कव्हर स्टोरी कडून पुण्यात ‘समरिना’ कलेक्शन लॉन्च

52
कव्हर स्टोरी कडून पुण्यात ‘समरिना’ कलेक्शन लॉन्च

पुणे : कव्हर स्टोरीने आपले नवे कलेक्शन ‘समरिना’ लॉन्च केले असून त्यानिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध पॅव्हिलियन मॉल येथील कव्हर स्टोरी स्टोरमध्ये एका शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आपले नवे कलेक्शन प्रस्तुत करण्यासाठी आणि सर्वांना एकत्र येऊन एकमेकांना भेटता यावे, मौजमस्ती करता यावी यासाठी सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्ती, फॅशन इन्फ्ल्यूएंसर्सना आमंत्रित करण्यात आले होते. या स्टोरमध्ये संपूर्ण विमेन्स वेअर कॅटेगरीमधील कव्हर स्टोरीचे दर्जेदार सर्वोत्तम कपडे उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.

यंदाच्या सीझनची सुरुवात कव्हर स्टोरीने आपले बहुमुखी समरिना कलेक्शन लॉन्च करून केली आहे.  रफल्सपासून एजी आणि शानदार सिल्हट्सपर्यंत आणि इतरही अनेक प्रकारच्या स्टाईल्सचा यामध्ये समावेश आहे. नवीन आंतरराष्ट्रीय रनवे शोजमधील आकर्षक समर ट्रेंड्स या नव्या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. हवानापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या नवीन स्प्रिंग २०२३ कलेक्शनमध्ये आयव्हरी, लॅव्हेंडर, फ्लोरल्स, ब्लॅक, ऑरेंज असे एकापेक्षा एक सरस रंग असून उन्हाळ्यातही मौजमस्ती करण्याचा उत्साह नक्कीच निर्माण करतील.

कव्हर स्टोरी कडून पुण्यात ‘समरिना’ कलेक्शन लॉन्च

कव्हर स्टोरी क्लोदिंग लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मंजुला तिवारी म्हणाल्या, “कव्हर स्टोरीमध्ये आमची डिझाइन्स लंडनमध्ये तयार केली जातात, जागतिक फॅशन ट्रेंड्सचा त्यावर खूप मोठा प्रभाव असतो, त्याचवेळी भारतीय साइझेस आणि सिल्हट्स यांना ते अनुरूप असावेत याकडे पूर्ण लक्ष पुरवले जाते. प्रत्येक सीझनमधील सर्वात कूल ट्रेंड्स आमच्या कलेक्शनमध्ये असावेत हा आमचा प्रयत्न असतो. आमचे समर कलेक्शन समरिना ट्रेंडी फॅशनिस्ट ग्राहकांना हवानाच्या आकर्षक समरस्केप्सचा अनुभव मिळवून देईल.”