उरुळी कांचन ( प्रतिनिधी ) उरूळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठाने भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
हा विवाह सोहळा अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पाडून प्रार्थना करणाऱ्या ओढां पेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात हे समाजापुढे चांगले उदाहरण ठेवले आहे.
या विवाह सोहळ्याची माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी सांगितले की आपण सर्व समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही कस्तुरी प्रतिष्ठान २०१० साला पासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे.
इथे वर व वधुला घरापासून आणण्यापासून ते विवाह सोहळा संपल्यानंतर वराच्या घरी सोडण्यापर्यंत आमचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असतात .साखरपुडयाची सुपारी फोडण्यापासुन हळदीचा कार्यक्रम ,नवरदेवाचा परण्याचा कार्यक्रम करून विवाह सोहळा पार पाडला जातो.
सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाते .यावेळी आलेल्या वधूंनी सांगितले की या सोहळ्यात लग्न करून माझ्या लग्नाचा खर्च माझ्या शिक्षणासाठी करणार आहे. यावेळी वाहतूक पोलीस शाखेच्या आरती खलचे यांना उरुळी कांचन येथील रहदारी नियंत्रण व्यवस्था बजावत असल्याबद्दल गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण धायगुडे ,बापु लाड , कस्तुरी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष भन्साळी ,सचिव शंकर पाटील , खजिनदार महादेव रेवडकर , सदस्य घनश्याम मेमाने ,ऋषिकेश जगताप ,महेश कुंकूलोक , कौस्तुभ मेमाणे,गणेश उंबरकर, दत्तात्रय मदने ,हरी पुरुषवाणी व हजारो वऱ्हाडी उपस्थित होते.