मुंबई : कूलिंग उत्पादनांमध्ये भारतात सर्वात आघाडीवर असलेला, देशातील नंबर १ एसी ब्रँड आणि टाटा समूहातील एक सदस्य व्होल्टासने कूलिंग उत्पादनांच्या क्षेत्रात आपले नेतृत्वस्थान अधिक मजबूत केले आहे. शुद्ध आणि फ्लेक्सिबल एअर कंडिशनिंग हे व्होल्टास २०२३ इन्व्हर्टर एसी रेंजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यामध्ये एचईपीए फिल्टर, पीएम १.० सेन्सर आणि एक्यूआय इंडिकेटर आहेत ज्यामुळे खोलीतील हवा शुद्ध करण्यात मदत मिळते. यामध्ये ६ स्टेज ऍडजस्टेबल मोड आहे ज्यामध्ये कन्व्हर्टिबल कूलिंगची सुविधा आहे, खोलीत किती उष्णता आहे आणि किती लोक आहेत त्यानुसार युजर वेगवेगळ्या टनेजमध्ये स्विच केले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला मिळते सुरक्षित व शुद्ध हवा, तसेच तुम्ही खर्चात देखील बचत करू शकता. नवीन श्रेणीमध्ये आरामदायी झोपेसाठी सुपर सायलेंट ऑपरेशनची सुविधा देण्यात आली आहे, अधिक चांगल्या कामगिरीसाठी आईस वॉश आणि फिल्टर क्लीनिंग इंडिकेटर दिले गेले आहेत, प्रगत कामगिरी, आराम व सुविधेसाठी अँटी कोरोसिव्ह कोटिंग देखील दिले गेले आहे.
बाजारपेठेच्या अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार, घरगुती उपकरणांना अपग्रेड करण्याचा ट्रेंड ग्राहकांमध्ये दिसून येत आहे, त्यासाठी ते तंत्रज्ञानावर विशेष भर देतात. आधीच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की, घरगुती उपकरणांमध्ये भारतीय ग्राहक आराम, सुविधा, कूलिंग, आरोग्य आणि स्वच्छता यांना प्राधान्य देत आहेत. संशोधनानुसार, प्रत्येक पाचपैकी चार भारतीयांची इच्छा आहे की त्यांच्या एअर कंडिशनरमध्ये एअर प्युरिफिकेशन तंत्रज्ञान असले पाहिजे, त्यामुळे खोलीच्या आतील हवेतून प्रदूषके व जंतूंचा नाश करून हवा लगेचच स्वच्छ केली जाऊ शकते. आजही अनेक लोक घरूनच अनेक कामे करत आहेत, आरामदायी जीवनशैलीसाठी तंत्रज्ञानावर अवलंबून आहेत, त्यामुळे घरगुती उपकरणांना अपग्रेड करण्याचा ट्रेंड वाढत आहे.
एअर कंडिशनर्सच्या नवीन समर रेन्जबद्दल व्होल्टास लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री. प्रदीप बक्षी यांनी सांगितले, “आरोग्य व स्वच्छता यांच्याबरोबरीनेच आराम आणि सुविधा यांना प्रोत्साहन देणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढत आहे, त्यामुळे व्होल्टासने इन्व्हर्टर एसीची नवी श्रेणी सादर केली आहे ज्यामध्ये शुद्ध व फ्लेक्सिबल एअर कंडिशनिंगचे अनोखे वैशिष्ट्य आहे. ६ स्टेज ऍडजस्टेबल मोडसोबत कन्व्हर्टिबल कूलिंग तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याने युजर वेगवेगळ्या टनेज पर्यायांमध्ये स्विच करू शकतात. अतिरिक्त आराम आणि सुविधेसाठी नवीन रेन्जमध्ये अनेक नवी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या सीझनमध्ये उद्योगक्षेत्रात नावीन्याला महत्त्व दिले जात आहे, व्होल्टासमध्ये आम्ही आमच्या नव्या श्रेणीसह ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत.”
व्होल्टासच्या २०२३ च्या एसी प्रॉडक्ट रेन्जमध्ये एकूण ६४ नवीन एसकेयू आहेत, यापैकी ५० एसकेयू इन्व्हर्टर एसीचे, ४२ स्प्लिट इन्व्हर्टर एसी आणि ८ विंडो इन्व्हर्टर एसीचे आहेत. याशिवाय यामध्ये कॅसेट आणि टॉवर एसी देखील आहेत.
२०२३ च्या उन्हाळ्यासाठी व्होल्टासने व्होल्टास फ्रेश एअर कूलर्सचे ५१ एसकेयू लॉन्च केले आहेत. यामध्ये पर्सनल, विंडो, टॉवर आणि डेझर्ट एअर कूलर्स देखील आहेत. नवीन श्रेणीमध्ये ४ साईडेड कूलिंग ऍडव्हान्टेज देणारी विंडसर, स्टाईल आणि अल्ट्रा-कूलिंगसह एपिकूल अशी मॉडेल्स प्रस्तुत केली आहेत. कमर्शियल रेफ्रिजरेशन उत्पादनांमध्ये ५१ एसकेयू आणून कंपनीने आपला पोर्टफोलिओ अजून जास्त मजबूत केला आहे, यामध्ये कन्व्हर्टिबल फ्रीझर, फ्रीझर ऑन व्हील आणि कर्व्ह्ड ग्लास फ्रीझर यांचा समावेश आहे. याशिवाय कंपनीने वॉटर डिस्पेन्सर्सचे १५ आणि वॉटर कूलर्सचे २७ एसकेयू सादर केले आहेत. व्होल्टासकडे बी२बी सेगमेंटमध्ये कोल्ड रूम सोल्युशन्स आणि मेडिकल रेफ्रिजरेशन उत्पादनांची नवी श्रेणी देखील उपलब्ध आहे.
घरगुती उपकरणांचा भागीदारी ब्रँड व्होल्टास बेकोमार्फत २०२३ मध्ये नवीन उत्पादनांची सीरिज लॉन्च करून पोर्टफोलिओ अजून मजबूत करणे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ब्रँड वचन आणि मेक इन इंडिया अभियानाला पाठिंबा देण्याच्या बांधिलकीला अनुसरून व्होल्टास बेकोने नवीन फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्स आणि टॉप-लोड वॉशिंग मशिन्ससह होम अप्लायन्सेसच्या श्रेणीचा शुभारंभ केला आहे. एसी कॉम्प्रेसर आणि रेफ्रिजरेटर मोटरवर १२ वर्षांच्या वॉरंटीसह, भारतात तयार करण्यात आलेल्या या उत्पादनांमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये आहेत जी आधुनिक पिढीच्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम आहेत. सर्वोत्तम तंत्रज्ञानासह सुविधा प्रदान करताना, भारतात व्होल्टासचा होम अप्लायन्सेस पोर्टफोलिओ मजबूत करणे नवीन श्रेणीचे उद्दिष्ट आहे. फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिजरेटर्सच्या नवीन श्रेणीमध्ये निओफ्रॉस्ट ड्युएल कूलिंग, इंटर्नल इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर कंट्रोल आणि डिस्प्ले, एलईडी लॅमिनेशन आणि एकसमान कूलिंगसाठी प्रोस्मार्ट इन्व्हर्टर कॉम्प्रेसर, सक्षम लायटिंग आणि अखंडित ऑपरेशन्स इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. प्रत्येक घराला साजेसा फ्रिज मिळावा यासाठी यामध्ये रंगांचे सहा आकर्षक पर्याय देण्यात आले आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात व्होल्टासच्या कूलिंग अप्लायन्सेसच्या नवीन रेन्जसोबत आकर्षक फायनान्सिंग ऑफर्स दिल्या जात आहेत, यामध्ये १५% पर्यंत कॅशबॅक, इझी ईएमआय फायनान्स ऑफर, लाइफटाइम इन्व्हर्टर कॉम्प्रेसर वॉरंटी आणि ५ वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी यांचा समावेश आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या उत्पादनांची खरेदी सहज करता यावी हा ब्रँडचा उद्देश आहे.