गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सोनी इंडियाकडून आकर्षक सवलती जाहीर

17

मुंबई, सप्टेंबर, २०२३: ग्राहकांना आनंददायी खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी खास सणवारविशेष सवलती जाहीर करताना सोनी इंडियाला आनंद होत आहे. अत्याधुनिक ब्रॅव्हिया एक्सआर टेलिव्हिजन (BRAVIA XR Television) पासून, मुग्ध करणाऱ्या होम थिएटर सिस्टमपर्यंत, उच्च दर्जाच्या हेडफोन्स पासून ते दमदार अश्या पार्टी स्पीकरपर्यंत वेगवेगळ्या जीवनशैली उत्पादनांच्या व्यापक प्रकारांसह आता ग्राहक त्यांच्या घरातील मनोरंजनाची रचना आणि राहण्याची जागा अजून समृद्ध करू शकतात आणि तेही अतिशय आकर्षक किंमतीत. आनंद, उल्हास आणि भेटीगाठींचे-सणसुदींचे दिवस उंबरठ्यावर असताना सोनी इंडिया गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जबरदस्त अश्या सवलती आणि अतुलनीय बचतींसह सज्ज आहे. सोनी इंडिया ग्राहकांना अत्याधुनिक अश्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या व्यापक प्रकारांवरील विशेष सवलतींच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे.

या सणवारविशेष सवलतींबाबत बोलताना सोनी इंडियाच्या मुंबई शाखेचे प्रमुख श्री. शैलेश गोविंद कुलकर्णी म्हणाले, या गणेश चतुर्थीला सोनी इंडिया आपल्या ग्राहकांमध्ये आनंद आणि उत्साह पसरविण्यासाठी वचनबद्ध आहे. या उत्सवाच्या वातावरणामध्ये आम्ही देखील सहभागी होत असल्याने आमचे उद्दिष्ट हेच आहे की, आमची अत्याधुनिक उत्पादने ग्राहकांना अधिक किफायतशीर किंमतीत आणि सहज उपलब्ध करून द्यावीत; जेणेकरून आमच्या ग्राहकांना मनोरंजनाच्या उत्कृष्ट अश्या अनुभवांमध्ये स्वतःला हरवून टाकता येईल. आम्ही सर्वांना हार्दिक आमंत्रण देतो की सोनीसोबत गणेश चतुर्थी साजरी करा आणि आमच्या या आकर्षक सवलतींचा लाभ घ्या.

 विशेष सणाच्या ऑफर खालीलप्रमाणे आहेत –

 १.      अतिशय उत्कृष्ट अश्या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी आता ब्रॅव्हिया एक्सआर (BRAVIA XR) अतुलनीय व आकर्षक किंमतीत खरेदी करा.

२.      ब्रॅव्हिया टेलिव्हिजन आणि ए-सिरीज साऊंडबारच्या सहाय्याने होम एंटरटेंमेंट सेटअप करून सिनेमा मनोरंजनामध्ये क्रांती आणा

३.      भारावून टाकणाऱ्या ऑडिओ अनुभवासाठी साऊंडबारवर अतुलनीय सवलत मिळवा

४.      अवतीभवतीचा गोंधळ काढून टाकणारे (नॉइस कॅन्सलेशन) हेडफोन्स आणि ईयर-बड्स वर अचंबित करणाऱ्या सवलतींचा आनंद घ्या

५.      न भूतो न भविष्यती अशा सवलतींसह अल्फा कॅमेऱ्यांनी अविस्मरणीय क्षण टिपा.

६.      पार्टी स्पीकर्सवरील शानदार सवलतींनी सणांचा आनंद अजून वाढवा.

७.      सहज व सुलभ वित्त पुरवठ्याच्या ऑफर्सचा लाभ घ्या

८.      दमदार रिटेल नेटवर्क आणि सेवा अनुभवा