कॅनन इंडियाकडून १६ नवीन प्रगत प्रिंटर्स लाँच, जे वापरकर्त्‍यांना देतात सुधारित प्रिंट दर्जा, अपवादात्‍मक कार्यक्षमता व उच्‍चस्‍तरीय सर्जनशीलता 

67
Canon India launches 16 new advanced printers, offering users improved print quality, exceptional performance and superior creativity

पुणे : नवोन्‍मेष्‍काराच्‍या आपल्‍या वारसाला अधिक पुढे घेऊन जात कॅनन या अग्रगण्‍य डिजिटल इमेजिंग कंपनीने आज पिक्‍झमामॅक्सिफाय व इमेजक्‍लास सिरीजमधील त्‍यांच्‍या विस्‍तारित पोर्टफोलिओला अधिक प्रबळ करत भारतात १६ प्रिंटर्सची नवीन श्रेणी लाँच केलीप्रिंटर्सच्‍या नवीन श्रेणीसह कॅनन इंडिया प्रिंटर्सच्‍या भूमिकेला पुनर्परिभाषित करत आहे आणि ग्राहकांना जीवनाप्रती ऊर्जा व त्‍यांच्‍या डिजिटल अभिव्‍यक्‍तींना स्‍वरूप देत त्‍यांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला चालना देत आहे.Canon India

घरगुती व एसओएचओ ग्राहकांसाठी: पिक्‍झमाजी१७३०,जी१७७०जी२७७०जी२७३०जी३७७०जी३७३०जी४७७०

पिक्‍झमा प्रिंटर्स उच्‍च प्रिंट उत्‍पन्‍न व किफायतशीर प्रिंटींगसह उत्‍पादकता वाढवतात. सुलभ इंक रिफिलिंग व मोठ्या इंक साठ्यामधून सिरीजचे प्रमुख लाभ दिसून येतातज्‍यामधून प्रिंटींगदरम्‍यान शाई संपण्‍याचे प्रमाण कमी करत घर व लहान कार्यालयांसाठी सुलभ कार्यसंचालनाची खात्री मिळते.

नवीनएस’ मिनी-इंक बॉटल्‍स 

पिक्‍झमा जी१७३०जी२७३०जी३७३० नवीन जीआय ७१एस इंक बॉटल्‍ससह येतात. पुरेशा प्रिंट आकारमानांसाठी वापरकर्ते कमी खर्चिक इंक रिफिल बॉटल्‍सचा अवलंब करू शकतातज्‍या ब्‍लॅक-अॅण्‍ड-व्‍हाइट डॉक्‍युमेंट्ससाठी जवळपास ३,९०० पेजेस्आणि कलर डॉक्‍युमेंट्ससाठी ४,६०० पेजेस्1देतात. अधिकाधिक प्रिंट आकारमानांची गरज असलेले वापरकर्ते प्रमाणित इंक बॉटल्‍सचा अवलंब करू शकतातज्‍या ब्‍लॅक-अॅण्‍ड-व्‍हाइट डॉक्‍युमेंट्ससाठी जवळपास ७,६०० पेजेस्1आणि कलर डॉक्‍युमेंट्ससाठी ८,१०० पेजेस्1देतात. यामुळे वारंवार इंक टँक रिफिल करण्‍याची गरज लक्षणीयरित्‍या कमी होते.

या मोठ्या घोषणेबाबत आपले मत व्‍यक्‍त करतकॅनन इंडियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. मनाबू यामाझाकीम्‍हणाले, ‘‘विभागांमधील झपाट्याने बदलत असलेल्‍या हायब्रिड लँडस्‍केपमुळे तंत्रज्ञानामधील प्रगतीद्वारे चालना मिळत लक्षणीय पायाभूत परिवर्तन घडून आले आहेत. या विकसित बाजारपेठ गरजांमधून प्रेरणा घेत आम्‍हाला १६ नवीन अत्‍याधुनिक प्रिंटर्स लाँच करण्‍याचा आनंद होत आहेजे कॅननचा नवोन्‍मेष्‍कारी व ग्राहकांना आनंदित करण्‍याच्‍या दीर्घकालीन वारसाला पुढे घेऊन जात आधुनिक तंत्रज्ञान व किमतीसंदर्भातील कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन देतात. पोर्टफोलिओ विस्‍तारीकरणासह आमचा वापरकर्त्‍यांना या सध्‍याच्‍या हायब्रिड कामकाज वातावरणात त्‍यांच्‍या कामात मूल्‍याची भर करणारे सोल्‍यूशन्‍स देत त्‍यांच्‍यामधील प्रिंटींग संस्‍कृतीला वाढवण्‍याचा मनसुबा आहेज्‍यामुळे त्‍यांना प्रिंट करण्‍यासाठी अधिक कारणे मिळतील. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आमची नवीन उत्‍पादने ग्राहकांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय प्रवासामध्‍ये सक्षम करतीलपरिणामत: आम्‍हाला उद्योगामध्‍ये ३० टक्‍के मार्केट शेअर संपादित करण्‍यामध्‍ये मदत होईल.’’ 

नवीन लाइन-अपबाबत सांगतानाकॅनन इंडियाच्‍या प्रॉडक्‍ट अॅण्‍ड कम्‍युनिकेशनचे वरिष्‍ठ संचालक श्री. सी. सुकुमारनम्‍हणाले, ‘‘कॅनन इंडिया नवोन्‍मेष्‍कारी व दर्जा-केंद्रित दृष्टिकोनाप्रती कटिबद्ध आहे आणि प्रिंटर्सची नवीन लाइन-अप या मिशनमध्‍ये अपवाद नाही. आजच्‍या काळात हायब्रिड व डिजिटल कर्मचारीवर्गाच्‍या संस्‍कृतीला अवलंबून घेत एचओएचओएमएसईसरकारगृह विभागामधील व्‍यावसायिक व कॉर्पोरेट्स कार्यक्षमता व उत्‍पादकता सुधारण्‍यास अधिक आरओआय देणाऱ्या पायाभूत सुविधांचा शोध घेत आहेत. वापरकर्त्‍यांना सर्वात किफायतशीर कार्यप्रवाह आणि कार्यक्षमता सुधारणारे एर्गोनॉमिकली प्रगत सोल्‍यूशन्‍स देण्‍यावर लक्ष कें‍द्रित करत प्रिंटर्सची नवीन श्रेणी विकसित करण्‍यात आली आहे. तसेच नवीन लेझर प्रिंटर्समध्‍ये प्रगत उच्‍च स्‍तरीय डेटा सिक्‍युरिटी व एन्क्रिप्‍शन वैशिष्‍ट्ये आहेतज्‍यामुळे हे प्रिंटर्स लघु व्‍यवसाय व एंटरप्राइझ ग्राहकांसाठी योग्‍य निवड आहेत. या प्रिंटर्सच्‍या लाँचसह आमचा प्रिंटींगसाठी नवीन मार्ग निर्माण करण्‍याचातसेच युजर विभागांमध्‍ये पोहोच व उपलब्‍धता वाढवण्‍याचा मनसुबा आहे.’’ 

किंमत व उपलब्‍धता

 

Model Number Retail Price Availability
PIXMA G3770 INR 20,270/- 1st April
PIXMA G2770 INR 15,840/- 1st April
PIXMA G1737 INR 13,845/- 1st April
PIXMA G1730 INR 10,325/- 1st April
PIXMA G2730 INR 13,365/- 1st April
PIXMA G3730 INR 16,295/- 1st April
PIXMA G4770 INR 24,775/- 1st April
GX3070 INR 47,295/- 1st April
GX4070 INR 54,800/- 1st April
GX 3072 INR 53.465/- 1st April
LBP121dn TDB 1st April
LBP122dw INR 21,295/- 1st April
MF271dn INR 28,895/- 1st April
MF272dw INR 32.695/- 1st April
MF274dn INR 32,995/- 1st April
MF275dw INR 36,795/- 1st April