कोकणातील कृषी पंपासाठीचा वाढीव वीज दर रद्द ; आमदार शेखर निकम यांच्या लढ्याला यश

79
Lift moratorium on funding of projects important in terms of tourism : Shekhar Nikam's demand in the Legislative Assembly

मुंबई / प्रतिनिधी ( विलास गुरव ) : कोकणातील बागायतीला ऊर्जा विभागाकडून महावितरण मार्पत Ag other then अन्यायकारक वीज दर लावला जातो याबाबत सातत्याने प्रश्न मांडून माननीय आमदार शेखर निकम यांनी अन्यायकारक वीज दराचा प्रश्न सोडवला आहे.  

कोकणामध्ये नारळ, काजू, पोफळी, चिकू, आंबा इत्यादी बागायतीची शेती केली जाते. महावितरण कंपनीकडून कोकणातील  लागवड आहे त्या लागवडीसाठी आदर कनेक्शन दिले जातात आणि त्यामुळे लाईट बिल प्रचंड येत. तर हा निकष इतर महाराष्ट्रासाठी लागू का नाही? कोकणात वीज बिले वेळेत भरली जातात, लाईट ची चोरी होत नाही म्हणून कोकणातल्या पिकांवर अन्याय आपण करताय? याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी आमदार निकम साहेबांनी सातत्याने अधिवेशनात मागणी केली. 

ही कोकणाची पिके आहेत. त्यांना ऍग्रीकल्चर च्या कॅटेगरीमध्ये लाईट बिल देण्याची व्यवस्था त्वरित करण्यात यावी. द्राक्ष डाळिंब ऊस अन्य फळांची बागायती पिकांना Ag मध्येच समावेश करता मग कोकणातच अन्याय का?  २०१५ साली  सुधारित जीआर झाला त्यामुळे परिपत्रक २४३  नुसार कारवाई कोकणातच केली आहे हा आमच्यावर अन्याय आहे.  पूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू न होता फक्त कोकणातच याची अंमलबजावणी तातडीने केली जाते तर त्याला तातडीने स्थगिती देणार का? असा प्रश्न आमदार शेखर सरांनी मंत्री महोदयांना करुन हा होणारा अन्याय तातडीने दूर करावा अशी सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी केली.  

आदरणीय पवार साहेबांनी रोजगार हमी योजने मध्ये लागवड करण्यास प्रोत्साहन दिले त्यामुळे कोकणातील तरुण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात बागायती करुन प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इथे या बाबतीत काही त्वरित निर्णय घ्यावा किंवा पूर्ण महाराष्ट्रात हा जास्तीचा दर लागू करावा म्हणजे विधानसभेतील २८८ सदस्यांना सर्वानांच कळेल व सर्वांनाच भोगावे लागेल असे रोखठोक मत आमदार शेखर निकम यांनी मांडले आणि याबाबत खूप गांभिर्याने विचार करावा अशी मंत्री महोदयांना विनंती केली.  

या विनंतीचा विचार करत तत्कालीन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. बाळासाहेब थोरात साहेब, तसेच सद्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. पालक मंत्री उदयजी सामंत तसेच महावितरण विभागाचे अधिकारी वर्ग  यांचे सुद्धा सहकार्य महावितरण  Ag other then  वीज दराबाबतचा  प्रश्न मार्गी लावताना लाभले आहे.

याबाबत चिपळूण- संगमेश्वर चे  आमदार शेखर निकम यांनी तात्कालीन महाआघाडी सरकार व सद्याचे सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.