मुंबई, ऑगस्ट २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉइसने जाहीर केले की, भारतातील घर आणि संस्था विभागांमध्ये आघाडीचा फर्निचर ब्रॅंड असलेल्या त्यांच्या गोदरेज इंटेरिओ या व्यवसायाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा मुख्यालयामध्ये सुधारणा, पुनर्नविनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे प्रतिष्ठित कंत्राट मिळविले. या प्रकल्पाची व्याप्ती १.२७ लाख चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली आहे आणि त्यात वेगवेगळ्या सुविधांसह पाच मजली इमारत समाविष्ट आहे. यामध्ये सायबर सेल कॉल सेंटरसह कार्यालयीन जागा, केबिन, डिजिटल वर्ग, सेमिनार हॉल, प्रशिक्षण वर्ग, अल्पोपहारगृह, साठवणुकीची जागा, सर्व्हिस रूम, गेम रूम आणि जीम यांचा समावेश आहे.
एका अहवालानुसार, महाराष्ट्रात साल २०२२ मध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७०% एवढी प्रचंड मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत नोंदवलेल्या ४,२६८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांपैकी केवळ २७९ प्रकरण यशस्वीरित्या सोडविले गेले. या वाढत्या समस्येला सोडविण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. हा विशिष्ट प्रकल्प राज्यभरातील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी पाऊल मानले जाते. गोदरेज इंटेरिओसोबत सिव्हिल आणि इंटिरिअर, एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग) आणि सोलर वॉटर हीटर सिस्टम, बाग-बगीच्याचे सौन्दर्यिकरण (लँडस्केपिंग), बाहेरील भाग, फर्निचर आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमधील संबंधित कामे यांसाठी हा करार करण्यात आला आहे.
गोदरेज इंटेरिओचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. स्वप्नील नगरकर म्हणाले, “गोदरेज इंटेरिओमध्ये आम्ही मेक इन इंडिया मिशनसाठी कटिबद्ध आहोत आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचा आम्हाला अभिमान आहे. या आगामी सायबर सेलच्या मुख्यालयाच्या कंत्राटाच्या अनुषंगाने, पोलिस अधिकाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यास आणि त्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्यास मदत करेल असे कार्यक्षम व सुरक्षित कार्यालयीन वातावरण प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे, जेणेकरून महाराष्ट्र सायबर सुरक्षेमध्ये अग्रेसर बनेल. हा प्रकल्प केवळ राज्याची सुरक्षाच वाढवेल असे नाही तर नवीन उद्योग व व्यावसायिकांना देखील आकर्षित करेल आणि एक डिजिटल पॉवर हाऊस म्हणून भारताच्या विकासाला अजून चालना देईल.”
गोदरेज इंटेरिओने साल २०२३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात रु. २७०० कोटी रुपयांचा महसूल नोंदविला आहे. याच कालावधीमध्ये, त्यांच्या टर्नकी सोल्युशन्स व्यवसायाने रु. ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळवला. कुशल आर्किटेक्ट्स, उत्तम इन्टिरिअर डिझाईनर, आणि प्रकल्प व्यवस्थापकांच्या टीमच्या सहाय्याने गोदरेज इंटेरिओ आपल्या ग्राहकासोबत सातत्याने काम करत उत्कृष्ट अंमलबजावणी व अतुलनीय परिणामांची हमी देते. त्यांच्या सर्वसमावेशक ऑफरिंगमध्ये इंटिरिअर, एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग) सुरक्षा आणि पाळत ठेवण्याची प्रणाली (सेक्युरिटी आणि सर्वायलन्स)आणि द्रुक-श्राव्य प्रणाली यासर्वांचे कंत्राट, डिझाईन व अंमलबाजवणी सेवा यांचा समावेश आहे.