खतरों के खिलाडी 13 चा स्पर्धक शिव ठाकरे याने सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन आपली वाटचाल सुरू केली

35

खतरों के खिलाडी 13 चा स्पर्धक शिव ठाकरे याने सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन आपली वाटचाल सुरू केली बिग बॉस 16 मध्ये झळकलेला शिव ठाकरे कलर्सवरील खतरों के खिलाडी च्या आगामी सीझनमध्ये खतरनाक साहसांचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. अत्यंत थरारक आणि धडकी भरवणाऱ्या स्टंट्सबद्दल ओळखला जाणारा कलर्सचा शो खतरों के खिलाडी स्पर्धकांचे धैर्य आणि निर्धार यांची कसोटी करेल. या आव्हानांसाठी जय्यत तयारी करताना शिव कोणताही प्रयत्न बाकी ठेवणार नाहीये. या थरारक प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी शिवने प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद मिळवला आणि अशा रीतीने या प्रवासाची शुभ सुरुवात केली. शिवसाठी बाप्पाचे आशीर्वाद सर्वोच्च आहेत आणि त्या दिव्य शक्तीने दर्शन घेतल्यावर प्रवास आरंभ करावा अशी त्याची इच्छा होती. देवाचे दर्शन घेतल्याने त्याला केवळ आंतरिक शक्ती मिळाली इतकेच नाही, तर आता समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्याचा आत्मविश्वास देखील बळावला आहे.

या देवदर्शनाबद्दल शिव ठाकरे म्हणतो“कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी मी नेहमीच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतो. बाप्पा मला प्रकाशाची वाट दाखवतो. कोणतेही आव्हान घेताना बाप्पाचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. सिद्धिविनायक मंदिरात मी केवळ बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो नाही, तर आजवर मला जे मिळाले आहे, त्याबद्दल त्याचे आभार देखील मला मानायचे होते. सिद्धिविनायक मंदिराचा विशेष महिमा आहे. मी दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलो तेव्हा माझ्या अंगात जास्त आत्मविश्वास आला होता. कलर्सच्या खतरों के खिलाडी 13 मध्ये सामील होताना मला खूप आनंद होत आहे आणि या शो मध्ये मी माझे सर्व प्रयत्न देईन अशी मी खात्री देतो.”

 

कलर्सवरील खतरों के खिलाडी 13 चे आणखी अपडेट्स मिळवा इथेच!