कोविड – 19 व इतर आव्हानांवर मात करीत जेएनपीटीने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 7.7 दशलक्ष टीईयू मालाची हाताळणी केली

87

3 एप्रिल,2021: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) ने मागील आर्थिक वर्ष 2020 च्या 5.03 दशलक्ष टीईयूच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021 मध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली. जेएनपीटीने आर्थिक वर्ष 2019-20 च्या 68.45 टीईयूच्या तुलनेत   आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण 64.81 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली आहे.

जेएनपीटीमध्ये मार्च माहिन्यात एकूण 527,792 टीईयू कंटेनर वाहतुकीची हाताळणी केली गेली जी एका महिन्यात केली गेलेली ही आजवरची सर्वाधिक कंटेनर वाहतुक हाताळणी आहे. जेएनपीटीने मार्च 2020 मधील 5.93 दशलक्ष टन्सच्या तुलनेत मार्च 2021 महिन्यात एकूण 7.33 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली जी मागील वर्षाच्या याच महिन्याच्या वाहतुकीच्या तुलनेत 25.30% अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 मध्ये सर्व जहाजांच्या टर्न अराउंड वेळेमध्ये 2.62% ची उल्लेखनीय सुधारणा झाली असून मागील वर्षाच्या 29.42 तासांमध्ये सुधारणा होऊन आता ही वेळ 28.64 तास झाली आहे. कंटेनर जहाजांसाठीच्या टर्न अराउंड वेळेमध्ये सुद्धा (पायलट जहाजावर चढण्यापासून ते जहाजावरून उतरण्यापर्यंत) 2.01% ची सुधारणा झाली असून मागील वर्षाच्या 25.82 तासांच्या तुलनेत आता ही वेळ 25.30 तास झाली आहे.

जेएनपीटीमध्ये पाच कंटेनर टर्मिनल आहेत. टर्मिनलनिहाय आकडेवारीचा आढावा घेतला असता  एपीएम टर्मिनल मुंबई (जीटीआय) मध्ये 1.66 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयजीटी मध्ये  0.78 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयसीटी मध्ये 0.75 दशलक्ष टीईयू आणि जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या टर्मिनलमध्ये 0.54 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली गेली. आर्थिक वर्ष 2021 मध्ये नव्याने विकसित झालेल्या बीएमसीटीने सुमारे 0.93 दशलक्ष टीईयू हाताळले. एनएसआयसीटी आणि बीएमसीटीपीएलने माल हाताळणीमध्ये आथिर्क वर्ष 2020-21 मध्ये अनुक्रमे 41.33 आणि 15.36% वाढ नोंदविली आहे.

जेएनपीटी मधील बीपीसीएल लिक्विड कार्गो टर्मिनलने आर्थिक वर्ष 2019-20 मधील 57 जहाजांमधून हाताळणी केलेल्या 0.85 दशलक्ष टनांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 70 जहाजांमधुन 1.04 दशलक्ष टन एलपीजी हाताळला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत 22.35% अधिक आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान जेएनपीटीने 6,097 रेक हाताळले आणि आर्थिक वर्ष 2020-21 (एप्रिल ते मार्च) मधील रेल-गुणांक 19.73% आहे, जो मागील वर्षी 5,127 रेकसह 16.14% होता.

जेएनपीटीच्या कमागिरीविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठीभा.प्र.सेम्हणाले, ” कोविड-19 ची जागतिक महामारी असतानाही जेएनपीटीने आपल्या भागधाराकांसोबत या आव्हानाचा यशस्वीरित्या सामना करीत या महामारीविरुद्ध मजबूत आणि उत्साही लढा उभारला. सांघिक  प्रयत्नांत प्रत्येकाने आपले सर्वस्व पणाला लावून काम केले आणि पोर्टला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चांगली कामगिरी टिकवून ठेवण्यास मदत केली. जेएनपीटी हा देशातील पुरवठा साखळीचा महत्त्वपूर्ण भाग असून जेएनपीटीने आपले कर्तव्ये पार पाडत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आणि योगदान देत राहील. आमची उत्कृष्ट कामगिरी ही व्यापाराच्या सक्षमीकरणासाठी व जागतिक समुद्री क्षेत्रात भारताला अग्रस्थानी नेण्यासाठीच्या आमच्या निरंतर  प्रयत्नांचे प्रमाणीकरण आहे.”

ऑपरेशनल एक्सलन्ससोबतच जेएनपीटी व्यापार सुलभरित्या करता यावा यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. या अंतर्गत जेएनपीटीने बीएमसीटी टर्मिनलला जेएनपीटीच्या इतर चार कंटेनर टर्मिनल्सला जोडणारा नवीन इंटर टर्मिनल मार्ग सुरु करून एक मोठे पाऊल उचलले. तसेच मागील महिन्यात रेल्वेने मेहसाणा (गुजरात) ते जेएनपीटी पर्यंत पर्यंत डबल स्टॅकड़ ड्वार्फ कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली. या बरोबरच सरत्या आर्थिक वर्षात, जेएनपीटीला भारतातील पहिले बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र जेएनपीटी-सेझ सुरु करण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच, जेएनपीटीने किनारपट्टीवरील तब्बल अडीच दशलक्ष टन द्रव मालवाहतुकीची क्षमता असलेल्या कोस्टल बर्थचे बांधकामसुद्धा  पूर्ण केले आहे.

जेएनपीटी समुद्री क्षेत्राची वाढती मागणी आणि समुद्री क्षेत्रातील नवीन जागतिक प्रवाहांशी जुळवून घेण्यासाठी आपल्या सेवा उन्नत करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.

जेएनपीटीविषयी :

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. भारतातील मुख्य बंदरांमध्ये होणाऱ्या एकंदर कंटेनर कार्गो वाहतुकीच्या  सुमारे 52% कामकाज जेएनपीटी येथे चालते. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी),  गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.