कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचे बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते पिंपरीत उद्घाटन

153

पुणे२२ जानेवारी २०२३  : डिझायनर फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीसाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सने महाराष्ट्रातील आपले पहिले स्टोअर पुण्यातील पिंपरीमधील मोरवाडी येथे उघडले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुशल्स चे मार्केटिंग संचालक अंकित गुलेच्छा आणि संचालक दिपेश गुलेच्छा, मनीष गुलेच्छा,कल्पेश  गुलेच्छा, आणि नंदिश गुलेच्छा, तनसुख राज गुलेच्छा, आणि राजेंद्र गुलेच्छा  सह इतर मान्यवर उपस्थित होते

हे स्टोअर १५०० चौ. फुटांवर विस्तारलेले असून त्यात पुरातन वस्तू (अँटीक), कुंदन, झायक्रॉन, टेम्पल आणि सिल्व्हर ज्वेलरीतील दहा हजारांपेक्षा जास्त डिझाईन उपलब्ध आहेत. उत्कृष्ट वातावरणातील हे सर्वात मोठे कलेक्शन सर्व वयोगट, प्रसंग आणि शैलीच्या दृष्टीने दागिने खरेदीचा विशेष अनुभव प्रदान करते.

कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचे बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते पिंपरीत उद्घाटन

या उद्घाटनाच्या प्रसंगी  बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर म्हणाली, “आपल्या वैयक्तिक स्टाईलचा एक भाग म्हणून दागिन्यांकडे पाहणारी व्यक्ती या नात्याने माझ्या वेशभूषेला पूर्णपणे साजेशा वस्तूवाचून मला संपूर्णतेचा अनुभवच येत नाही.  कुशल्समधील पारंपरिकपासून ट्रेंडी आणि आधुनिक डिझाईनचा व्यापक संग्रह ही मला त्यांच्यातील सर्वाधिक आवडणारी बाब आहे. फॅशनच्या प्रवाहांबरोबर राहणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक शैलीला अनुरूप संग्रह उपलब्ध झाल्यामुळे कोणत्याही प्रसंगी फॅशनेबल आणि आत्मविश्वासपूर्ण वाटणे सोपे होते. वधूंसाठी आणि विवाह प्रसंगासाठीचा त्यांचा विशेष विभाग मला आवडला.”

कुशल्स फॅशन ज्वेलरीचे मार्केटिंग डायरेक्टर श्री. अंकित गुलेछा म्हणाले, “या शुभप्रसंगी मृणाल ठाकूर आमच्यासोबत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तिला फॅशनची उत्तम समज आहे आणि पारंपरिक भारतीय परिधानांपासून समकालीन स्टाईलपर्यंत विविध स्वरूपांचा लूक अनायासे बाळगण्याबद्दल तिची ख्याती आहे.  पुण्याचे नागरिक त्यांच्या दागिन्यांच्या प्रेमासाठी ओळखले जातात आणि ताज्या फॅशन ट्रेंडची त्यांना माहिती असते. कुशल्सचे कलेक्शन्स हे फॅशनबाबत सजग असलेल्या बाजारपेठेसाठी खास केलेले असतात आणि आतापर्यंत आमचे सकारात्मक स्वागत झाल्याचे पाहून आनंद होतो. आमच्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या एकमेव, उच्च दर्जाचे डिझायनर फॅशनचे दागिने पुरविण्याच्या आमच्या क्षमतेबाबत आम्हाला खात्री आहे.”

बारीक कलाकुसरीसह आपल्या विशिष्ट डिझाईन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कुशल्सला महिलांच्या फॅशन ज्वेलरीला पुन्हा नवे रूप देण्याचा अभिमान आहे. हा ब्रँड त्याच्या बहुमुखी पारंपारिक आणि समकालीन डिझाईन्स, असामान्य उत्पादन गुणवत्ता आणि भव्य स्टोअरसाठी ओळखला जातो. कोणतीही स्त्री स्टायलिश आणि फॅशनेबल असू शकते यावर कुशल्सचा विश्वास असून पारंपारिक, औपचारिक किंवा अनौपचारिक अशा सर्व प्रसंगांसाठी कुशल्स हे दागिन्यांचे एकमेव स्थान आहे.

आज देशातील १७ शहरांमध्ये ५१ स्टोअर्ससह, कुशल्स हा किरकोळ क्षेत्रातील आपला ठसा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात वेगाने विस्तारत आहे. लवकरच ते वाकड आणि विमाननगर येथील फिनिक्स मॉलमध्ये दोन स्टोअर सुरू करत आहेत. कुशल्स सध्या भारतातील इतर शहरांसोबतच बंगळुरु, हैद्राबाद, चेन्नई आणि चंदीगड येथे कार्यरत आहे. ग्राहक www.kushals.com वरसुद्धा ऑनलाइन खरेदी करू शकतात.

रीड मोरे :

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून विस्तार योजनेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण