मुंबई : महिंद्रा समूहाचा एक भाग आणि भारतातील आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, (महिंद्रा फायनान्स) आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी कार कर्ज लीड्सच्या को सोर्सिंगसाठी भागीदारी करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली आहे.
या भागीदारी सहयोगांतर्गत महिंद्रा फायनान्स बँक ऑफ बडोदासाठी कर्ज प्रक्रियेसाठी पूरक अशा बँक ऑफ बडोदाच्या देशभरातील विस्तृत नेटवर्कद्वारे बँकेच्या विस्तृत क्षेत्र आणि शाखा वितरण चॅनेलद्वारे नवीन आणि प्री-ओन्ड कार लोन लीड्स तयार करेल. १ एप्रिल २०२३ पासून संपूर्ण भारतभरातील व्याप्तीसह हा भागीदारी सहयोग लागू होईल.
महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त राऊल रेबेलो म्हणाले, “आर्थिक उपायांची सर्वसमावेशक श्रेणी एकाच छताखाली प्रदान करणे हा महिंद्रा फायनान्समध्ये आमचा मुख्य उद्देश आहे. ही भागीदारी व्यवस्था विविध ठिकाणच्या ग्राहकांच्या विस्तृत स्पेक्ट्रमपर्यंत क्रेडिट ॲक्सेस सक्षम करण्यात मदत करेल. बँक ऑफ बडोदासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत असून परस्पर फायदेशीर आणि शाश्वत सहभागाची अपेक्षा आहे.”
बँक ऑफ बडोदाच्या (रिटेल ॲसेट्स, MSME आणि ग्रामीण आणि कृषी बँकिंग)चे मुख्य महाव्यवस्थापक श्री. राजेश मल्होत्रा म्हणाले, “कार कर्ज व्यवसायात महिंद्रा फायनान्ससोबतच्या आमच्या भागीदारीची ही सुरुवात आहे. वाहन फायनान्सिंगमध्ये मजबूत स्थान निर्माण केलेल्या बँक ऑफ बडोदा आणि महिंद्रा फायनान्स या दोन सन्माननीय वित्तीय सेवा संस्था आहेत आणि ही भागीदारी आम्हाला आमची पोहोच वाढवण्यास आणि प्रत्येक विभागातील कर्जदारांना सेवा पुरवण्यास सक्षम करते.”
हेही वाचा :