गाथा नवनाथांची मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा !

83

पुणे , ८ फेब्रुवारी २०२३ : गाथा नवनाथांची मालिकेत पाहा भर्तरीनाथांच्या जन्माची कथा ! सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची या मालिकेने मागील वर्षभरापासून प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलंय. नाथ संप्रदाय आणि त्या विषयीची माहिती प्रेक्षकांना यामालिकेच्या माध्यमातून मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसारख्या नाथांच्या कथा प्रेक्षकांना पाहता येताहेत. मालिकेत आता चौरंगीनाथांचा नाथ संप्रदायातला प्रवास सुरू झाला असून आता पुढे भर्तरीनाथांच्या जन्माची कहाणी सुरू होणार आहे.

Watch the story of the birth of Bhartrinath in the Gatha Navnath series!

 टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका घेऊन सोनी मराठी आली आणि ती जनसामान्यांत लोकप्रिय झाली आहे. नवनाथांच्या जन्मांच्या आणि कार्याच्या कथा, ज्या आत्तापर्यंत कधीच दृश्य स्वरूपात बघितल्या नव्हत्या, त्या या मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत. माशाच्या पोटातूनआलेले मच्छिन्द्रनाथ, गोरक्षेतून अवतरलेले गोरक्षनाथ, मातीतून अवतरलेले गहिनीनाथ आणि अग्निकुंडातून अवतरलेले जालिंदरनाथ; या नाथांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला असून आता चौरंगीनाथहीकार्य सुरू करतील. मालिकेत आता सूर्यपुत्र म्हणून मानले जाणारे भर्तरीनाथ यांची जन्मकहाणी सुरू होणारआहे. भर्तरीनाथ यांचा जंगलातला जन्म, जंगलातलं बालपण, त्यानंतर  सर्वसामान्य दाम्पत्यानी त्यांचा केलेला सांभाळ; हा सगळा प्रवास मालिकेत बघता येणार आहे. भर्तरीनाथ यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर घेतलेला संन्यास, नाथ संप्रदायातला प्रवेश, उज्जैन इथलं कार्य तसंच वैराग्यशतक, शृंगारशतक, नीतिशतकअशा तीन ग्रंथांचं लिखाण हा जीवनप्रवासही मालिकेत मांडण्यात येणार आहे.

नाथ संप्रदायाची परंपरा आणि माहिती या मालिकेच्या निमित्तानी प्रेक्षकांना मिळते आहे. मालिकेत पुढे कोणते चमत्कार दिसणारनाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणारहे जाणून घेण्यासाठी पाहा, ‘गाथा नवनाथांची‘, 

९ फेब्रुवारी, गुरुवार, संध्या. ६:३० वा. फक्त सोनी मराठीवर वाहिनीवर

हेही वाचा :

शेफलर इंडिया लिमिटेडने श्रीमती सुमिताश्री इरंती यांना आपल्या संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले