कल्याण ज्वेलर्सचा संपूर्ण देशभरात १० दिवसीय ‘कल्याण ज्वेलरी फेस्टिवल’ – ०% घडणावळ आकारण्याची घोषणा

10

भारत, सप्टेंबर २०२३: भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि आघाडीच्या दागिन्यांच्या ब्रॅंड्सपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज त्यांच्या १५ सप्टेंबरपासून संपूर्ण देशभर चालू होणार्‍या १० दिवसीय वार्षिक सेलची घोषणा केली.  हा अनन्यसाधारण कार्यक्रम संपूर्ण भारतातील ग्राहकांना आणि दाग-न्यांची आवड असणाऱ्यांना त्यांच्या खरेदीवर जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी संधी उपलब्ध करून देईल. या खास वार्षिक सेलच्या दरम्यान कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये विक्रीस असणाऱ्या सर्व दागिन्यांवर ०% घडणावळ* आकारली जाईल.

या विशेष वार्षिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ग्राहकांना त्यांच्यारु.५०,०००* किंमतींच्या जडवलेल्या दागिन्यांच्या* प्रत्येक खरेदीवर खरेदीच्या अर्ध्या मूल्याच्या दागिन्यांवर ०% घडणावळ लागेल. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीसंदर्भात, प्रत्येक रु.५०,०००* आणि त्यावरील किंमतींच्या खरेदीवर सोन्याच्या मूल्याच्या अर्ध्या किंमतींच्या दागिन्यांवर ०% घडणावळ लागेल. अनोखी महासवलत एक लाख आणि त्यापेक्षा जास्त किंमतींच्या खरेदीवर लागू आहे.

ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पहिली जाते तो सणासुदींचा काळ उंबरठ्यावर असताना कल्याण ज्वेलर्सने सर्व गिन्यांवरील व्हीए (वॅल्यु अॅडिशन) वर १०% पर्यंत सूट तर खड्याच्या किमतींवर* ५% पर्यंत सूट जाहीर केली आहे.

कंपनी संपूर्ण देशभरातील ग्राहकांना ही अनन्यसाधारण ‘सुवर्णसंधी’ देत आहे. या ‘कल्याण ज्वेलरी फेस्टिवल’चा जास्तीतजास्त ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी कंपनीने जाहीर केले आहे की, कल्याण ज्वेलर्सच्या सर्व दागिन्यांवर ही सवलत लागू होईल. हा दहा दिवसीय महोत्सव १५ सप्टेंबर २०२३ पासून चालू होऊन २५ सप्टेंबर २०२३ ला त्याची सांगता होईल.

या अनोख्या महोत्सवाविषयी बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरमण म्हणाले, “कल्याण ज्वेलर्समध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी दागदागिन्यांचे असलेले महत्व आणि आपल्या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीमधील त्यांची अविभाज्य भूमिका यांची पूर्ण जाणीव आहे. वर्षातील सर्वात शुभ काळ म्हणजे भारतीयांच्या सणासुदीचा काळ जवळ येत असताना ग्राहकांच्या मनात एक खास उल्हास व आनंदाची भावना उत्पन्न होते. त्या विशेष भावनेने आम्हाला या अनोख्या व रोमांचक संकल्पनेची प्रेरणा दिली. या माध्यमातून कल्याण ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करताना ग्राहकांना जास्तीतजास्त फायदा मिळावा हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही अधिक समृद्ध खरेदी अनुभव नव्याने निर्माण करण्यासाठी, आमच्या पोर्टफोलिओमधील सद्य उत्पादनांचा अजून विस्तार करण्यासाठी, एक सर्वसमावेशक परिसंस्था तयार करण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्नशील आहोत. आम्हाला विश्वास आहे की, संपूर्ण भारतातील आमच्या ग्राहकांना आणि हितचिंतकांना या अनोख्या पद्धतीने संकल्पित केलेल्या वार्षिक महोत्सवाचा लाभ होईल.”

कल्याण ज्वेलर्समध्ये विकले जाणारे सर्व दागिने बीआयएस हॉलमार्क्ड (BIS Hallmarked) असून ते विविध शुद्धता चाचण्यांमधून जातात. दागिन्यांच्या खरेदीवर कल्याण ज्वेलर्सचे चार स्तरीय हमी प्रमाणपत्र (४-लेवल अॅश्यूरन्स सर्टिफिकेशन) देखील मिळेल, जे ग्राहकांना शुद्धता, दागिन्यांची आजीवन