गोदरेज समूह आणि एसबीआयने भागीदारी मजबूत करण्यासाठी केली धोरणात्मक सामंजस्य करारावर स्वाक्षरी

62
Godrej Group and SBI sign strategic MoU to strengthen partnership

मुंबई : गोदरेज समूहाची वित्तीय सेवा शाखा असलेली गोदरेज कॅपिटल आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी आज त्यांची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी धोरणात्मक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया विविध आर्थिक उत्पादने आणि योजना प्रदान करेल.

अनेक दशकांपासून एसबीआय, त्यांच्या समूह कंपन्या आणि गोदरेज समूह या दोन्हींनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या भागीदारीमुळे ते राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान पुढेही देत राहतील अशी आशा आहे.

Godrej Group and SBI sign strategic MoU to strengthen partnership
Godrej Capital Logo

या प्रगती विषयी बोलताना गोदरेज कॅपिटलचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “आर्थिक उपाय सुविधा  अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या बनवण्यासाठी ही भागीदारी हे एक मोठे पाऊल आहे. एकत्रितपणे, भारताची विकास गाथा पुढे नेण्यास मदत करत आर्थिक समावेशाच्या संधी खुल्या करण्याचे आणि दीर्घकालीन, शाश्वत सहयोग निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.”

या घोषणेवर बोलताना एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, “गोदरेज कॅपिटलसोबत ही उत्साहवर्धक भागीदारी सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना सक्षम करणार्‍या आणि आमच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती देणार्‍या सहकार्याचा लाभ घेण्याचे आमचे ध्येय आहे. जोडीला, आम्ही गोदरेज समुहाला आर्थिक उपाय सुविधा देण्यावर लक्ष केंद्रित करू.”

हा सहयोग प्राधान्यकृत भागीदार म्हणून बँकिंग उत्पादने, क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन, जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा यासह आणि इतकेच मर्यादित न राहता बँकेद्वारे पुरविलेल्या अनेक वित्तीय सेवांची सुविधा देऊन दोन्ही गटांच्या सामर्थ्याचा लाभ घेते.

गोदरेज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शाह पुढे म्हणाले, “आम्ही देशातील दोन सर्वात नामांकित ब्रँडमधील या भागीदारीबद्दल उत्साहित आहोत. आर्थिक सेवा नेहमीच अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या प्रमुख संकेत राहिल्या आहेत. या दोन समूहांचे एकत्र येणे म्हणजे एक महत्वाचा टप्पा असून शाश्वत संस्था उभारणीसाठी आम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे.”

गोदरेज कॅपिटलने नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या स्थापनेपासून आतापर्यंत गृहनिर्माण, एसएमई आणि एमएसएमई मध्ये ५००० कोटी रुपयांहून अधिक कर्जे वितरित केली आहेत. त्यांनी भारतातील ११ शहरांमध्ये आपले स्थान विस्तारले आहे आणि पुढील १२ महिन्यांत भारतातील ३० शहरांमध्ये आपला ठसा विस्तारण्याचे  उद्दिष्ट ठेवले आहे.