क्रोमाचा ५ जी वीकएंड: आपल्या स्मार्टफोन अनुभवात नवी क्रांती घडवून आणा !

94
Chroma's 5G Weekend: Revolutionize Your Smartphone Experience!

मार्च, २०२३ : भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर व टाटा समूहातील एक ब्रँड क्रोमाने अत्याधुनिक ५जी स्मार्टफोन खरेदी करणे आपल्या ग्राहकांना सोपे जावे यासाठी एक नवे कॅम्पेन सुरु केले आहे. या सेलमध्ये क्रोमाच्या ग्राहकांना ५जी स्मार्टफोन फक्त १३,९९९ रुपयांपासून पुढील किमतींना खरेदी करता येतील. सर्वात नवीन ५जी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे क्रोमाच्या ग्राहकांसाठी आता खूपच सोपे बनले आहे.

Chroma's 5G Weekend: Revolutionize Your Smartphone Experience!

  • आकर्षक डील्स : क्रोमाच्या ५जी वीकएंड सेलमध्ये निवडक ५जी स्मार्टफोन्सवर मिळवा ५०% पर्यंतची सूट 
  • मोठी बक्षिसे जिंका : क्रोमामधून ५जी स्मार्टफोन खरेदी केल्यास मिळेल ब्रँड-न्यू टाटा नेक्सन किंवा ईव्ही बाईक जिंकण्याची सुवर्णसंधी 
  • सॅमसंग गॅलॅक्सी ए१४ ५जी : फक्त १६४९९ रुपयांच्या पुढील किमतींना खरेदी करा हा अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण स्मार्टफोन 
  • फ्री स्मार्टवॉच : निवडक ५जी स्मार्टफोन्स खरेदी केल्यावर फ्रीमध्ये मिळवा ४९९९ रुपयांचे स्मार्टवॉच 
  • कार्ड ऑफर्स : फेडरल बँक, एचएसबीसी किंवा आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डांवर खरेदी केल्यास तुम्हाला मिळेल १०% अतिरिक्त सूट (२५०० रुपयांपर्यंत)

क्रोमाचे ५जी वीकएंड कॅम्पेन सर्व स्टोर्स आणि croma.com या वेबसाईटवर २३ एप्रिलपर्यंत फक्त वीकएंडला चालवले जाईल. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला बनवण्याच्या उद्देशाने क्रोमाने एकापेक्षा एक सरस एक्सक्लुसिव्ह ऑफर्स व डिस्काउंट्स सादर केले आहेत. या कॅम्पेनमध्ये क्रोमा निवडक ५जी स्मार्टफोन्सवर ५०% पर्यंत सूट देत आहे, त्याशिवाय खात्रीशीर व्हाउचर्स जिंकण्याची संधी, निवडक स्मार्टफोन्सवर २०,००० रुपयांपर्यंत एक्स्चेंज व अपग्रेड लाभ देखील क्रोमामध्ये दिले जात आहेत.* 

क्रोमाला एक गोष्ट चांगलीच समजते की, सर्वात नवीन तंत्रज्ञानाचे लाभ सर्वांना मिळवून द्यायचे असतील तर त्याच्या किमती परवडण्याजोग्या असणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच क्रोमाने निवडक ५जी स्मार्टफोन खरेदीवर ४९९९ रुपयांचे स्मार्टवॉच फ्री यासारख्या अतिशय आकर्षक डील्स सादर केल्या आहेत.* ५जी स्मार्टफोनच्या निवडक श्रेणीतून केलेल्या खरेदीवर मोफत भेट म्हणून रिंग लाईट दिली जात आहे, जी व्हिडिओ बनवण्यासाठी वापरली जाऊ शकते. ५जी स्मार्टफोनसोबत रिंग लाईट मोफत ही ऑफर क्रिएटर आणि कन्टेन्ट मेकर्ससाठी खूपच उपयुक्त आहे. कॅम्पेन काळात काही ५जी स्मार्टफोनसोबत ४९९९ रुपयांचे स्मार्टवॉच मोफत भेट म्हणून दिले जात आहे.*

क्रोमाच्या या सेलमध्ये सॅमसंग गॅलॅक्सी ए१४ ५जी स्मार्टफोन फक्त १६४९९ रुपयांपेक्षा पुढील किमतींना खरेदी करण्याची आकर्षक संधी ग्राहकांना मिळत आहे. ६.६ इंची पीएलएस एलसीडी डिस्प्ले, ४जीबी रॅम, ५०एमपी+२एमपी+२एमपी ट्रिपल रियर कॅमेरा यासारख्या अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा लाभ या स्मार्टफोनमध्ये घेता येतो.

क्रोमाच्या ५जी वीकएंडमध्ये ५जी स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्रँड-न्यू टाटा नेक्सन किंवा ईव्ही बाईक जिंकण्याची धमाकेदार ऑफर देखील क्रोमाने सादर केली आहे.* गुढी पाडवा २२ मार्च पर्यंत या ऑफरचा लाभ घेतला जाऊ शकतो. म्हणूनच त्वरा करा आणि या अतुलनीय ऑफरचा लाभ मिळवा.

या डील्स अजून जास्त आकर्षक बनवण्यासाठी क्रोमाने काही कार्ड ऑफर्स देखील दिल्या आहेत. फेडरल बँक, एचएसबीसी किंवा आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १०% सूट मिळेल (२५०० रुपयांपर्यंत).*     

सर्वात नवीन ५जी तंत्रज्ञानमुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलत आहे. या तंत्रज्ञानाचे लाभ प्रत्येक युजरला घेता यावेत यासाठी क्रोमाने हे पाऊल उचलले आहे. नवा स्मार्टफोन खरेदी करणे सहजसोपे व परवडण्याजोगे बनवण्यासाठी या सेलमध्ये क्रोमाने एक्सक्लुसिव्ह डील्स व डिस्काऊंट्स  दिले आहेत.

हेही वाचा : 

एअर इंडियाची ग्राहकांना आनंददायी अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान उद्योगातील अग्रणी सेल्सफोर्स यांच्या सोबत भागीदारी