क्रोमाच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये आकर्षक ऑफर्स व डिस्काऊंट्सची लयलूट

84

पुणे , २३ नोव्हेंबर २०२२ : भारतातील पहिले आणि सर्वाधिक विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सर्वाधिक आकर्षक ऑफर्सची लयलूट असलेल्या ‘डार्केस्ट’ ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. स्टोर्समध्ये आणि क्रोमा वेबसाईटवर १८ नोव्हेंबरपासून या सेलला सुरुवात झाली आहे, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणे, संगणक, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन्सच्या विशाल श्रेणीवर सर्वाधिक आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तर क्रोमाच्या स्टोर्समध्ये ‘झोम्बीज’सोबत खरेदीचा आगळावेगळा अनुभव घेऊन तुम्ही देखील तुमची ‘डार्क साईड’ दाखवून देऊ शकाल.

· ऍपल उत्पादने, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मोबाईल फोन्स, ऑडिओ आणि इतर अनेक उत्पादनांवर मिळवा प्रचंड डिस्काऊंट्स

· स्टोर्समध्ये ठेवण्यात येणार लकी ड्रॉ बँड्स, सोशल मीडियावर विविध स्पर्धांमध्ये ते जिंकता येणार.

· खरेदी करा आणि मिळवा १००० रुपयांपर्यंतचे यूएस स्टॉक्स आणि इतर भरपूर, इंड मनीकडून

· २५ ते २७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत क्रोमा स्टोर्स रात्री १२ वाजेपर्यंत खुली राहणार.

स्टोर्समध्ये हा सेल २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ते मध्यरात्रीपर्यंत चालेल. स्टोरमधील लकी ड्रॉ विजेत्यांसाठी क्रोमाने तीन बँड्स ठेवले आहेत – ब्लॅक बँडवर ७% डिस्काउंट, ग्रेवर ५% आणि व्हाईटवर ३% डिस्काउंट. लकी ड्रॉ बँड्स २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान स्टोर्समध्ये रिडीम करता येतील. यासाठी कमीत कमी १०,००० रुपयांची खरेदी करणे आवश्यक आहे आणि त्यावर जास्तीत जास्त २,५०० रुपये डिस्काउंट मिळेल. क्रोमाच्या सोशल मीडिया पेजेसवर ऑनलाईन स्पर्धा जिंकून ऑनलाईन खरेदीदार हे बँड्स मिळवू शकतील आणि हे बँड्स स्टोर्समध्ये व ऑनलाईन खरेदीमध्ये कमीत कमी ५,००० रुपयांच्या खरेदीवर जास्तीत जास्त २,५०० रुपये डिस्काउंटसाठी रिडीम करता येतील.

इंड मनीच्या सहयोगाने सादर करण्यात येत असलेल्या एका अभूतपूर्व ऑफरमध्ये क्रोमा प्रत्येक ग्राहकाला अश्यूअर्ड गिफ्ट व्हाउचर्स देणार आहे. यामध्ये इंड मनीच्या नवीन युजर्सना कोणतेही किमान फंडिंग न ठेवता १००० रुपयांचे गूगल स्टॉक मिळतील आणि वर्तमान युजर्स व पुन्हा गुंतवणूक करत असलेल्यांना इंड मनीकडून ५०० रुपयांचे गूगल स्टॉक मिळतील. इतकेच नव्हे तर, कॅम्पेन कालावधीत सर्वाधिक खरेदी करणाऱ्या २० ग्राहकांसाठी मेगा ग्रॅटिफिकेशन ऑफर देखील आहे, यामध्ये त्यांना गूगल किंवा ऍपलचे ९९९९ रुपयांचे स्टॉक मिळतील, एका भाग्यवान ग्राहकाला १ लाख रुपयांच्या गूगल स्टॉकचे जॅकपॉट बक्षीस देखील जिंकता येईल.

विविध विभागांमध्ये क्रोमाने प्रचंड डिस्काऊंट्स देऊ केले आहेत. ऍपल मॅकबुकच्या किमती ५६,९९०* रुपयांपासून पुढे, यामध्ये एक्स्चेंज बोनस आणि एचडीएफसी बँक ऑफर्सचा देखील समावेश आहे. सॅमसंग गॅलॅक्सी वॉच ४ क्लासिक्सची किंमत ३७,९९९* रुपयांवरून थेट १५,०००* रुपयांवर आली आहे. ऍपल आयफोन १२ ची किंमत ५८,९९०* रुपये इतकी कमी झाली आहे. क्रोमा ब्ल्यूटूथ स्पीकर्स फक्त ६९९* रुपयांना तर बोट ब्ल्यूटूथ नेकबँड्सच्या किमती ८९९* रुपयांच्या पुढे आहेत.

इतकेच नव्हे तर, ब्लॅक फ्रायडे डिस्काऊंट्स इतरही अनेक विभागांमध्ये लागू आहेत. लॅपटॉप्समध्ये एसस, एसर, डेल, एचपी, लेनोवो या आघाडीच्या ब्रँड्सवर ४०% ची आकर्षक सूट दिली जात आहे. प्रिंटर्स, वायरलेस माउस, डेस्कटॉप मॉनिटर्स आणि इतर अनेक उत्पादने ७०% पर्यंतच्या आकर्षक डिस्काउंटसह खरेदी करता येतील. टीव्हीवर ६५% पर्यंत आणि ऑडिओ विभागामध्ये ७०% डिस्काऊंट्स मिळतील.

स्वयंपाकघरातील उपकरणांवर ६०% पर्यंत सूट दिली जाईल तर एसीसारख्या घरगुती उपकरणांवर आघाडीच्या ब्रँड्सवर ४५% पर्यंत सूट मिळत आहे. रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिन्सवर ४०% पर्यंत सूट मिळवता येईल.

२५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बँक ऑफर्स – एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि इझी ईएमआय पेमेंट्ससोबत ५,००० रुपयांपर्यंतचे डिस्काउंट तात्काळ मिळवता येईल.