पुणे : पुणे शहरातील बांधकाम क्षेत्रातील एक अग्रणी आणि मुंबई व बंगळूर मध्ये ज्यांचे अस्तित्व वाढत आहे अश्या कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL) यांनी ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले.
कामकाज (ऑपरेशनल) ठळक मुद्दे- आर्थिक वर्ष-२३
New area sales | FY23 | FY22 | YoY |
Volume (million sq. ft.) | 3.27 | 2.71 | 21% |
Value (Rs. crore) | 2,232 | 1,739 | 28% |
Realization (Rs./Sq. ft.) | 6,817 | 6,407 | 6% |
Collections (Rs. crore) | 1,902 | 1,574 | 21% |
कामकाज (ऑपरेशनल) ठळक मुद्दे- आर्थिक वर्ष-२३ ची चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष-२३ चे उत्तरार्ध (एच २)
New area sales | Q4FY23 | Q3FY23 | Q4FY22 | QoQ | YoY | H2FY23 | H1FY23 | HoH |
Volume (million sq. ft.) | 0.97 | 1.13 | 0.78 | -14% | 25% | 2.10 | 1.17 | 80% |
Value (Rs. crore) | 704 | 716 | 501 | -2% | 41% | 1,420 | 812 | 75% |
Realization (Rs./Sq. ft.) | 7,225 | 6,339 | 6,418 | 14% | 13% | 6,748 | 6,960 | -3% |
Collections (Rs. crore) | 589 | 435 | 500 | 35% | 18% | 1,024 | 878 | 17% |
संकलनामध्ये डीएमए प्रकल्पांचे योगदान समाविष्ट आहे
आर्थिक वर्ष-२३ ची चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष-२३ च्या कामगिरीबाबत बोलताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल तळेले म्हणाले, “मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने आर्थिक वर्ष-२३ मध्ये विक्री मूल्य, विक्रीचे प्रमाण आणि संकलनाच्या सर्वोच्च पातळींसह विक्रमी कामगिरी केली आहे. कंपनीमध्ये गेल्या २ वर्षांत महत्त्वपूर्ण होत आहेत ज्यामुळे आर्थिक वर्ष २१ मध्ये १,२०१ कोटीवरुन आर्थिक वर्ष २३ मध्ये विक्री रु. २,२३२ कोटी एवढी म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे. देशांतर्गत रीअल इस्टेट क्षेत्र उत्साही आहे आणि टेलविंडचा (महसूल, नफा आणि विकास करणारे घटक) फायदा घेत आहे. स्वतःच्या मालकीचे घर असावे याबाबतची वाढती व सुधारित भावना आणि दर्जेदार जीवन शैली मिळवता येईल असे घर असावे अशी आकांक्षा या अनुकूल मागणी वातावरणाचा कोलते-पाटील मध्ये आम्ही फायदा घेतला आहे. वर्षभरात, ग्राहकांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अधिक मागणी असलेल्या विभागांमध्ये आणि जेथे मागणी आहे अशा भौगोलिक क्षेत्रांमध्ये आम्ही सुमारे तीन दशलक्ष चौरस फूट एवढी घरे लॉंच केली आहेत. प्रतिसाद देखील दिलासा देणारा आहे कारण या पुनरावलोकन करत असलेल्या वर्षात नवीन लॉंच झालेल्या प्रकल्पांमध्ये विक्री संख्या सुमारे ~५१% एवढी मजबूत आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २३ ची विक्री मागील वर्षीपेक्षा
(वाय ओ वाय) २८% नी वाढून ती रु. २,२३२ कोटी एवढी झाली. ३.३ दशलक्ष चौरस फूट विक्री प्रमाण असून ते मागील वर्षीपेक्षा (वाय ओ वाय) २१% नी वाढला आहे. आमच्या टीमने केलेल्या उत्तम अंमलबजावणीमुळे सर्व प्रकल्पांमध्ये जलद गतीने महत्वपूर्ण टप्पे गाठल्याचे पाहण्यात आले, ज्यामुळे कंपनीचे संकलन मागील वर्षीपेक्षा २१% नी सुधारून रु, १,९०२ कोटी वर आले. वितरण ~३.३ दशलक्ष चौरस फूट एवढे मजबूत होते. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आर्थिक वर्ष २३ ची चौथी तिमाही ही सलग दुसरी तिमाही आहे ज्यामध्ये रु. ७०० कोटींपेक्षा जास्त विक्री झाली आहे. आम्ही रु. ७९७ कोटी एवढ्या महसूलावर आणि २२% ईबीआयटीडीए मार्जिन वर ही तिमाही बंद केली. सशक्त ताळेबंद आणि मजबूत रोख प्रवाहाच्या आधारावर, संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २३ साठी प्रति इक्विटी शेअर रु. ४ एवढी अंतिम लाभांशाची शिफारस केली.
एक महत्वाची घडामोड म्हणजे, एप्रिल २०२३ मध्ये आम्हाला मारूबेनी कॉर्पोरेशनकडून पिंपळे निलख प्रकल्पातील गुंतवणुकीसाठी रु. २०६.५ कोटी मिळाले, ज्यामुळे कंपनीला व्यवसाय विकासाच्या संधींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी लिक्विडिटी प्राप्त झाली. मे २०२३ मध्ये कंपनीने पुणे आणि मुंबई येथे रु. २५०० कोटी रुपयांच्या टॉप लाइन क्षमतेसह प्रत्येकी दोन प्रकल्पांचे अधिग्रहण केले. आमच्या विवेकी आर्थिक व्यवस्थापन पद्धतींनी भविष्यातील वाढीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी आम्हाला उत्तम स्थितीमध्ये आणले आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये आम्ही रु. ८००० कोटीपर्यंतच्या टॉप लाइन क्षमतेचे प्रकल्प मिळवू आणि रु. २,८०० कोटी विक्री करू असा आम्हाला विश्वास आहे.
पुढे जाताना, नवीन प्रकल्पांच्या गतीशीलता, भविष्यातील अपेक्षित मजबूत व्यवसाय विकास आणि उत्कृष्ट ग्राहक समाधान हे सर्व एकत्रित जुळून आल्यामुळे येत्या वर्षांमध्येसुद्धा आम्ही आमच्या सर्व व्यवसाय प्रयत्नांमध्ये अशीच वाढ चालू ठेवण्यास उत्सुक आहोत. आमच्या सर्व भागधारकांसाठी एक उत्तम मूल्य निर्माण करण्याबाबत आम्हाला विश्वास आहे.”
आर्थिक वर्ष-२३ आणि आर्थिक वर्ष-२३ची चौथी तिमाही चे वित्तीय ठळक मुद्दे:
P&L Snapshot (Rs. crore) | FY23 | FY22 | Y-o-Y | Q4 FY23 | Q4 FY22 | Y-o-Y |
Revenue from Operations | 1,488.4 | 1,117.5 | 33.2% | 796.9 | 376.1 | 111.9% |
EBITDA | 189.3 | 186.2 | 1.7% | 173.4 | 40.5 | 328.5% |
EBITDA Margin (%) | 12.7% | 16.7% | – | 21.8% | 10.8% | – |
Net Profit (post-MI) | 102.5 | 79.4 | 29.0% | 116.9 | 26.8 | 335.8% |
PAT margin (%) | 6.9% | 7.1% | – | 14.7% | 7.1% | – |