खतरों के खिलाडी 13 ची स्पर्धक सून्दूस मौफकीर म्हणते, “शिव ठाकरे मला चांगली टक्कर देऊ शकतो”

23
Khatron Ke Khiladi 13 contestant Sundus Moufkir says, “Shiv Thackeray can give me a good match”

कलर्सवरील ‘खतरों के खिलाडी’ भयंकर साहसांनी आणि धोक्यांनी भरलेली 13 वी आवृत्ती घेऊन येत आहे. जंगलाचे थीम असलेल्या या आगामी सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 14 स्पर्धक असतील. ते सगळे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात भयानक आव्हानांचा सामना करताना दिसतील. लोकप्रिय दिग्दर्शक आणि अॅक्शनचा उस्ताद रोहित शेट्टी पुन्हा एकदा होस्टच्या भूमिकेत दिसेल आणि आपल्या भीतीचा सामना करणाऱ्या स्पर्धकांना मार्गदर्शन करेल. एंडेमॉल शाईन इंडियाद्वारा निर्मित ‘खतरों के खिलाडी 13’ लवकरच कलर्सवर येत आहे .

मी माझ्याबरोबर माझी बाहुली, रोझा आणली आहे, जी माझ्यासाठी लकी आहे. मी रोझाला स्प्लिट्स व्हिलाला देखील माझ्यासोबत घेऊन गेले होते आणि मी जिंकले. ‘खतरों के खिलाडी13’ ला देखील मी तिला नेणार आहे मला रोहित शेट्टीलाच आव्हान द्यायला आवडेल. मजा येईल.

मी आनंदाने किंचाळून माझी निवड झाल्याचे माझ्या वडीलांना सांगितले. माझ्यासाठी या शो चा प्रवास किती खतरनाक असणार आहे, हे दाखवण्यासाठी मी त्यांना ‘खतरों के खिलाडी’च्या आधीच्या सीझनचे काही एपिसोड्स दाखवले होते. मी माझ्या वडीलांसोबत मोरोक्कोला सुट्टीसाठी गेले होते आणि शोमध्ये मगरी दिसल्या तर मला भीती वाटू नये म्हणून त्यांनी मला एका क्रोकोडाईल गार्डनला नेले.

VIDEO : धक्कादायक : पुण्यातल्या पोलीसांना ‘राजकीय हात’ लागतोच कशाला? पुण्यात पोलीसांचे चाललंय काय? अल्पवयीन मुलांना पोलीसांकडुन जबर मारहाण; कुटुंबीयांना शिवीगाळ तसेच उर्मट भाषा वापरल्याची माहिती

अॅव्हकॅडो टोस्ट मला सगळ्यात जास्त आवडतो, तो मी सगळ्यात जास्त मिस करीन. मला तो तिकडेही मिळावा अशी माझी इच्छा आहे. या शो मधील सगळेच स्पर्धक माझ्यासाठी नवे आहेत, त्यामुळे अजून तरी कोणी खास मित्रामैत्रिण नाहीत. पण वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठी मी उत्सुक आहे.

मला वाटते, या शो मधील सगळेच स्पर्धक कठोर प्रतिस्पर्धी असतील, पण शिव ठाकरे हा माझ्यासाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी आहे, कारण त्याने अनेक रियालिटी शोज केले आहेत आणि ऱ्होडीज मध्ये तर त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.

माजी स्पर्धकांपैकी मी रुबीना दिलैककडून प्रेरणा घेतली, आणि मला वाटते सगळ्या सीझनमधली ती सगळ्यात मजबूत स्पर्धक होती.

मला पाण्याखालील स्टंट करायला आवडेल, कारण मला पाण्यात सूर मारण्याची भीती वाटते, आणि मला माझ्या भीतीवर मात करायची आहे.

स्नायू बळकट आणि शरीर मजबूत करण्यासाठी खूप वेळ लागतो. सध्या मी मानसिक शक्ती कमावण्यावर तसेच स्टंट्स करण्यासाठी मानसिक तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मला पाण्याच्या आणि पाण्यात सूर मारण्याच्या भीतीवर मात करायला आवडेल. कधीकधी माझा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो, त्यामुळे स्टंट्स करून माझ्यात जास्त आत्मविश्वास यावा अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा : BIG BREAKING : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?