कोलिअर्सने केला पुण्यातील नेतृत्वाचा विस्तार, रुचिका चौदाहा यांची वरिष्ठ संचालक व कार्यालय सेवा प्रमुखपदी नियुक्ती

67
Colliers expands leadership in Pune, appoints Ruchika Chaudaha as senior director and head of office services

पुणे७ फेब्रुवारी २०२३ : आपल्या व्यवसायाचे कामकाज आणि या प्रदेशातील वाढीच्या संधींचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कोलिअर्सने पुण्यातील कार्यालय सेवा व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी रुचिका चौदाहा यांची नियुक्ती केली आहे. त्या निष्णात रिअल इस्टेट व्यावसायिक असून त्यांच्याकडे १३ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. या उद्योगातील सर्वाधिक मागणी असलेल्या लीडर्सपैकी त्या एक आहेत.

Colliers expands leadership in Pune, appoints Ruchika Chaudaha as senior director and head of office services

जेएलएल आणि कुशमन अँड वेकफील्ड यांच्या सहित रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख्य कंपन्यांसोबत रुचिका यांनी काम केले असून तेथे वरिष्ठ पदे भूषविली तसेच अत्यंत कार्यक्षम टीमचे नेतृत्वही केले आहे. बाजारपेठेची सखोल जाण आणि उद्योगातील अनुभवामुळे त्या प्रसिद्ध विकसकगुंतवणूकदार आणि ऑक्युपायर्सच्या प्रमुख सल्लागार आहेत.

रिअल इस्टेट बाजारपेठेत कोलिअर्स इंडियाची स्थिती भक्कम करण्यासाठी त्या वरिष्ठ नेतृत्वासोबत काम करतील. त्यांच्या प्रगत क्षमता आणि उद्योगातील उत्कृष्ट संबंधांमुळे त्या ग्राहकांना असाधारण परिणाम मिळवून देतील आणि ब्रँडला पुढे नेतील. रुचिका यांना  बाजारपेठेची जाण आणि तीक्ष्ण कार्यक्षमतेचा लाभ घेत बाजारपेठेतील संधींचा लाभ उठवतीलनवीन व्यवसाय विकसित करतील आणि विद्यमान भागधारकांशी संबंध मजबूत करतील.

कोलिअर्स इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक(पुणे), अनिमेश त्रिपाठी म्हणाले की, रुचिका यांच्यासारख्या अत्यंत उत्साहीतडफदार आणि अनुभवी नेत्या आमच्यात सामील होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या स्टेकहोल्डर्सकडून नेहमीच सर्वोत्तम कार्य करण्याची खात्री करणाऱ्या रुचिका या बाजारपेठेतील आमची स्थिती मजबूत करण्यासाठी उद्योगातील त्यांचे व्यापक मजबूत नेटवर्कधोरणात्मक कौशल्य आणि बाजारपेठेची जाण यांचा आधार घेतील आणि कोलिअर्ससाठी नाविन्यपूर्ण आणि असाधारण सोल्यूशन्स राबवतीलअसा मला विश्वास आहे. कोलिअर्स नेहमीच अधिकाधिक महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणण्याचा प्रयत्न करते. अनुभवी लीडर म्हणूनरुचिका ग्राहकांपर्यंत कमाल मूल्य पोचविण्यासाठी उद्योगातील सर्वोत्कृष्ट प्रतिभांची जोपासना करण्यात मदत करेल.

रुचिका चौदाहा म्हणाल्या की, माझ्या नवीन भूमिकेबाबत मी खूप उत्सुक आहे. कोलिअर्समध्ये सामील होणे हे उत्साह देणारे आहे कारण बाजारपेठेतील प्रमुख रिअल इस्टेट सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रति त्यांची निष्ठा आणि क्लायंटला उच्च दर्जाचा अनुभव देण्याची माझी आवड हे एकमेकांशी जुळतात. ऑनबोर्डिंगच्या संपूर्ण प्रक्रियेत मला मार्गदर्शन करून मदत करणाऱ्या कोलिअर्सच्या वरिष्ठ नेतृत्वाची मी अत्यंत आभारी आहे. बाजारपेठेतील या अग्रगण्य टीममध्ये सामील होत असतानासर्वोत्तम प्रतिभांचे आवडीचे कार्यस्थळ म्हणून कोलिअर्सला योगदान आणि मदत करण्यास मी उत्सुक आहे.

हेही वाचा :

फेमिना मिस इंडिया २०२३ ऑडिशनला उदंड प्रतिसाद