गंगा न्यू टाऊन कार्निव्हलमध्ये तीन हजारांहून अधिक नागरिकांची हजेरी

60
More than three thousand citizens attended the Ganga New Town Carnival

पुणे :  गंगा न्यू टाउन निवासी संकुलात आयोजित फ्ली कार्निव्हलमध्ये सुमारे तीन हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि खरेदी, मनोरंजनाचे कार्यक्रम यांचा आनंद घेतला.  गोयल गंगा डेव्हलपमेंट्सच्या वतीने धानोरी येथील गंगा न्यू टाऊन निवासी संकुलात नुकतेच या दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात संकुलातील रहिवासी, विक्रेते असे सुमारे तीन हजारांहून अधिक लोकांनी आनंद घेतला. 

या कार्निव्हलमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी आकर्षण ठरतील असे वैविध्यपूर्ण उपक्रम होते. यामध्ये दिवसभर लोकांनी मनमुराद खरेदी करण्यासह स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये यांचा आस्वाद घेण्याबरोबरच संगीत, गायन आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेतला. कार्निव्हलमध्ये स्थानिक विक्रेत्यांसह हस्तनिर्मित कलाकुसर, दागिने, कपडे आदींची विक्री करणारे अनेक कारागिर उपस्थित होते. फूड ट्रक, लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स आणि मुलांसाठीच्या कार्यक्रमांचा देखील आनंद घेतला. संकुलातील ए आणि बी टॉवर्समधील रहिवासी तसेच इतर सदस्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला.या टाउनशिप प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

“गंगा न्यू टाऊन कार्निव्हलला मिळालेला उदंड प्रतिसाद अत्यंत आनंददायी, उत्साहवर्धक आहे. लोकांना एकत्र आणणारा आणि उच्च दर्जाचा ऑफर देणारा प्रकल्प उभारत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गंगा न्यू टाउन फ्ली कार्निव्हलने हजारो लोकांना  आकर्षित केले आणि सर्वांसाठी एक संस्मरणीय अनुभव प्रदान केला. गोयल गंगा डेव्हलपमेंट्सने पुण्यातील सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देणारे आणि स्थानिक व्यवसायांना समर्थन देणारे कार्यक्रम आणि उपक्रम होस्ट करणे सुरू ठेवण्याची योजना आखली आहे, असे गोयल गंगा डेव्हलपमेंटचे एमडी सुभाष गोयल म्हणाले.