पुणे, ८ ऑगस्ट, २०२३ : सीएनएच इंडस्ट्रीयल (CNH Industrial) चा एक भाग व महत्त्वाचा ब्रॅंड असलेल्या केस कन्स्ट्रकशन ईक्विपमेंट (CASE Construction Equipment) ने ठाणे येथे बॉम्बे इन्फ्रा या नवीन डीलर भागीदाराची नियुक्ती करून महाराष्ट्रातील आपली उपस्थिती अजून वाढवली आहे.
ठाणे बेलापुर रस्त्यावरील खैरणे एमआयडीसी येथे असलेले बॉम्बे इन्फ्रा हे केस इंडिया (CASE India) च्या ग्राहकांना विक्री, सेवा आणि सुटे भाग याबाबत सहाय्य करेल. ही डीलरशिप ठाण्यासह मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या आसपासच्या भागातही कार्यरत राहील. कामकाज चालू झाल्याचे प्रतीक म्हणून उद्घाटन समारंभानंतर कंपनीने ग्राहकांना चार मशीन वितरित केल्या.
या उद्घाटनाबाबत बोलताना केस कन्स्ट्रकशन ईक्विपमेंट (CASE Construction Equipment) चे नेटवर्क डेव्हलपमेंट व्यवस्थापक (भारत आणि सार्क) श्री. कवल दीप सिंघ भोगल म्हणाले, “आमच्या ग्राहकांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करणे आणि त्या अनुषंगाने त्यांना उत्तम सेवा देणे या आमच्या वचनबद्धतेशी आमचा हा महाराष्ट्रातील विस्तार पूरक आहे.
ही सुविधा म्हणजे आमच्या मौल्यवान ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या आमच्या ध्येयाचे प्रतिबिंबच आहे. आम्हाला खात्री आहे की, या सुधारित पायाभूत सुविधांमुळे आम्हाला आमचे ग्राहक संबंध अजून जास्त मजबूत करून आमच्या ग्राहकांना उत्तम अनुभव देता येईल.”
ही अत्याधुनिक सुविधा केस (CASE) ची सर्व प्रकारची उत्पादने प्रदान करते आणि त्याशिवाय ग्राहक लॉऊंज, कार्यशाळा, प्रशिक्षण किंवा परिसंवादासाठी जागा यांच्यासह उत्कृष्ट असा ग्राहक अनुभव देण्याचे आश्वासन देखील देते.
१८४२ पासून बांधकाम यंत्रसामुग्रीमध्ये (कन्स्ट्रकशन ईक्विपमेंट) जगात आघाडीवर असलेली केस (CASE) ही कंपनी भारतात १९८९ पासून कार्यरत आहे. केस (CASE) वायब्रेटरी कॉम्पॅक्टर विभाग आणि बॅकहो लोडर विभाग यामध्ये सुरुवातीपासून सातत्याने बाजारपेठेत अग्रणी आहे.
कंपनी मध्यप्रदेशातील पीथमपूर येथील आपल्या अत्याधुनिक अशा उत्पादन सुविधेमध्ये देशांतर्गत मागणीसाठी व १०५ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यातीसाठी भारतात निर्मिती केलेली (मेड इन इंडिया) उत्पादने बनवते.