गोदरेज इंटेरिओतर्फे नवीन ‘सोलेस’ हॉस्पिटल बर्थिंग बेड सादर

139
Introducing the new 'Solace' hospital birthing bed by Godrej Interio

मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३ : गोदरेज इंटेरिओतर्फे नवीन ‘सोलेस’ हॉस्पिटल बर्थिंग बेड सादर. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसने घर आणि संस्थात्मक विभागातील भारतातील अग्रगण्य फर्निचर सोल्यूशन्स ब्रँड असलेली आपली व्यवसाय शाखा गोदरेज इंटेरिओतर्फे एक अनोखा आरोग्य सेवा सुविधा देणारा बर्थिंग बेड ‘सोलेस’ सादर करत असल्याची घोषणा केली आहे. सोलेस बेड ही एक अनोखी संकल्पना असून प्रसवकाळ, प्रसूती, सुधारणा आणि प्रसवोत्तर प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या हालचाली सुलभ करण्यास सक्षम करते. या नवीन श्रेणीसह गोदरेज इंटेरिओ नव्याने झालेल्या आईसाठी आणि तिची काळजी घेणाऱ्यांसाठी प्रसूतीचा अनुभव निरोगी बनवण्याच्या गरजेकडे लक्ष देत आहे. ब्रँड सध्या आरोग्यसेवा उद्योगातून १३% पेक्षा जास्त संस्थात्मक महसूल निर्माण करत आहे आणि देशभरातील १०० हून अधिक रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांना फर्निचर सुविधा पुरवत आहे.

Introducing the new 'Solace' hospital birthing bed by Godrej Interio

गोदरेज इंटेरिओतर्फे विकसीत करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण बेड मुळे नवमाता आणि त्यांची काळजी घेणाऱ्याना खात्रीशीरपणे मिळणार आरोग्यपूर्ण बाळंतपणाचा अनुभव

नवीन माता आणि मुलांमध्ये ४०% पेक्षा जास्त मृत्यू प्रसव काळ आणि प्रसूतीच्या[1] वेळी होत असल्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार योग्य प्रकारे घेतलेली काळजी ही माता आणि नवजात जन्मलेल्या बाळांच्या आरोग्य स्थितीचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून ओळखली जात आहे. प्रसवकाळ, प्रसूती, सुधारणा आणि प्रसवोत्तर या सर्व प्रवासात आईला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि पाठबळ आवश्यक असते. सुरळीत आणि सुरक्षित प्रसूतीसाठी, आई आणि आरोग्य सेवा काळजीवाहक या दोघांसाठी कमी कष्टाचा प्रवास सुनिश्चित करणे आवश्यक आहे. हा महत्वाचा मुद्दा ध्यानात घेऊन एक नामांकित हेल्थकेअर फर्निचर ब्रँड इंटिरिओ प्रसूती प्रक्रियेला अधिक चांगले बनविण्याचा उद्देश असलेला बेड सादर करत आहे.

गोदरेज इंटेरिओचा वैशिष्ट्यपूर्ण सोलेस बेड प्रसूती प्रक्रियेदरम्यान आई आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अधिक आरामदायी वाटावे यादृष्टीने डिझाइन केला आहे. बाळंतपणाचे वेगवेगळे टप्पे लक्षात घेऊन, बाळाच्या जन्मादरम्यान सुलभ आणि सुरक्षित अनुभव देण्याच्या दृष्टीने बेडची रचना करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक नियंत्रित बॅकरेस्ट आणि उंची, 360° अॅडजस्ट होणारे काल्फ सपोर्ट, आपत्कालीन परिस्थितीसाठी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक CPR आणि मागे घेता येण्याजोगा लेग रेस्ट यांचा समावेश आहे. यात सुसंगत टीआर उंची हालचाली वैशिष्ट्य देखील असून जे ट्रेंडेलेनबर्ग (एका बाजूने बेड वर करणे) नंतर बेडला त्याच्या नेहमीच्या स्थितीत परत आणते. सोलेस बेडची सानुकूलता आणि साधेपणा हे हॉस्पिटलमध्ये उबदार, आरामदायी आणि अर्गोनॉमिक काळजी प्रदान करताना समकालीन, प्रगतीशील लेबर सूटसाठी एक उपयुक्त, परवडणारा पर्याय बनवते.

नवीन उत्पादन सादर करताना गोदरेज इंटेरिओच्या विपणन (B2B) विभागाचे उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, “गोदरेज इंटेरिओमध्ये दररोज आणि हरप्रकारे जीवनमानाचा दर्जा समृद्ध करणे हे आमचे ध्येय आहे. गोदरेज इंटेरिओचा आरोग्यसेवा व्यवसाय रुग्ण, कुटुंब आणि काळजी घेणारे यांच्यासाठी एर्गोनॉमिकली सुरक्षित, चांगला अनुभव देणाऱ्या हेल्थकेअर स्पेस तयार करणे यावर लक्ष केंद्रित करतो. नव्याने सादर केलेला सोलेस बेड प्रसूती अनुभव चांगला करण्यासाठी विचारपूर्वक  डिझाइन उपायसुविधा वापरून डिझाइनकडे असलेला आमचा मानव-केंद्रित दृष्टिकोन ठळक करते. सोलेस बेड प्रसूती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर मातांना आणि काळजीवाहक यांना आराम आणि आधार पुरविणारी उत्तम उपाय सुविधा आहे. संपूर्ण भारतभर आरोग्यसेवा अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पुढे जाऊन आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये आम्ही ५ नवीन आरोग्य सेवा सुविधा सुरू करण्याची योजना आखत असून आमच्या आरोग्य सेवा उद्योगात 30% महसूल वाढीचे लक्ष्य आहे.

हेही वाचा :

‘उडचलो’ (UDCHALO) एआयटीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचे करियर मार्गी लावण्यास मदत करते