क्रोमाने क्यूएलईडी टीव्ही आणि वॉटर प्युरिफायर कॅटेगरीमध्ये ओन लेबल सादर केले

69
Chroma introduced its own label in the QLED TV and water purifier category

पुणे मार्च २०२३ : भारतातील पहिले व विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने आपल्या ओन-लेबल उत्पादन श्रेणीमध्ये अजून उत्पादने सादर केली आहेत. ग्राहकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने हे नाविन्यपूर्ण क्यूएलईडी टीव्ही व वॉटर प्युरिफायर्स डिझाईन करण्यात आले आहेत. ग्राहकांना आकर्षक किमतींमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. क्रोमा क्यूएलईडी टीव्हीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्याने ग्राहकांना टीव्ही पाहताना इमर्सिव्ह अनुभव घेता येतो. वॉटर प्युरिफायर्समध्ये आधुनिक वॉटर फिल्टरेशन सिस्टिम असल्याने संपूर्ण कुटुंबाला सदैव स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळते.

  • गेल्या वर्षभरात क्रोमा ओन लेबलने २.५ पट पेक्षा जास्त वृद्धी मिळवली आहे. ~
  • सध्या क्रोमा ओन लेबल कॅटेगरीमध्ये ४०० पेक्षा उत्पादने असून क्रोमा इन-हाऊस तज्ञांनी क्युरेट केली आहेत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत.
  • ५५ व ६५ इंचांचे क्यूएलईडी टीव्हींच्या किमती ५९,९९० रुपयांपासून पुढे आहेत.
  • वॉटर प्युरिफायर्सच्या किमती ११,९९० रुपयांपासून पुढे आहेत.

आपल्या ग्राहकांना अधिकाधिक आनंद मिळवून देण्याच्या प्रेरणेने, २००८ साली क्रोमाने स्वतःची अर्थात ओन-लेबल उत्पादने सादर केली. गेल्या वर्षभरात क्रोमाच्या ओन लेबल उत्पादन श्रेणीने २.५ पट पेक्षा जास्त वृद्धी नोंदवली आहे. या ओन लेबल कॅटेगरीमध्ये सध्या क्रोमामध्ये ४०० पेक्षा जास्त उत्पादने असून ती सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. क्रोमाच्या स्वतःच्या तज्ञांनी ही उत्पादने अतिशय काळजीपूर्वक निवडली आहेत व त्यांच्या किमती देखील स्पर्धात्मक आहेत. उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि पुरवठ्यातील सातत्य यावर भर देत क्रोमा आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य मिळवून देते, त्यामुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास अधिकाधिक दृढ होत आहे. क्रोमा ब्रँड काटेकोर प्रक्रिया व गुणवत्ता परीक्षण तंत्रांचे पालन करतो आणि आपल्या ग्राहकांना एन्ड-टू-एन्ड पोस्ट-परचेस (खरेदीनंतरच्या) सेवा प्रदान करतो.


Chroma introduced its own label in the QLED TV and water purifier category

आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व उत्पादने देण्यासाठी क्रोमा बांधील आहे आणि त्यांच्या अनुभवात वाढ करण्यासाठी सदैव नवे मार्ग शोधत असतो. क्रोमा ओन लेबलमधील नवी वैशिष्ट्यपूर्ण व लाभदायक उत्पादने ब्रँडची ही बांधिलकी दर्शवतात. सिनेप्रेमी, गेमिंगचे चाहते आणि आपले आवडीचे कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहणे ज्यांना आवडते अशा प्रत्येक व्यक्तीसाठी क्यूएलईडी टीव्ही ही सर्वोत्तम निवड आहे. सर्वोत्कृष्ट पिक्चर क्वालिटी, उत्तम रंग, इमर्सिव्ह आवाज आणि सहज कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक ती सर्व वैशिष्ट्ये (३ एचडीएमआय पोर्ट्स, २ यूएसबी पोर्ट्स) असलेला टीव्ही हवा असलेल्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये ब्ल्यूटूथ ५.०, ड्युएल बँड वाय-फाय, ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट, २ जीबी रॅम आणि १६ जीबी रॉम असून १.९ गिगा हर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर, गूगल ऑपरेटिंग सिस्टिम प्लॅटफॉर्म आहे. या टीव्हीसोबत १ वर्षाची वॉरंटी देण्यात येते. गूगल प्ले स्टोरमार्फत अतिशय उत्तम ऍप सपोर्ट देखील मिळवता येतो. नाविन्यपूर्ण क्यूएलईडी तंत्रज्ञानासह अतुलनीय, जिवंत रंगांचा आनंद घेता येतो, यामुळे दर्शकांना खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक अनुभव मिळतो.

वॉटर प्युरिफायरमध्ये स्टोरेज आणि फिल्टरेशनची क्षमता प्रचंड जास्त असल्याने स्वच्छ व शुद्ध पाणी सतत मिळत राहते. या प्युरिफायरमध्ये बॅक्टेरिया, धातू प्रदूषण आणि जंतू दूर केले जातात, इतकेच नव्हे तर, विषारी घटक व हानिकारक रसायने देखील फिल्टर केली जातात, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी सुरक्षित बनते. या प्युरिफायरमध्ये प्रगत कॉपर+ पोस्ट कार्बन फिल्टर आणि मॅन्युअल टीडीएस कंट्रोलर आहे ज्यामुळे तांब्याचे लाभ मिळतात, पाणी अधिक जास्त स्वादिष्ट बनते. यामध्ये ९ लिटर वॉटर स्टोरेज क्षमता व स्मार्ट एलईडी इंडिकेटर्स आहेत. या वॉटर प्युरिफायर्समध्ये प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाचे सहा टप्पे आहेत. त्याबरोबरीनेच यामध्ये अल्ट्राफाईन सेडीमेंट फिल्टर व जंतूंचा नाश करणारे यूव्ही तंत्रज्ञान देखील यामध्ये आहे.

यावेळी क्रोमा इन्फिनिटी-रिटेल लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. अविजीत मित्रा यांनी सांगितले, “आमच्या ग्राहकांसाठी प्रगत तंत्रज्ञानाने परिपूर्ण क्यूएलईडी आणि वॉटर प्युरिफायर्स सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांच्या गरजा व आवडीनिवडी पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणे आम्ही घेऊन येत आहोत. क्रोमा ब्रँडेड उत्पादनांची सुरुवात झाली तेव्हापासूनच त्यांनी प्रचंड प्रमाणात वृद्धी नोंदवली आहे. तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना अगदी सहजपणे आणि सर्वोत्तम किमतींमध्ये घेता यावा यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्या बांधिलकीमधूनच आमच्या ओन-लेबल उत्पादनांची सुरुवात करण्यात आली आहे. नवी उत्पादने सर्वोत्तम गुणवत्ता व कामगिरी मानकांनुसार आहेत याची पुरेपूर खात्री आमच्या टीमने करून घेतली आहे.”

एसी, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह, स्वयंपाकघरातील उपकरणे, इयरफोन्स, हेडफोन्स, ब्ल्यूटूथ स्पीकर्स आणि इतर अनेक विभागांमध्ये क्रोमाने ओन लेबल उत्पादने सादर केली आहेत. क्रोमा स्टोर्समध्ये इतर कोणत्याही ब्रँडच्या टीव्ही किंवा एअर कंडिशनरपेक्षा क्रोमा ब्रँडेड टीव्ही व एअर कंडिशनर्सची विक्री जास्त होते.

क्यूएलईडी आणि वॉटर प्युरिफायर्स क्रोमा वेबसाईट www.croma.com, क्रोमा स्टोर्स आणि टाटा नेउवर खरेदी करता येतील.

हेही वाचा :

माधुरी पवारने निरागस पध्दतीने केला वाढदिवस साजरा