‘गती’ची नेटवर्क क्षमतेत २० ते २५ टक्क्यांची वाढ ‘गती’कडून सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी वर्धित वितरण सेवा क्षमतांसह सज्जता

14

पुणे , १५ सप्टेंबर२०२३: भारतातील आघाडीची एक्सप्रेस वितरण आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रदाता असलेल्या गती एक्स्प्रेस आणि सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेडने (जीईएससीपीएल)सणासुदीच्या काळात वाणिज्य क्षेत्रातील गृहोपयोगी वस्तूइलेक्ट्रॉनिक्स उपकरणेग्राहकोपयोगी वस्तूंसारख्या विभागांमधील मागणीतील वाढीची पूर्तता करण्यासाठी तिच्या गोदाम आणि वितरण क्षमतेत वाढ केली आहे. सतत क्षमता आणि कार्यकुशलता वाढवण्याच्या जीईएससीपीएलच्या उपाययोजनांमुळे वर्षभरात केव्हाही २० टक्के अधिक मालाचा भार हाताळण्यासाठी ती सुसज्ज असते.

मुंबईच्या हद्दीत भिवंडी येथे १.४८ लाख चौरस फुटांचे अत्यंत अत्याधुनिक आणि तंत्रज्ञान-सक्षम सरफेस ट्रान्सशिपमेंट सेंटर आणि डिस्ट्रिब्युशन वेअरहाऊस (एसटीसीडीडब्ल्यू)फारुख नगर येथे १.५ लाख चौरस फूट सरफेस ट्रान्सशिपमेंट सेंटर (एसटीसी) तसेच इंदूरनागपूरगुवाहाटी आणि बेंगळुरू (आगामी) येथे अनुक्रमे ३९,१४० चौरस फूट५०,००० चौरस फूट४०,००० चौरस फूट आणि १.४६ लाख चौरस फूट क्षमतेच्या एसटीसीयातून जीईएससीपीएलने अधिक विस्तृत आणि संपूर्ण देश व्यापणाऱ्या महत्त्वपूर्ण स्थानांना सामावून घेणारे जाळे स्थापित केले आहे. जीईएससीपीएल त्या त्या प्रदेशांतील सूक्ष्मलघू व मध्यम (एसएमई) उद्योगांना सणासुदीच्या काळात अधिक भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण बाजारपेठ तयार करण्यास मदत करेल.

सणासुदीच्या तयारीबद्दल भाष्य करतानागती लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) श्री. राजेश गोवरीनाथ म्हणालेआम्ही आमच्या वाढीव वितरण क्षमतेसह सणासुदीच्या मागणीतील वाढ पाहता आणि कार्यादेशांच्या आकारमान वाढवण्यासाठी पूर्णपणे सज्जता केली आहे. या वर्षी सणासुदीच्या मागणीत आम्हाला १८-२० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या वाढलेल्या ई-कॉमर्स व्यवहारांच्या आकारमानानुसारदळणवळणाची पूर्तता सुलभ करण्यासाठी आम्ही आमच्या नेटवर्क क्षमतेत २० ते २५ टक्क्यांची वाढ केली आहे. जेणेकरून या व्यस्ततम हंगामातील मागणीला सामावून घेणारी उत्कृष्ट वितरण कार्यक्षमता निर्माण केली गेली आहे. ऑलकार्गो समूहाच्या सामर्थ्यांसहजीईएससीपीएल विविधांगी दळणवळण गरजांसाठी आणि जगभरातील तब्बल १८० देशांमध्ये कार्यरत असलेल्या जागतिक जाळ्यामध्ये प्रवेशासाठी एकात्मिक लॉजिस्टिक सेवा प्रदान करते.

वितरण क्षमता निर्माण करण्याच्या निरंतर प्रयत्नांचा एक भाग म्हणूनजीईएससीपीएलने भारतभर अत्याधुनिक एक्सप्रेस वितरण केंद्रे (ईडीसी) स्थापित केली आहेतजी प्रगत तंत्रज्ञान आणि गोदाम सुविधांनी सुसज्ज आहेत. कंपनीने वर्धित कव्हरेज आणि कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी हवाई आणि रस्त्यावर पसरलेले एक मजबूत वितरण जाळे देखील तयार केले आहे. २,५०० हून अधिक पर्यायी इंधन वाहनांच्या ताफ्यासहजीईएससीपीएल ही २४ ते ४८ तासांच्या आत मजबूत बाजारपेठेत प्रवेश आणि जलद वितरणाची सुविधा तिच्या ग्राहकांना मिळवून देते.

जीईएससीपीएलची हवाई मालवाहतूक सेवागती एअरनेतिचे देशातील आघाडीच्या विमान वाहतूक सेवांशी असलेल्या धोरणात्मक सामंजस्याच्या जोरावर अखंड वितरण आणि सानुकूलित लॉजिस्टिक उपाययोजना प्रस्तुत केल्या आहेत. प्रमुख व्यापार केंद्रे आणि औद्योगिक केंद्रांवरील ३२ हवाई परिवहन केंद्रे आणि हवाई संचालन केंद्रांसहगती एअर ही अत्यावश्यक आणि काळाच्या बाबतीत संवेदनशील असणाऱ्या मालाची संपूर्ण भारतभरात वाहतूक सुविधा प्रदान करते.

भारतातील ७३९ जिल्ह्यांपैकी ७३५ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या १९८०० पिन कोड ठिकाणांवर प्रवेशयोग्यतेसह५४०० हून अधिक पिन कोड स्थानांवर थेट वितरण सेवेच्या माध्यमातून जीईएससीपीएलचे ग्राहक सर्वोत्तम संक्रमण काळ आणि वितरण कार्यक्षमतेचा फायदा घेऊ शकतात. ज्यामुळे सणासुदीच्या काळात भारतभरात त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.

डेटा अॅनालिटिक्सआर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)आणि मशीन लर्निंग (एमएल)गती एंटरप्राइज मॅनेजमेंट सिस्टीम (जेम्स) या तंत्रप्रणालींनी सुसज्जजीईएससीपीएलची मुख्य परिचालन प्रणाली ही ग्राहकांना खर्च किमानतम राखतउत्कृष्ट कार्यकुशलता प्रदान करते…