केमोथेरपीमुळे उद्भवणाऱ्या मळमळ आणि उलट्यांना प्रतिबंध करणारे पहिले फिक्स्ड आय. व्ही. अँटीएमेटिक कॉम्बिनेशन
पुणे २७ जानेवारी २०२३ : नाविन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) ही केमोथेरपीमुळे उद्भवणाऱ्या मळमळ आणि उलट्यांना (सीआयएनव्ही) प्रतिबं
- फॉस्नेटुपिटंट (२३५ एमजी) आणि पॅलोनोसेट्रॉन (०.२५ एमजी) यांचे फिक्स्ड डोस मिश्रण असलेले अकिंजिओ आय. व्ही. हे सिंगल–डोस, रेडी–टू–डायल्युट आय. व्ही. इंजेक्शन म्हणून उपलब्ध होईल
- केमोथेरपीमुळे उद्भवणाऱ्या मळमळ आणि उलट्यांच्या तीव्र तसेच मंद या दोन्ही टप्प्यांना ते प्रतिबंध करते
- अकिंजिओ आय. व्ही. हे हेलसिन आणि ग्लेनमार्कने विकसित केले असून भारतात या उत्पादनाच्या मार्केटिंगचे अधिकार केवळ ग्लेनमार्ककडे आहेत
अकिंजिओ आय. व्ही. हे फॉस्नेटुपिटंट (२३५ एमजी) आणि पॅलोनोसेट्रॉन (०.२५ एमजी) यांचे फिक्स्ड डोस मिश्रण असून ते रेडी–टू–डायल्यूट आयव्ही इंजेक्शन म्हणून उपलब्ध होणार आहे. प्रत्येक केमोथेरपी सायकल सुरू होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी हे एकदाच द्यायचे असून त्यामुळे केमोथेरपीमुळे उद्भवणाऱ्या मळमळ आणि उलट्यांच्या
(सीआयएनव्ही) तीव्र तसेच मंद या दोन्ही टप्प्यांना ते प्रतिबंध करते. हे औषध युरोपीय महासंघ, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये अगोदरच विकले जात आहे.
या लाँचच्या प्रसंगी लॉन्च प्रसंगी, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिया फॉर्म्युलेशन्स बिझनेस हेड आलोक मलिक म्हणाले, “ग्लेनमार्कमध्ये आम्ही कर्करोगावरील उपचारांमध्ये रुग्ण आणि डॉक्टरांना मदत करण्याच्या आमच्या प्रयत्नांवर आम्ही ठाम आहोत. केमोथेरपी हा कर्करोगावरील उपचारांचा सर्वात सामान्य प्रकार असून मळमळ आणि उलट्या हे त्याचे दोन सर्वात मोठे दुष्परिणाम आहेत. अकिंजिओ आय. व्ही. हे सोईचे, सिंगल–डोस, रेडी–टू–डा
हेलसिन ग्रुपचे सीईओ जियोर्जिओ कॅलडेरारी म्हणाले, “अकिंजिओ आय. व्ही. भारतातील केमोथेरपी घेत असलेल्या आणि सीआयएनव्हीचा धोका असलेल्या रूग्णांसाठी एक नवीन रोगप्रतिबंधक पर्याय देईल. या देशात उत्कृष्ट प्रसार असलेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचारांचे पर्याय देण्याचा विश्वास असलेल्या ग्लेनमार्कशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
कॅन्सर सपोर्टिव्ह केअर थेरपीमध्ये ग्लेनमार्कची आघाडी
नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री प्रोग्रामच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात २०२० मध्ये कर्करोगाचे १३.९ लाख रुग्ण असून २०२५ पर्यंत त्यात १२.८ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. भारतातील कर्करोगाच्या रुग्णांना सीआयएनव्हीसाठी नवीन आणि प्रभावी रोगप्रतिबंधक उपचार पर्याय उपलब्ध करून देण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वी, ग्लेनमार्कने पहिले एनके 1 रिसेप्टर ब्लॉकर अॅप्रेकॅप (अॅप्रेपिटंट कॅप्सुल्स) सादर केले होते. त्यानंतर काही वर्षांनी, अॅप्रेकॅप आयव्ही इंजेक्शन सादर केले. त्यानंतर २०१८ मध्ये, ग्लेनमार्कने अकिंजिओ ओरल कॅप्सूल देशात कॅन्सर सपोर्टिव्ह केअरमध्ये क्रांती घडवून आणली. एकाच डोसने सीआयएनव्हीच्या तीव्र आणि विलंबित या दोन्ही टप्प्यांना प्रतिबंध करणारी पहिली आणि एकमेव सीआयएनव्ही प्रतिबंधक थेरपी आहे.
हेही वाचा :