क्रेडिट वाईज कॅपिटलचा शेलार टिव्हीएस सोबत सहयोग

56

 पुणे : क्रेडिट वाईज कॅपिटलचा शेलार टिव्हीएस सोबत सहयोग कोविड-१९ महामारीनंतर दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम झाला असताना वैयक्तिक गतीशीलता पर्यायांसाठी वाढत्‍या मागणीमुळे विक्रीमध्‍ये वाढ होण्‍यास मदत झाली आहे. खरेतर, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्‍ये जानेवारी २०२३ पर्यंत विक्री करण्‍यात आलेल्‍या दुचाकींची संख्‍या १,३४,४१,८७३ युनिट्स होती (number of two-wheelers sold in FY2022-23 up till January 2023 stood at 1,34,41,873 units), जी जवळपास आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील आकडेवारीइतकी आहे. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्‍ये संपादित केलेल्‍या सर्वोच्‍च विक्रीपेक्षा अधिक असली तरी अधिकाधिक फर्स्‍ट-टाइम ग्राहक वैयक्तिक परिवहनाच्‍या सर्वात स्‍वस्‍त माध्‍यमाला प्राधान्‍य देत असल्‍यामुळे शहरी व ग्रामीण भागात मागणी पुढील काही आर्थिक वर्षांमध्‍ये वाढण्‍याची अपेक्षा आहे. या ग्राहकांना त्‍यांच्‍या खरेदींमध्‍ये मदत करण्‍यासाठी आधुनिक फायनान्सिंग स्टार्टअप्‍स व नॉन-बँकिग फायनन्शियल कंपन्‍यांची (एनबीएफसी) भूमिका अधिक महत्त्वपूर्ण असणार आहे, जेथे महागाईचा दबाव व उत्‍सर्जनाबाबत कडक नियमांमुळे दुचाकी किंमतींमध्‍ये वाढ होत राहिल.

दुचाकी डीलर्स या दृष्टिकोनाचा अवलंब करत असल्‍याचे सर्वोत्तम उदाहरण म्‍हणजे आज देशातील टीव्‍हीएस दुचाकीसाठी सर्वात मोठे ऑथोराइज्‍ड डीलर शेलार टीव्‍हीएस. श्री. बाबुराव शेलार यांनी १९७९ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली शेलार टीव्‍हीएस महाराष्‍ट्राच्‍या पश्चिम भागामध्‍ये कार्यरत असून नऊ आऊटलेट्स आहेत, जे विक्रीदरम्‍यान व विक्री-पश्‍चात्त जागतिक दर्जाची सेवा देतात. मागील चार दशकांमध्‍ये शेलार टीव्हीएस नवोन्‍मेष्‍काराच्‍या अग्रस्‍थानी आहे आणि द्वितीय श्रेणीच्‍या व त्‍यापलीकडील शहरांमधील विद्यमान व नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍याच्‍या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानांचा अवलंब करण्‍यासाठी सर्वात मोठी दुचाकी डीलर आहे. या ग्राहकांसाठी जलद तंत्रज्ञान-संचालित कर्ज देण्‍याची गरज ओळखत शेलार टीव्‍हीएसने २०२० मध्‍ये क्रेडिट वाइज कॅपिटलसोबत सहयोग केला. या सहयोगांतर्गत शेलार टीव्‍हीएस विक्रीमध्‍ये वाढ करण्‍यासाठी त्‍यांच्‍या ऑनलाइन सोर्सिंग मॉडेल व तंत्रज्ञान-संचालित अंडरराइटिंग प्रक्रियेचा लाभ घेत आहे.

क्रेडिट वाइज कॅपिटलसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून शेलार टीव्‍हीएस दर महिन्‍याला ५० हून अधिक लीड्स निर्माण करण्‍यासाठी आणि कार्यरत असलेल्‍या प्रदेशांमधील द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या शहरांतील संभाव्‍य खरेदीदारांना ओळखण्‍यासाठी डिजिटल अवलंबतेला चालना देण्‍यास सक्षम आहे. अधिक म्‍हणजे, क्रेडिट वाइज कॅपिटीने शेलार टीव्‍हीएसच्‍या एकूण विक्री आकारमानापैकी जवळपास ६५ टक्‍के व्‍यापून घेण्‍यासह पसंतीची फायनन्शियर बनत त्‍यांची एकूण विक्री वाढवण्‍यास मदत केली आहे. कंझ्युमर फायनान्‍स नोंदणीकृत एनबीएफसीने शेलार टीव्‍हीएसच्‍या माध्‍यमातून गेल्‍या दोन वर्षांत ५,१०० हून अधिक दुचाकी कर्ज वितरित केले आहेत, ज्‍यामध्‍ये जवळपास ५० टक्‍के योगदान न्‍यू-टू-क्रेडिट (एनटीसी) आणि मागील कोणताही क्रेडिट इतिहास नसलेल्या ग्राहकांकडून आहे. परिणामत: शेलार टीव्‍हीएसला त्‍यांच्‍या विक्री आकारमानामध्‍ये विस्‍तार करता आला आहे, जेथे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्‍ये १६ टक्‍के वाढ झाली आणि या गुढीपाडव्‍याच्‍या सणासुदीच्‍या काळात १३०० दुचाकींची विक्री झाली.

या यशाचे बहुतांश श्रेय क्रेडिट वाइज कॅपिटलच्‍या कर्ज मान्‍यता प्रक्रियेला जाते, ज्‍यासाठी त्‍यांच्‍या प्रोप्रायटरी व्‍हॉट्सअॅप चॅटबोट ट्विन२ च्‍या माध्‍यमातून फक्‍त दोन मिनिटे लागतात. हे त्‍यांच्‍या पात्र ऑनलाइन लीड जनरेशन इंजिनशी संलग्‍न आहे, जे इतर स्‍पर्धात्‍मक डिजिटल व्‍यासपीठांच्‍या तुलनेत सर्वोत्तम असल्‍याचे सिद्ध झाले आहे. तसेच क्रेडिट वाइज कॅपिटल आपल्‍या प्रगत तंत्रज्ञान सूटच्‍या माध्‍यमातून शेलार टीव्‍हीएस सारख्‍या प्रिमिअम डीलर्सना सर्वोत्तम ग्राहक अनुभव दर्जा राखण्‍यास पाठिंबा देत आहे. यामुळे त्‍यांच्‍या भागीदार दुचाकी डीलर्सना उपस्थिती वाढवण्‍यास, जलद वितरण करण्‍यास आणि आनंदित ग्राहकांचा सतत विकसित होणारा समूह तयार करण्‍यास मदत झाली आहे.

देशांतर्गत दुचाकी उद्योगामध्‍ये झपाट्याने इलेक्ट्रिफिकेशनसह परिवर्तन होत असल्‍यामुळे शेलार टीव्‍हीएस सारखे डीलर्स इतर पारंपारिक दुचाकी विक्रेत्यांसाठी दीपस्तंभ आहेत. वाढत्या जनरेशन झेड व मिलेनिअल लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करणार्‍या क्रेडिट वाइज कॅपिटल सारख्या फिनटेक डिसरप्‍टर्ससोबत सहयोग करून विक्री मजबूत करणे हे या संदर्भात योग्य धोरण असल्याचे सिद्ध झाले आहे. क्रेडिट वाइज कॅपिटलसोबतचा सहयोग गेमचेंजर ठरला आहे. विशेषत: कोविड-१९ महामारीच्‍या काळात लोकांची उपस्थित मर्यादित होती, असे असले तरी आणखी बरेच यश मिळणे बाकी आहे.