोससाठी (सॅक्युबिट्रिल ४९ एमजी + वॅल्सार्टान ५१ एमजी) प्रति गोळी ३५ रुपये आणि २०० एमजी डोससाठी (सॅक्युबिट्रि
आयक्यूव्हीआयए यांच्या डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या १२ महिन्यांच्या विक्रीच्या माहितीप्रमाणे (एसएसए एमएटी), कार्डियोलॉजी बाजारपेठेचा एकूण आकार २०,७३० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (एमएटी डिसेंबर २०२१) त्यात वार्षिक ७.७% वाढ होण्याचा अंदाज आहे. एआरएनआय ( सॅक्युबिट्रिल+