पुणे : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्टा आयोजित ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘कूस’ कादंबरीवर परिसंवादाचे आयोजन केले आहे. शुक्रवार, दि. ७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे येथे ‘कूस (कादंबरी) : स्त्रीच्या जगण्याचा व आरोग्याचा कथात्मक शोध’ या विषयावर हा परिसंवाद होणार आहे. गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनांबद्दल वास्तववादी नोंदी करणारी ही कादंबरी आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात सुप्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेवती राणे, वंचित विकासच्या संचालिका मीना कुर्लेकर, समीक्षक व साहित्यिक प्रा. डॉ. रणधीर शिंदे सहभागी होणार आहेत. लेखक ज्ञानेश्वर जाधवर, रोहन प्रकाशनाचे प्रदीप चंपानेरकर, केशायुर्वेद संशोधन संस्थेचे डॉ. हरीश पाटणकर आदी उपस्थित राहणार आहेत.