काटी सारोळे रस्त्याचा विषय राजदरबारी

110

काटी सारोळे रस्त्याचा विषय राजदरबारी

बार्शी : गेल्या 20 वर्षांपासून नादुरुस्त असलेल्या काटी सारोळे रस्त्याचा विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजदरबारी मांडण्यात आला.

मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रस्ता लवकर दुरुस्त करून घ्या ह्या मागणीचे निवेदन तालुका अध्यक्ष आप्पाभाई गाटे यांनी दिले. यावेळी माजी उपसरपंच जितेंद्र चौधरी ग्रामपंचायत सदस्य संदीप साबळे प्रकाशभैया गाटे  कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याबाबत तात्काळ हे निवेदन संबंधित विभागाकडे पाठवणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षांपासून ह्यां रस्त्यांची अवस्था वाईट आहॆ. आम्ही सर्वांकडे निवेदन देऊनही याबाबत निर्णय होतं नसल्याने राजदरबारात हा प्रश्न मांडला. असे मतं तालुकाध्यक्ष  आप्पाभाई गाटे यांनी सांगितले.तुळजापूर  व बार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ह्यां रस्त्याकडे दुर्लक्ष होतं आहॆ.

केवळ मुरुमाच्या भरावावर हा रस्त्यांची वाहतूक सुरू आहॆ. 

सदर रस्त्यावर 2000 साली डांबरीकरण झाले. त्यानंतर मागील तीन वर्षात केवळ  1 किमीचे काम  झाले. तोही रास्ता नादुरुस्त झाला आहॆ.लवकरात लवकर ह्या रस्त्याचे काम सुरू  व्हावे. याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी गाटे यांनी  केली आहॆ.

हेही वाचा

आता पुण्यात पोलिसांकडूनच घ्या पैसे; ५ हजार ते १० हजार कमावता येणार; जाणून घ्या काय आहे प्रकरण